मुंबई / मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न, महिलेने सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Dec 13,2019 5:43 PM IST

मुंबई - एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे महिलेचा जीव वाचला आहे. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले आहे. प्रियांका गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयातील आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.