पट्टेदार वाघ / सिरणा नदी पात्रात अडकलेल्या वाघाचा मृत्यू

Nov 07,2019 12:55 PM IST

चंद्रपूर- सिरणा नदीत फसलेल्या पट्टेरी वाघाचा आज पहाटे मृत्यू झाला. हा वाघ बुधवारी सकाळी नदीत पडल्याचे आढळून आले होते. दरम्यान बुधवारी सकाळपासून वाघाला वाचविण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली होती. मात्र अंधार पडल्यामुळे काल संध्याकाळी ही मोहीम थांबविण्यात आली. गुरुवारी सकाळी पुन्हा बचाव मोहीम सुरू होण्याआधीच वाघाचा झाला मृत्यू झाल्याचे आढळून आले.