बर्फवृष्टी / केदारनाथ मंदिरावर बर्फाची चादर, पाहा व्हिडिओ

Nov 28,2019 2:44 PM IST

नवी दिल्ली/शिमला - देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. उत्तराखंड ते हिमाचल व लेह-लडाखमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरू झाली आहे. काश्मीर व दक्षिणेतील काही काही भागांत जोरदार पाऊस झाला. उत्तराखंडच्या केदारनाथ धाम येथे मंगळवारी रात्रीपासून बर्फवृष्टी सुरू होती. त्यामुळे दोन फूट बर्फ साठला. बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हेमकुंड साहिबसह गढवाल व कुमाऊंमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बर्फवृष्टी होईल. हिमाचलच्या किनौरमध्ये ३ फुटांपर्यंत बर्फ साठल्याने तापमान शून्याहून नीचांकी गेले आहे. रोहतांग खिंडीतील वाहतूक बंद करण्यात आली आहे. लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टीमुळे प्रशासनाने पर्यटकांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे. बर्फवृष्टीमुळे शाळांना सुटी देण्यात आली आहे.