आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये आराेग्य:सर्वाधिक संशाेधन आराेग्यात; प्रथमच एका महिन्यात 8 लसी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात काेराेना संक्रमित १ काेटीपेक्षा जास्त, १.४७ लाख मृत्यू, सध्या अॅक्टिव्ह केस १ टक्क्यापेक्षाही कमी वर्षअखेरीस जगभरात ६ काेराेना लसीना मान्यता देण्यात आली आणि जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू हाेऊ शकले. भारतातही १६० काेटी डाेसचे नियाेजन करण्यात आलेले आहे.

काय गमावले...१० काेटी मुलांचे लसीकरण रद्द; २.७२ काेटी शस्त्रक्रिया टाळल्या
- ३१ डिसेंबर २०१९ राेजी चीनने काेराेेनाबाबत माहिती दिली. तेव्हापासून ७.३ काेटी बाधित झाले. १६ लाख मरण पावले. त्यात सर्वाधिक ३.०८ लाख मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.

- भारतात पहिला रुग्ण ३० जानेवारीस वुहानहून केरळला परतलेला विद्यार्थी. त्यानंतर १ काेटीपेक्षा जास्त रुग्ण. १.४३ लाख मृत्यू. भारत सर्वाधिक संक्रमितांचा दुसरा देश ठरला.

- जगभरात तीन लाखांपेक्षा जास्त आराेग्यसेवक संक्रमित आहेत. सप्टेंबरपर्यंत ७ हजारपेक्षा जास्त जणांचे मृत्यू झाले. - काेराेनाच्या दहशतीमुळे गैर काेराेना रुग्णांची संख्या ८० टक्के घटली. जगभरात २.७२ काेटी शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. श्रीमंत देशांमधील मृत्युदरदेखील चांगलाच वाढला.

- एम्ससारख्या देशातील मुख्य रुग्णालयातील आेपीडीमध्ये राेज १२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचारांसाठी येत हाेते. त्यांची संख्या ८० टक्के घटली. राेज २५० शस्त्रक्रिया हाेत हाेत्या, मात्र ९ महिन्यांत डाॅक्टरांनी फक्त तातडीच्या शस्त्रक्रियाच केल्या.

- जागतिक बँकेच्या अहवालानुसार २६.५ काेटी लाेक तणावग्रस्त आहेत. दर ४० सेकंदाला एक आत्महत्या झाली. जगभरात ७४ लाख काेटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.

- कोरोनावर मात करणाऱ्या ५० टक्के लाेकांना दम लागणे, वेदना, कमजाेरीचा त्रास. आैषधांचे साइड इफेक्टही समाेर.

- कोरोना मुळे ३३० काेटी लाेकांनी उपजीविकेचे साधन गमावले. १३.२ काेटी गरिबीच्या खाईत ढकलले गेले.

- जगभरातील लसीकरण कार्यक्रम थंडावले.जागतिक आराेग्य संघटनेने पाेलिआे व गाेवरची साथ येण्याचा इशारा दिला.

काय कमावले...देशातील रुग्णालयांमध्ये बेड्स१.७ वरून वाढून १५ लाख झाली
- १९१८ मध्ये फ्लूची साथ आली. पण लस १९४५ मध्ये तयार झाली. जग १९३५ पासून पोलिओग्रस्त, पण लस २० वर्षांनी आली. कोविडची लस विक्रमी ८ महिन्यांत तयार केली गेली.

- आयपीएसओएस सर्वेक्षणातील ९५ टक्के डॉक्टरांनी दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला दिला. मॅकेन्झीच्या अहवालान्वये टेलिमेडिसीनचे प्रमाण २१ वरून ४३% झाले.

- २०२० मध्ये एकूण नवसंकल्पनांपैकी १०% पेक्षा जास्त आराेग्य क्षेत्रात. वाेशेराे स्मार्टबॅजला टाइमने सर्वोत्कृष्ट मानले. त्यात सदस्यांना व्हाइस कमांडद्वारे संवाद साधता येताे.

- डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी व्हॅक्यूम मशीनचे व्हेंटिलेटर बनवले. मर्सिडीझच्या फॉर्म्युला -1 अभियंत्यांनी श्वसन यंत्र तयार केले जे नळ्यांद्वारे ऑक्सिजन पुरवठा करते.

- आरोग्य आरोग्य सेतू हे लाँच हाेताच १३ दिवसांत ५० दशलक्षाहून अधिक डाऊनलोड हाेणारे पहिला अॅप ठरले.

- योग-आयुर्वेदाचे आकर्षण वाढले. त्याची बाजारवृद्धी ९ टक्के राहिली. २०२७ पर्यंत ताेे ४.८ हजार कोटी रुपयांचा असेल.

- देशात पहिल्यांदाच हैदराबादच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या दोन्ही फुप्फुसांचे पुनर्रोपण केले. ताे कोरोनाग्रस्तही होता. दुसरीकडे, तीन डॉक्टरांच्या पथकाने लडाखमध्ये १६ हजार फूट उंचीवर जवानाची आतड्यांची शस्त्रक्रिया केली.

- मेमध्ये सर्वाधिक पीपीई किट बनवणारा भारत दुसरा देश ठरला. दररोज २ लाख पीपीई किट बनवल्या जात आहेत.

- कोराेनामुळे देशातील सर्व रुग्णालयांमध्ये बेड‌्सची संख्या १.७४ लाखावरून १५ लाखांवर पाेहाेचली.

प्रथम लस.... इंग्लंडमध्ये ९० वर्षीय कीननला टाेचण्यात आली : छायाचित्रात व्हीलचेअरवर दिसणारी महिला मार्गारेट कीनन आहे. ९० वर्षीय कीनन जगातील पहिली व्यक्ती आहे. तिला काेराेनाची पूर्ण विकसित झालेली लस ८ डिसेंबरला देण्यात आली. ती फायझर/बायाेएनटेकद्वारा तयार करण्यात आली हाेती.

बातम्या आणखी आहेत...