आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 पेक्षाही वाईट होती बरीच वर्षे:कोणत्या महामारीने केला साम्राज्याचा नाश तर कुणी अमेरिकेची 90 % लोकसंख्याच संपवली;  700 वर्षांनंतरही अजूनही आपल्यात आहेत हे व्हायरस

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जगभरात कोरोनामुळे 18 लाख मृत्यू झाले आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये एका वेगळ्या प्रकारचा फ्लू पसरत होता. अगदी एक वर्षापूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2019 रोजी WHO ने त्याला व्हायरल न्यूमोनिया म्हटले होते. तोच व्हायरल निमोनिया कोविड -19 म्हणून आपल्यापर्यंत पोहोचला आहे. तीन महिन्यांनंतर 11 मार्च रोजी डब्ल्यूएचओने त्याला साथीचा रोग म्हणून जाहीर केले. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 18 लाख मृत्यू झाले आहेत. जीव गमावणा-यांमध्ये सुमारे दीड लाख हे भारतीय आहेत.

2020 कडे आपण आजवरचे सर्वात वाईट वर्ष म्हणून बघत आहोत. परंतु सत्य काही वेगळे आहे. मानवांच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अशी अनेक वर्षे गेली आहेत ज्यात अशा काही रोगराई पसरल्या ज्यामुळे कोट्यवधी लोकांनी प्राण गमावले आहेत. जस्टिनियन प्लेगने सुमारे 1500 वर्षांपूर्वी एक साम्राज्य संपवले. तर 15 व्या शतकात स्मॉलपॉक्समुळे अमेरिकेच्या एकुण लोकसंख्येच्या 90% लोकांचा मृत्यू झाला होता. सुमारे 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूमुळे 5 कोटींहून अधिक लोक मरण पावले. अशाच 10 महामारींबद्दल जाणून घेऊयात...

1. अँटोनियन प्लेग | वर्ष: 165

 • रोममध्ये पसरलेल्या या आजारामुळे राजासह 50 लाख लोकांचा मृत्यू

इतिहासात डोकावून पाहिले असता 165 या सालात प्रथमच साथीचा रोग पसरला होता. त्याला अँटोनियन प्लेग असे नाव देण्यात आले. असे मानले जाते की जेव्हा रोमचे सैन्य मेसोपोटामियाहून परत आले तेव्हा त्यांच्यासोबतच हा संसर्ग रोममध्ये आला. यामुळे रोममध्ये दररोज 2 हजार लोकांचा मृत्यू झाला. या संसर्गामुळे रोमन सम्राट लुसियस वेरसचाही मृत्यू झाला होता. या साथीच्या आजाराने सुमारे 50 लाख लोक मृत्यूमूखी पडले होते.

2. जस्टिनियन प्लेग | वर्ष: 541

 • या साथीच्या आजाराने जगातील निम्म्या लोकसंख्येचा मृत्यू झाला

अँटोनियन प्लेग नंतर पसरलेल्या साथीला जस्टिनियन प्लेग असे नाव देण्यात आले. इ.स. 541 मध्ये हा साथीचा रोग आशिया, उत्तर आफ्रिका, अरब आणि युरोपमध्ये पसरला. तथापि, त्याचा सर्वात जास्त परिणाम बायझंटाईन या पूर्व रोमन साम्राज्यावर झाला. या आजाराने 5 कोटी लोकांचा बळी घेतला होता. ही संख्या त्यावेळी जगातील एकूण लोकसंख्येच्या निम्मी होती. हा रोग इतका धोकादायक होता की त्याने बायझंटाईन साम्राज्याचा अंत केला.

3. द ब्लॅक डेथ | वर्ष: 1347-1351

 • युरोपमध्ये इतके मृत्यू झाले की ती पुन्हा तेवढी लोकसंख्या व्हायला 200 वर्षे लागली

1347 ते 1351 दरम्यान पुन्हा एकदा प्लेग पसरला. त्याला बुबोनिक प्लेग असे नाव देण्यात आले. त्याचा सर्वाधिक परिणाम युरोप आणि आशियामध्ये झाला. त्यावेळी बहुतेक व्यवसाय समुद्रामार्फत होत असे. समुद्री जहाजावर उंदीर बरेच राहत होते. या उंदरांपासून माशांद्वारे हा आजार पसरला होता. त्यावेळी या आजाराने 200 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. असे म्हटले जाते की, या आजारामुळे एकट्या युरोपमध्ये इतके मृत्यू झाले होते की 1347 च्या पूर्वीच्या लोकसंख्येचा आकडा गाठण्यासाठी 200 वर्षे लागली. म्हणून या आजाराला द ब्लॅक डेथ असेही म्हणतात. बुबोनिक प्लेग किंवा ब्लॅक डेथ हा आजार आजही संपलेला नाही.

