विधानसभा 2019 / ओवेसी ताेडणारे, तर मी जाेडणारा : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन

Oct 10,2019 1:25 PM IST

औरंगाबाद - भारतीय मुस्लिमांना कलम ३७० च्या मुद्द्यावर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन आेवेसी डायनामाइट लावून ताेडण्याचे काम करतात. मी मात्र मुस्लिमांना जाेडण्याचे काम करत असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांनी दिव्य मराठी; कार्यालयास दिलेल्या भेटीत व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर मागील पाच वर्षांचा कालावधी सर्वाधिक शांततेचा राहिल्याने भारताचा उल्लेख लिंचिस्थान असा करू नये, असे आवाहन हुसैन यांनी केले.