आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये पर्यावरण आणि हवामान:निसर्ग बहरला, दूरवरून घडले हिमालयाचे दर्शन

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय कमावले...
- लॉकडाऊनमध्ये २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत देशातील ६७ मोठ्या शहरांमधील एक्यूआय ५० च्या खाली आला. मागील वर्षी काेणत्याही शहराचा एक्यूआय ५० पेक्षा कमी नव्हता. दिल्लीतही हवा मध्यम होती.

- जुलैमध्ये कर्नाटकच्या कबिनी जंगलात दुर्मिळ काळा पँथर दिसला. स्पिती व्हॅलीमध्ये लुप्त झालेला हिमालयीन सेरो आढळला.

- लॉकडाऊन मध्ये, निसर्ग निखरला आणि शेकडो किलोमीटर दूरवरून हिमालयाचे दर्शन झाले. जालंधर ते धौलाधर रेंज आणि आसाम ते कांचनजंगा आणि सहारनपूरमधूनही हिमालयाची शिखरे दिसली.

काय गमावले...
- जुलैमध्ये आसामच्या ३३ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये पूर आला. ७ दशलक्ष लोक प्रभावित. १२५ लोकांनी प्राण गमावले. या पुरामुळे काझिरंगा नॅशनल पार्कमधील नऊ गेंड्यांसह ११० जनावरांचा मृत्यू.

- २० मे रोजी अम्फान वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीवर धडकले. बंगालमध्ये ५ हजारहून अधिक घरांचे नुकसान झाले आणि शेकडो झाडे उन्मळून पडली. या वादळाने ११८ लोकांचा जीव घेतला.

- तुर्कीमध्ये ३० ऑक्टोबर रोजी ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. तेथील सर्वात माेठे तिसरे शहर इजमीरमध्ये २० इमारती पडल्या. देशभरात ११६ लाेकांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...