नागपूर मर्डर / जिम संचालकाचा स्पर्धकाकडून सत्तूरचे वार करुन खून, मर्डरचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Jan 13,2020 4:29 PM IST

नागपूर- जिम चालवण्याची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून नागपूर ग्रामीण भागात सावनेर येथे ऑक्सीजन जीमचा संचालक अंगद रवींद्र सिंह (वय 33) याची रविवारी रात्री सत्तूरचे वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सावनेर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर मारेकऱ्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. अंगद सिंह याने राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा अंगरक्षक म्हणूनही काम केले आहे, हे विशेष.