रायपूर / शहरातील चौकात आकर्षणाचे केंद्र बनला ट्रॅफिक पोलिस कर्मचारी

Nov 29,2019 3:19 PM IST

रायपूर - छत्तीसगडची राजधानी रायपुरमध्ये एक ट्रॅफिक पोलिस कर्मचारी लोकांना वेगळ्या अंदाजात ट्रॅफिक नियमांचे पालन करण्यास सांगत आहे. शहरातील चौकात नाचून ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पाहणे एक नवीन अनुभव ठरला आहे. या पोलिस कर्मचाऱ्याला पाहिल्यानंतर सिग्नलवर थांबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमटत आहे. मोहम्मद मोहसिन शेख असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मोहम्मद गेल्या काही दिवसांपासून आपल्या कामात नवीन प्रयोग करत आहेत. मोहसिन डान्सिंग स्टेप्ससोबत ट्रॅफिक कंट्रोल करताना दिसत आहेत.