मोदींना पाकिस्तानचा कांदा / मोदींना पाकिस्तानचा कांदा आणि साखऱ चालतो पण मंदीवर बोलत नाहीत - जितेंद्र आव्हाड

Sep 20,2019 4:00 PM IST

दींनी कांदा, साखर पाकिस्तानातून आणलेली चालते. नवाज शरीफच्या घरी न बोलवता बिर्याणी खाल्लेली चालते मग ते मंदीवर का बोलत नाहीत असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. पुण्यातील श्रमिक पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान मोदी मंदीचा परिणाम झाकण्यासाठी धार्मिक द्वेषावर भाषण करत आहेत. त्यांना कोल्हापूर-सांगलीत आलेल्या संकटावर बोलवेसे वाटले नाही असा घणाघणात आव्हाड यांनी यावेळी केला.