नवापूर / पेट्रोलपंपवर थांबलेल्या गाडीच्या डिक्कीतून दीड लाख लांबवले; चोरटा सीसीटीव्ही कैद

Dec 11,2019 9:56 PM IST

नवापूर - शहरातील स्वस्तिक पेट्रोलपंप वर संध्याकाळी सुनिल शर्मा व्यापारी दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले असताना त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेले दीड लाख रुपये एका चोरट्याने लंपास केले. हा संपूर्ण चोरीचा प्रकार पंपवरील सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाला आहे. यासंदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवापूर पोलिस शोध घेत आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.