आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये शिक्षण:160 कोटी विद्यार्थी मुकले शाळेला, ई-लर्निंगवर भर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय कमावले.. : नवीन शिक्षण पद्धत
- युनिसेफ-वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगाला ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे नवीन मार्ग सापडले. शिक्षकांनी यूट्यूबवर धडे अपलोड केले. याशिवाय खुली परीक्षाही प्रचलित झाली.

- केंब्रिज विद्यापीठाने २०२०-२१ चे सत्र ऑनलाइन चालवण्याचा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, हार्वर्ड विद्यापीठाने जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ६७ ऑनलाइन अभ्यासक्रम विनामूल्य केले. त्यांचे शुल्क २००० ते अडीच लाख रुपयांपर्यंत आहे.

- देशाला नवीन शिक्षण धोरण प्राप्त झाले. प्रत्येक मुलामध्ये कौशल्य विकसित हाेईल, अशी त्याची रचना आहे. जीडीपीच्या ६% रक्कम सरकार त्यासाठी खर्च करेल. शिक्षकांना तयार करणे हे त्यात मोठे आव्हान आहे.

- पाचवीपर्यंत मातृभाषाच शिक्षणाचे माध्यम असेल. मुलांचे तीन स्तरांवर मूल्यांकन केले जाईल. एक विद्यार्थी स्वतः करणार, दुसरा वर्गमित्र आणि तिसरा त्याचा शिक्षक असेल.

काय गमावले...वाचनाची क्षमता कमी
- संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०० देशांत १ कोटी मुले शाळा-महाविद्यालयात जाऊ शकली नाहीत. हे प्रथमच घडले. भारतातील ३६ कोटी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला.

- अमेरिकन अभ्यासानुसार, मुले शाळेत परतली तर त्यांची वाचनाची पातळीदेखील ३०% कमी होऊ शकते आणि गणितात एक वर्षभर मागे जाऊ शकतात.

- ब्रिटेनच्या हेप अहवालानुसार मोठ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ८० ते १००% आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या कपातीचा सामना करावा लागला. हार्वर्ड, केंब्रिजसारख्या संस्थांना १००० कोटींचे नुकसान झाले.

- जागतिक बँकेच्या अहवालानुसार लॉकडाऊनमध्ये ३ महिन्यांच्या शालेय शिक्षणबंदीचा परिणाम ४७ टक्के विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीवर हाेईल.

- एका अहवालानुसार परिस्थिती सुधारल्यानंतरही भारतात ९७ लाख मुले शाळा-महाविद्यालयात परतणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...