दिल्ली / वकील-पोलिस वादाला हिंसक वळण, पोलिस कर्मचाऱ्याला वकीलाची बेदम मारहाण

Nov 05,2019 2:19 PM IST

दिल्लीतील तीस हजारी कोर्टात शनिवारी वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसक घटनेचे पडसाद अद्यापही सुरुच आहेत. न्यायालयाच्या पार्किंगमध्ये वकीलाच्या कारला पोलिसांच्या व्हॅनने टक्कर मारल्यानंतर वाद उफाळून आला. त्यानंतर वकिलांच्या ग्रुपमध्ये आणि पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे, यात एका पोलिसाला वकीलाने बेदम मारले आणि नंतर पोलिस तेथून पळ काढत असताना त्याला हेलमेटही फेकून मारल्याचे दिसत आहे.