मुंबई / आरे वृक्षतोडीदरम्यान येथील एका आदिवासी पाड्यात सुखद बाब अनुभवायला मिळत आहे

Oct 07,2019 9:53 PM IST

मुंबई - आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत एकीकडे वेगवेगळ्या स्तरांवर संताप व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे सरकार आपल्या विकासाच्या संदर्भातल्या गोष्टी सांगत आहे. पण सगळ्यात आरे कॉलनीतील खडकपाडा या आदिवासी पाड्यात एक सुखद बाब अनुभवायला मिळात आहे. येथील लहान मुलांनी वारली चित्रकला जोपासली आहे. या चिमुकल्यांनी आपल्या अभ्यासाच्या खोलीतील भिंतीवर वारली चित्रकलेतून महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. एकीकडे आपल्या साधू-संतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरीची शिकवण दिली तर दूसरीकडे विकासाच्या नावाने वृक्षांची कत्तल केली जात आहे. या वृक्षतोडीदरम्यान हा सुखद अनुभव पाहायला मिळतो.