चीन / व्यक्तीच्या घसा आणि नाकातून काढला 3 सेंटीमीटरचा जळू

Nov 28,2019 12:39 PM IST

हेल्थ डेस्क - चीनमधील एका व्यक्तीच्या घश्यात जळू अडकल्याचे आढळून आले. रुग्णाच्या मते, दोन महिन्यांपासून खोकला येत होता. मात्र जेव्हा कफमधून रक्त बाहेर पडल्यानंतर डॉक्टरांकडे गेला. चीनच्या वुपिंग हॉस्पिटलमध्ये सीटीस्कॅन केल्यानंतरही यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यानंतर डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कॉपी केली. यामध्ये घश्यात दोन जळू चिटकल्याचे दिसून आले. पहिला जळू व्होकल कॉर्डमध्ये होता. त्यांची लांबी 3 सेंटीमीटर होती. तर दुसरा उजव्या नागपुडीत चिटकलेला होता. दरम्यान जळू नाकाद्वारे घश्यात कशी गेली याबाबत रुग्णाला माहिती नाही. तर दुषित पाण्यामुळे जळू शरीरात गेल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.