इंडोनेशिया / अनोखे रेस्तराँ, येथे जेवणासोबत फिश पेडिक्योरचा घेता येतो आनंद

Nov 28,2019 1:37 PM IST

लाइफस्टाइल डेस्क - इंडोनेशियाची सांस्कृतिक राजधानी योग्यकर्ता येथील एका रेस्तराँमध्ये जेवणासोबत फिश स्पाचा आनंद घेता येतो. सोटो कॉकरो केमबँग असे या रेस्तराँचे नाव आहे. हे रेस्तराँ इंडोनेशियाच्या पारंपारिक जेवणासाठी प्रसिद्ध आहे. बागेच्या मधोमध तयार करण्यात आलेल्या या रेस्तराँमधील वातावरण लोकांचा तणाव दूर करण्यासाठी मदत करत असल्याचा दावा आहे. कधीकाळी हे रेस्तराँ गाईंचा गोठा होते. इमाम यांचे वडील इमान नूर यांनी गोठ्याचे फिशपूलमध्ये रुपांतरण केले होते. यात 7 हजारांवर मासे टाकले होते. इमाम यांनी या फिशपूलमध्ये रेस्तराँ उभारले. रेस्तराँचे मालक इमान नूर सांगताता की, गेल्या वर्षी रेस्तराँची सुरुवात झाली होती. ग्राहक येथे सुंदरता पाहण्याबरोरच पारंपारिक जेवणाचा आनंद घेण्यासाठी येतात. सोशल मीडियावर रेस्तराँचे फोटोज व्हायरल होतात. हे रेस्तराँ लोकांना इतके आवडचे याची आम्हाला अपेक्षा नव्हती.