पुणे / शिवसैनिकांकडून इफको टोकिया विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

Nov 06,2019 12:29 PM IST

पुणे - पीक विम्याचे वाटप न करणाऱ्या इफको टोकियो या कंपनीचे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. शिवसेना स्टाईलने केलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विमा कंपनीच्या कार्यालायातील काचेचे दरवाजे, संगणक, खुर्च्या यांची तोडफोड केली. शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हे हिंसक आंदोलन केले. वारंवार कंपनीकडे अर्ज, विनंत्या करुनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येत नव्हती, त्यामुळे हे तीव्र आंदोलन करण्यात आले. विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, तर शिवसेनेच्या वतीने राज्यभरात अशाच पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही मोरे यांनी दिला आहे.