आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काय गमावले... 47% स्पर्धा रद्द
- स्पोर्ट््स मार्केटिंग एजन्सी टू सर्किल्स सर्कलच्या अहवालानुसार २०२० मध्ये नियाेजित ४८,८०० स्पर्धांपैकी ४७% रद्द झाल्या. महसूल ४.५ लाख कोटी रुपयांनी घटला. ऑलिम्पिक ७६ वर्षांनंतर होऊ शकले नाही. इतिहासात असे सहाव्यांदा घडले. टी -२० वर्ल्डकप रद्द झाला.
- माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन यांनी निवृत्ती घेतली.
- आशियाई स्पर्धेत ८०० मीटरचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या जी मरीमुथचेू पदक डोपिंगमुळे परत घेण्यात आले.
-शुल्क न भरल्यामुळे भारताला पुरुषांच्या वर्ल्ड - बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ चे यजमानत्व गमवावे लागले.
काय कमावले... फॉर्म्युला-२ शर्यत जिंकली
- जेहान दारुबाला साखीर ग्रँड प्रिक्स फॉर्म्युला-२ शर्यत जिंकणारा व पुलेला गोपीचंद आयओसी लाइफटाइम अॅचीव्हमेंट अवॉर्ड मिळवणारे प्रथम भारतीय ठरले. हॉकी कर्णधार मनप्रीत एफआयएच प्लेयर ऑफ द इयर ठरला.
- राफेल नदालने १३ वी फ्रेंच ओपन जिंकली. हे त्याच्या कारकीर्दीतील २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद होते.
- जेम्स अँडरसन ६०० बळी घेणारा पहिला गोलंदाज.
- बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतास प्रथमच सुवर्ण.
- रोहित शर्माला राजीव गांधी खेल रत्न, ईशांत शर्मा, शिखर धवन, महिला क्रिकेटर दीप्ती यांना अर्जुन पुरस्कार.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खेळाडूस किमान वयासाठी नियम लागू. किमान वय १५ वर्षे आवश्यक.
- यूएस ओपन मेन्स सिंगलचा ७ वर्षांनंतर सामना जिंकला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.