जाहिरात
जाहिरात
Home >> VidhanSabha 2019

Vidhan Sabha 2019

 • औरंगाबाद- येथे मुस्लिम समाजाचा मेळावा आजोयित करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली. यावेळी भाषण करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, माझ्या हातात सत्ता द्या, दोन दिवसासाठी मोहन भागवतांना जेलमध्ये घालतो. शस्त्र बाळगूनही भागवतांना मोकळीक दिल्याबद्दल आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले. आंबेडकर म्हणाले, कोणाकडे जर बंदूक सापडली, तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. मोहन भागवत शस्त्र...
  04:32 PM
 • तुषार खरात| मुंबई भाजपपाठाेपाठ आता शिवसेनाही काँग्रेस पक्षाला हादरा देण्याच्या तयारीत आहे. इगतपुरी (जि. नाशिक) येथील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिव्य मराठीला दिली. शिवसेनेचे नेते व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार गावित, त्यांचे पती रमेश गावित यांची शुक्रवारी इगतपुरीत बैठक झाली. यात या निर्णयावर शिक्कामाेर्तब करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. नऊ वेळा खासदार व दोन वेळा राज्यमंत्रिपद भूषवलेले...
  August 17, 08:54 AM
 • नाशिक- जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातील माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनजार महाले यांनी परत एकदा शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले आहे. महाले पूर्वी शिवसेनेतच होते, आणि ते शिवसेनेचे माजी आमदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.राष्ट्रवादीने त्यांना दिंडोरी मतदारसंघातून तिकीट दिले होते, पण भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी त्यांचा पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे भारती पवार यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीवेळी पक्ष बदलून,...
  August 16, 02:32 PM
 • जालना -बहुभाषक आणि शहरी व ग्रामीण भाग मिळून जालना विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. २००९ चा अपवाद सोडला तर गेल्या २४ वर्षांपासून येथे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यातच लढत होत आहे. २०१४ मध्ये स्वबळावर लढलेल्या शिवसेनेचा अवघ्या २९६ मतांनी निसटता विजय झाला हाेता. मात्र, गेल्या पाच वर्षांत समीकरणे बदलली. आता वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेना- काँग्रेसमधील भांडणाचा लाभ उठवण्याची तयारी वंचित आघाडीने सुरू केली आहे. राज्यात सत्तेत एकत्र...
  August 14, 10:20 AM
 • काँग्रेसमध्ये पुन्हा चैतन्याचे स्फुल्लिंग चेतवण्याची जबाबदारी ७२ वर्षीय सोनिया गांधी यांच्यावरच साेपवली जाणे हे पक्षाच्या असहायतेचे निदर्शक ठरते. काँग्रेसला असहायतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा हे स्वपक्षातच सतत संघर्ष करीत हाेते. संकुचितपणा, गुदमरून टाकणारी आैपचारिकता आणि लब्धप्रतिष्ठित संस्कृतीमध्ये रमलेल्या पक्षात नवी संस्कृती रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सहकाऱ्यांनीच निरर्थक ठरवला. इतकेच नव्हे तर नव्या काळातील...
  August 14, 09:49 AM
 • दोन टप्प्यांतील १२ तासांच्या बैठकीनंतरही काँग्रेसच्या कार्यकारिणीला नवा अध्यक्ष निवडता आला नाही. सोनिया गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी सोपवून कार्यकारिणी तूर्त मोकळी झाली. हंगामी अध्यक्षपद म्हणजे ते किती काळासाठी हे निश्चित नाही. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या व फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्ली आणि जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका आहेत. पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया पार पाडून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईपर्यंत या...
  August 13, 09:30 AM
 • फुलंब्री (जि. औरंगाबाद) -विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा प्रभाव असलेल्या फुलंब्री मतदारसंघात भाजप यंदा कुणाला उमेदवारी देणार हाच चर्चेचा विषय आहे. २००४ व २००९ चा अपवाद वगळता १९८४ पासून बागडेंनी भाजपला या मतदारसंघात यश मिळवून दिले आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीतच ज्येष्ठत्वाचा निकष लावून बागडेंना उमेदवारी नाकारण्याचा निर्णय पक्षपातळीवर झाला हाेता. मात्र, एेनवेळी शिवसेनेशी युती तुटल्याने व दुसरा सक्षम उमेदवार न मिळाल्याने भाजपने बागडेंनाच उमेदवारी दिली. मात्र, पंचाहत्तरी पार...
  August 13, 08:56 AM
 • पुणे- विधानसभा निवडणुक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पत्राद्वारे जोरदार टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी हा फक्त मराठ्यांचा पक्ष असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. पुणे शहराध्यक्ष, खासदार, पक्ष प्रवक्ता, महापालिका विरोधी पक्षनेता आणि आठ विधानसभा अध्यक्षांपैकी सात अध्यक्ष मराठा आहेत. त्यातच पुन्हा नव्याने वेगवेगळ्या...
  August 12, 09:38 PM
 • पैठण (जि. औरंगाबाद) -पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरेंचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, लोकसभेसाठी हा मतदारसंघ जालन्यात समाविष्ट आहे. लाेकसभा निवडणुकीच्या वेळी रावसाहेब दानवे यांनी अनेकांना उमेदवारीचे आश्वासन देत तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे भाजपमध्ये आता डझनभर इच्छुक झाले आहेत. तथापि, युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. यामुळे येथे बंडखाेरीची शक्यता नाकारता येत नाही. येथील राजकारण संत एकनाथ साखर कारखान्याभोवती फिरते. सध्या त्याचे...
