आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये व्यापार:सेन्सेक्समध्ये 35 % घट, नंतर 81 टक्के वाढ

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय कमावलेे...
- अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंंद्र सरकारने २० लाख काेटी रुपयांचे पॅकेज दिले. शेतकरी, मजूर, काॅर्पाेरेट सेक्टर सगळ्यांचा त्यात विचार.

- सेन्सेक्स मार्चमध्ये ३५% घसरून २५८९१ वर हाेता. ९ महिन्यांत ८१ % वाढून ताे ४७,००० उच्चांकावर गेला.

- आेबीसी-अलाहाबाद बँकेसह दहा बँकांचे विलीनीकरण. पीएनबी देशातील दुसरी सर्वात माेठी बँक.

- लाॅकडाऊनमध्ये आर्थिक मंदीत २ काेटींपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज सरकारने भरले.

- मार्च ते सप्टेंबरपर्यंत लाेन माेराटाेरियम दिले गेले. हा ईएमआय हाॅलिडे हाेता, व्याज सरकारने भरले.

- स्टार्ट अपला इसाॅप ( एम्प्लाॅई स्टाॅक आेनरशिप) साठी ५ वर्षांनंतर कर भरण्याची सवलत मिळाली.

काय गमावले...
- देशाचा जीडीपी एप्रिल-जूनच्या पहिल्या तिमाहीत उणे २३.९% पर्यंत घसरला. हे इतिहासात प्रथम घडले.

- आयएमएफच्या नुसार, भारतात प्रतिव्यक्ती जीडीपी १०.५ % घसरून १.३८ लाख रुपये राहण्याची शक्यता. जाे बांगलादेशातील प्रतिव्यक्ती जीडीपी १.४० लाख रुपयांच्या अंदाजापेक्षाही कमी आहे.

- विश्व बँकेच्या मते, विदेशातून भारतात येणारी रक्कम ९% नी कमी हाेत ५.५ लाख काेटींवर आली आहे.

- २०१८ आणि १९ च्या अहवालातील त्रुटींमुळे जागतिक बँकेने २०२० चा उद्योग सुलभता अहवाल राेखला.

- लाॅकडाऊनमुळे हाॅटेल, पर्यटन, विमान उद्याेग शून्यावर. पर्यटनाला १५ हजार काेटी, हवाई वाहतुकीस २१ हजार काेटी रुपयांचा ताेटा झाला.

बातम्या आणखी आहेत...