जळगाव / जळगाव महानगरपालिकेत घेण्यात आली शपथ

Feb 14,2020 7:02 PM IST

जळगाव- महानगरपालिकेत शुक्रवारी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी दैनिक दिव्य मराठी च्या मौन सोडू चला बोलू अभीयानातर्गत एकही फुलराणी आता जळणार नाही यासंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे, स्थायी समिती सभापती ऍड शुचिता हाडा, डॉ. प्रताप जाधव, मनपाचे उपायुक्त अजित मुठे, मिनीनाथ दंडवते, आजी माजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.