  August 12, 08:59 AM
 • सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला चार व मित्रपक्ष असलेल्या शेकापला एक अशा एकूण जागा येतात. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता व सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्याने यंदा पहिल्यांदाच पाचही जागावर नवीन चेहरे असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत रश्मी बागल यांना शब्द दिल्याने करमाळा मतदारसंघ त्याला अपवाद राहणार आहे. पक्षपातळीवर याबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरी...
  August 11, 10:56 AM
 • मुंबई -सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना तिथे लष्कर का पाठवले नाही? जे नुकसान झाले आहे ते भरून यायला, माणसे स्थिर व्हायला वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक आहे. ती पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी केली. तसेच याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी पूरग्रस्त स्थिती आणि सरकारच्या मदतीबाबत बोलताना म्हटले की, राजकीय पक्षप्रवेश आणि यात्रा यात भाजप आणि शिवसेना मश्गुल आहेत. त्यांना...
  August 11, 10:51 AM
 • औरंगाबाद -वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रात अनपेक्षितपणे एमआयएमला खासदार मिळाला. त्यामुळे संसदेतील या पक्षाच्या खासदारांची संख्या थेट दुप्पट झाली. अनेक मतदारसंघात याच युतीने निकाल बदलवले. लोकसभा निवडणुकीत या दोघांच्या एकत्र येण्याचा हा परिणाम, तर विधानसभा निवडणुकीत काय होईल, यावर राज्यात चर्चा सुरू आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षांचेच सूत या निवडणुकीत जमणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील मागासवर्गीय मतदार आणि...
  August 11, 09:19 AM
 • मुंबई - मुंबईतील प्रभादेवी येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करतांना केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईव्हीएम, जीएसटी, नोटबंदी, यांसारख्या अनेक विषयांवर टीका केली. दरम्यान ईव्हीएमविरोधात 21 तारखेला मोर्चा काढण्यात येणार होता. पण राज्यातील पूरस्थितीमुळे तो ढकलण्यात आला आहे. मोर्चाची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे राज यांनी सांगितले. काय म्हणाले राज ठाकरे :- आज आपण सर्वसाधारण काय झालंय त्यावर बोलू Tv वर कसं...
  August 9, 03:55 PM
 • दिल्ली - महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीसाठी भाजपचे भूपेंद्र यादव यांची राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर केशव प्रसाद मौर्य आणि लक्ष्मण सावदी यांची उप-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांनी नियुक्ती केली. आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यावेळी अबकी बार 220 पार असा नारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. संबंधित निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र...
  August 9, 02:39 PM
 • सलग दुसऱ्या लाेकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यापासून गलितगात्र झालेल्या काँग्रेसला अजूनही ऊर्जितावस्था मिळालेली नाही. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांतील विजयामुळे काहीसे बळ आल्याचा आव काँग्रेसने आणला आणि २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत जीव ओतून प्रचार केला. मात्र माेदी-शहांच्या झंझावातापुढे त्यांचे काही चालले नाही. २०१४ प्रमाणे याही वेळी संपूर्ण पक्षाचा सुपडा साफ झाला, दस्तुरखुद्द पक्षाध्यक्षांवरच पराभूत हाेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे हा राष्ट्रीय पक्ष पुन्हा...
  August 8, 12:35 PM
 • सिल्लोड -विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून आ.अब्दुल सत्तार मित्रमंडळ, युवा मंच तसेच महिला सक्षमीकरण मंचची सदस्य नोंदणी अभियान राबवणे व विविध शासकीय योजनेपासून वंचित राहिलेल्यांकडून अर्ज भरून घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वाभिमान यात्रेचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टपासून स्वाभिमान यात्रेस सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार सत्तार यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात बुधवार (दि.७) रोजी आमदार अब्दुल सत्तार...
  August 8, 09:07 AM
 • सिल्लोड (जि. औरंगाबाद) -यंदा लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघांतून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. यात सिल्लाेड येथील आमदार अब्दुल सत्तार यांचा हातभार लागल्याचे म्हटले जाते. सत्तार यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसला झुलवत ठेवत शेवटी राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस अडचणीत आली तर भाजपचा फायदा झाला. परंतु आता भाजपमध्येही प्रवेश नाही आणि काँग्रेसही सोडलेले सत्तारही अडचणीत सापडले आहेत. यामुळे त्यांना यंदा...
  August 8, 08:29 AM
 • मुंबई -नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. अनेक नेते पक्ष सोडून भाजप व शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. पक्ष अडचणीत सापडला असताना नवनिर्वाचित खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची पक्षाला मदत होत आहे. डॉ. कोल्हे यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत आहे, शिवाय सामान्य जनतेलाही ते आकर्षित करत आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात डॉ. कोल्हे पक्षासाठी तारणहार ठरत आहेत. जाहीर सभा, लोकसभेचे...
  August 8, 08:22 AM
 • परळी- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज काढलेल्या धडक मोर्चा आणि 7 तासाच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्यांना त्यांच्या सोयाबीनच्या पीक विम्याचे पैसे 3 दिवसांत देण्याचे तसेच वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले 25 ऑगस्ट पर्यंत देण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने मोर्चा व आंदोलनाची दखल घेवुन सकारात्मक प्रतिसाद दिल्याने 7 तासाचे भरपावसातील हे आंदोलन मागे घेण्यात आले....
  August 7, 10:43 PM
 • परळी- अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्यांना सोयाबीन पीकाच्या विम्यातुन वगळल्याबाबत तसेच संपुर्ण पीकांचा पीक विमा द्यावा, वैद्यनाथ कारखान्याने गाळप केलेल्या ऊसाचे पैसे द्यावेत, दुबार पेरणीसाठी हेक्टरी 25 हजार मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे हजारो शेतकर्यांसह भर पावसात ठिय्या आंदोलनास बसले आहेत. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी बोलुन दाखवला....
  August 7, 06:59 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात