दिव्य मराठी पुढाकार / अंधारावर चालून जाणार रातरागिणी, 'मौन सोडू, चला बोलू'

Dec 13,2019 6:12 PM IST

औरंगाबाद - 22 डिसेंबर ही वर्षातील सगळ्यात मोठी रात्र, राज्याच्या 22 शहरांतील महिलांचा अंधार भेदण्यासाठी नाइट वॉक, तुम्हीही सहभागी व्हा असे आवाहन दिव्यमराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनी केले आहे. रात्री 10 ते 1 पर्यंत हा नाइट वॉक चालेल. दिव्य मराठीचा पुढाकार असला, तरी शहरातील सर्व महिलांचा हा नाइट वॉक आहे. त्यामुळे सर्वांच्या सहभागानेच हा नाइट वॉक दमदार होणार आहे. त्यामध्ये सुमारे पाच हजार महिला सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा 9561748778/7507777268