आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उमेद -2021:कोरोनाने शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान अवलंबण्याचा धडा शिकवला; आता गावात राहूनही हार्वर्डमध्ये शिकणे शक्य, ही संधीच गेमचेंजर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंत अग्रवाल, सीईओ, एडेक्स (हार्वर्ड-एमआयटी) - Divya Marathi
अनंत अग्रवाल, सीईओ, एडेक्स (हार्वर्ड-एमआयटी)
  • डिजिटल लर्निंगमधील संधी सांगताहेत Harvard-MIT चा ई-प्लॅटफॉर्म edX चे प्रमुख

कोविड-१९ ने शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा धडा शिकवला आहे. वर्गांचे स्वरूप बदलले असून पारंपरिक अध्यापन पद्धतीसोबतच एडेक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर दर्जेदार ऑनलाइन व साहित्य उपलब्ध आहे. वैयक्तिक शिक्षणासोबतच ऑनलाइन शिक्षणाचे एकत्रीकरण न्यू नॉर्मल बनले आहे. स्वच्छ पाणी व स्वच्छ हवेप्रमाणे शिक्षणही एक मानवी हक्क आहे. शिक्षणाचा उद्देश कौशल्य मिळवून करिअरमध्ये प्रगतीसोबतच जगाचा सुजाण नागरिक बनणे हे आहे. कोरोनाने अनेक प्रणालींतील असमानता समोर आणली. यात शिक्षणाशी संबंधित सर्व मुद्द्यांचा समावेश आहे.

महामारीशी झुंजणाऱ्या जगात अधिक समान व न्यायपूर्ण समाजनिर्मिती, सर्वांसाठी समान संधी निर्माण करणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. तसेच लोकांनी आपल्या कौशल्यात सुधार, नवीन कौशल्ये शिकावीत; जेणेकरून त्यांना महामारीचा परिणाम न होणाऱ्या नोकऱ्या मिळू शकतील. शिक्षणाचे आधीसारखे स्वरूप आता नसेल. ऑनलाइन शिक्षणाची वाढती मागणी व तिची स्वीकारार्हता वाढत राहील. यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा मिळेल. उदा. एक व्हिडिओवर घालवला जाणारा सरासरी वेळ, तो किती वेळा रिप्ले केला, डिस्कशन फोरमवर सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न, मूल्यांकन प्रदर्शन, शिकण्याची पद्धत आदी. भविष्याच्या स्वरूपासाठी याच मुद्द्यांचे सखोल विश्लेषण व संशोधन होईल. शिक्षण तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे शिक्षण व शिकण्याची पद्धतही बदलत आहे. सर्वांपर्यंत समान डिजिटल लर्निंग मिळणे सुकर होईल. विद्यार्थी घरूनही शिक्षण घेऊ शकतील. एखाद्या विद्यापीठात ऑनलाइन शिक्षण घेणारा विद्यार्थी कोणत्याही ए ग्रेड संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांप्रमाणे कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करू शकेल. एडेक्ससारखे प्लॅटफॉर्म मॉड्युलर क्रेडेन्शियल्स देत आहेत. ते कॉलेजमध्ये प्रवेशाआधीच विद्यार्थ्यांना ऑनलाइन मिळते. शालेय पातळीवर विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेत असेल तर तो पुढे जाऊन बीटेकच करेल, वा एमबीएकडे जाईल, असा आजवर ट्रेंड होता. मात्र कॉलेजमध्ये प्रवेशाआधीच त्याच्यासाठी मायक्रो बॅचलर वा मायक्रो मास्टर्ससारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कॉलेज प्रवेशाआधी तुम्ही यातून एखादा कोर्स करावा व पुढील शिक्षणाआधी त्यात कौशल्य मिळवावे. अल्पावधीत कौशल्यांमुळे पूर्ण पदवी मिळवण्यासाठी तुलनेने कमी वेळ लागेल. या पद्धतीने नोकऱ्या मिळवणेही सुकर होईल.

भारतात स्मार्टफोन व मोबाइल इंटरनेटचे विश्व प्रचंड विस्तारले आहे. मुलांना अावड, कलेनुसार उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्याची सुवर्णसंधी शिक्षण क्षेत्राला मिळाली आहे. स्थानिक वा प्रादेशिक शिक्षणाच्याही पुढे जाऊन इतर प्रदेश,एमआयटी-हार्वर्डसारख्या संस्था अन् त्याच्या पुढे अपारंपरिक पद्धतींनी शिक्षणाबाबत विचाराची संधी विद्यार्थ्यांकडे मिळणार आहे.

वर्क फ्रॉम होमप्रमाणेच लर्न फ्रॉम होम, अनेक उद्योगांवर होईल परिणाम
ऑन-कॅम्पस डिग्रीत मॉड्युलर ऑनलाइन शिक्षण अवलंबल्याने या संबंधित उद्योगांवरही परिणाम होईल. उदा. विद्यार्थी घरूनच शिकले तर ट्रॅव्हल क्षेत्रावर परिणम होईल. होस्टेलची गरज कमी होईल, यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम होईल. झूम/स्काइपवर वर्ग भरू लागल्याने लॅपटॉप, मोबाइल फोनची गरज व विक्रीही वाढेल. यामुळे आयटी/आयटीईएस व नेट सेवा पुरवणारी क्षेत्रे प्रभावित होतील. वर्क फ्रॉम होमप्रमाणे लर्न फ्रॉम होम न्यू नॉर्मल होईल. यामुळे कॉर्पाेरेट ट्रेनिंग मार्केटमध्ये इन्स्ट्रक्टर्सवर परिणाम होईल.

बातम्या आणखी आहेत...