व्हॅलेंटाइन्स डे / हे आहे संत व्हॅलेंटाइन यांचे गाव, ज्याला प्रेमाचे गावदेखील म्हटले जाते

Feb 14,2020 4:13 PM IST

आज व्हॅलेंटाइन डे आहे. पण, आजचा दिवस का आणि कधीपासून साजरा करालयला सुरुवात झाली, हे तुम्हाला माहित आहे का ? आजच्या दिवसाची गोष्ट एका लहान गावाशी जुडलेली आहे. गावाचे नाव आहे, संट व्हॅलेंटाइन व्हिलेज किंवा याला प्रेमाचे गावदेखील म्हटले जाते. या गावातच संत व्हॅलेंटाइन यांचा जन्म झाला होता, आणि त्यांच्या नावानेच हा दिवस साजरा केला जातो. हे गाव फ्रांसच्या सेंट्रल वल डी लॉयरमध्ये वसलेले आहे. सुंदर अशा या गावात दरवर्षी 12-14 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रेमी युगुलांचा मेळा लागतो. गावातील खास आकर्षण म्हणजे, येथील लव्हर्स गार्डन. स्थानिकांचे अशी मान्यता आहे की, या गावात प्रेमाची कबुली दिल्यावर कोणीच नकार देत नाही.