आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काय कमावले... रामायण-महाभारतमुळे दूरदर्शनचे प्रेक्षक वाढले
- नव्या पिढीने १९८०-९० मधील ‘रामायण', ‘महाभारत' या मालिका पाहिल्या. २९ मार्चपासून त्यांचे पुनर्प्रसारण झाले.
- ‘रामायण’ चा १६ एप्रिल २०२० चा भाग विक्रमी ७.७ कोटी लोकांनी पाहिला.
- लॉकडाऊनमध्ये 'ओव्हर दी टॉप' (ओटीटी) ट्रेंड अनेक पटींनी वाढला. केपीएमजीच्या मते ३० नोव्हेंबरपर्यंत देशात ओटीटी ग्राहक ४७ टक्क्यांनी वाढले आणि कमाई २६% वाढली.
- दक्षिण कोरियातील ‘पॅरासाइट'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर जिंकले. हा जगातील पहिला इंग्रजी अभाषिक चित्रपट ठरला. ताे कोरियन भाषेत आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा यासह एकूण चार प्रकारात ऑस्कर जिंकून इंग्रजी चित्रपटांचे वर्चस्व मोडले.
- सन २०२० चा फिल्मफेअर पुरस्कार अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी मिळवला आहे.
- नवाजुुद्दीन सिद्दिकीला पहिला फ्लिक्स फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला. ‘रात अकाली है’ या ओटीटी मूळ चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
- कोरियन चित्रपट ‘पॅरासाइट’ने जिंकले ऑस्कर, देशात ओटीटी अवॉर्ड््सची सुरुवात
काय गमावले.. टीआरपी, ड्रग्जच्या आराेपांनी प्रतिमा डागळली
- चित्रपट उद्याेगाशी निगडित तज्ज्ञांच्या मते लाॅकडाऊनमुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे ५ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान.
- जगभरात करमणूक उद्योगाची कमाई ६६ टक्क्यांनी कमी.
- करमणूक विश्वात टीआरपी घोटाळ्याने प्रेक्षकांचा विश्वास उडाला. काही वाहिन्यांवर घरांमध्ये बार-ओ-मीटर बसवण्याकरिता पैसे दिल्याचा आरोप होता. मुंबई पोलिसांनी ६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला आणि १३ जणांना अटक केली.
- सिनेमा विश्वात माेठी नावे ड्रग्जशी जाेडली गेल्यामुळे प्रतिमा खराब झाली. मॉब लिंचिंगसारखे विवादही प्रबल झाले.
- भारतात ९६०० स्क्रीन आहेत. ते बंद राहिल्यामुळे ९ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता. मागील वर्षी १५३ कोटी तिकिटे विकली गेली होती. ही संख्या यंदा ९० टक्क्यांनी घटली.
- आयएनएसच्या अहवालानुसार चित्रपट निर्मात्यांनी एका वर्षासाठी काम थांबवले आहे. तसेच, सर्वकाही सामान्य होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.