मुंबई / डोंगरी बाजारातील कांदा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, दोघांना अटक

Dec 11,2019 5:18 PM IST

मुंबई - कांद्याच्या दरवाढीचा परिणाम मुंबईतील डोंगरी बाजारात पाहायला मिळाला. चोरट्यांनी या ठिकाणाहून चक्क 168 किलो कांद्याची चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सदरील घटना 5 डिसेंबरची आहे. दोन भाजीविक्रेत्यांनी कांदा चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या मते, चोरट्यांनी 21 हजारांच्या कांद्यावर हाथ साफ केला होता.