4. स्मॉल पॉक्स | वर्ष: 1492

 • युरोपमध्ये आलेल्या या आजारामुळे अमेरिकेतील 90 % लोक मारले गेले

युरोपियन्स 1492 मध्ये अमेरिकेत दाखल झाले. त्यांच्या येण्याने स्मॉल पॉक्स नावाचा संसर्ग अमेरिकेत पसरला. या आजाराने संक्रमित 10 पैकी 3 लोकांचा मृत्यू झाला. त्यात 2 कोटी अमेरिकन लोक मारले गेले. हा आकडा त्यावेळी अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 90% होता. याचा फायदा युरोपियन लोकांना झाला. त्यांना येथे राहायला जागा मिळाली आणि त्यांनी आपल्या वसाहती स्थायिक करण्यास सुरुवात केली. स्मॉल पॉक्स हा आजार अजूनही संपलेले नाही. बीबीसीच्या अहवालानुसार आतापर्यंत या आजाराने 35 कोटींहून अधिक लोक मरण पावले आहेत. 1796 मध्ये डॉक्टर एडवर्ड जेनर यांनी या आजारावरची लस विकसित केली.

5. कॉलरा | वर्ष: 1817

 • साथीचे रोग ज्याची उत्पत्ती भारतात झाली आणि तो अमेरिका-आफ्रिकेत पसरला

1817 मध्ये, कॉलरा नावाचा आजार जगात पसरला. याची उत्पत्ती भारतात झाली होती. गंगा नदीच्या डेल्टामार्गे हा आजार आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेमध्येही पसरला. घाणेरडे पाणी पिणे या आजाराचे मुख्य कारण होते. त्यावेळी या आजारामुळे 10 लाखांहून अधिक मृत्यू झाले होते. डब्ल्यूएचओच्या मते, दरवर्षी 13 लाख ते 40 लाख लोक या आजाराने पीडित असतात. आजही दीड लाखांपर्यंत मृत्यू या आजारामुळे आहेत.

6. स्पॅनिश फ्लू | वर्ष: 1918

 • 5 कोटी लोकांचा जीव घेणारा फ्लू, भारतात 1.7 कोटी लोकांचा मृत्यू

1918 मधील फ्लू (साथीचा रोग) स्पॅनिश फ्लू म्हणून ओळखला जातो. गेल्या 500 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात धोकादायक साथीचा रोग होता. असे मानले जाते की त्यावेळी जगातील लोकसंख्येच्या एक तृतीयांश म्हणजेच 50 कोटी लोकांना हा साथीचा आजार झाला होता. जगभरात यामुळे 5 कोटींहून अधिक मृत्यू झाले होते. एकट्या भारतामध्येच मृत पावलेल्या लोकांचा आकडा हा 1.7 कोटी इतका होता. हा आजार इतका विचित्र होता की सर्वात जास्त मृत्यू हा निरोगी लोकांचा झाला होता. H1N1 हा विषाणू स्पॅनिश फ्लूसाठी जबाबदार होता. हा विषाणू अजूनही आपल्यामध्ये आहे आणि दरवर्षी मनुष्यांना संक्रमित करतो.

7. एशियन फ्लू | वर्ष: 1957

 • हाँगकाँगमधून आलेल्या या आजारामुळे जगभरात 11 लाख लोकांचा मृत्यू झाला

हा आजार फेब्रुवारी 1957 मध्ये हाँगकाँगमध्ये सुरू झाला. हा रोग पूर्व आशियात उद्भवला असल्याने त्याला आशियाई फ्लू म्हणतात. हा आजार H2N2 या विषाणूमुळे पसरला होता. काही महिन्यांतच हा रोग अनेक देशांमध्ये पसरला. जगभरात यामुळे 11 लाखांहून अधिक लोक मारले गेले.

8. हाँगकाँग फ्लू | वर्ष: 1968

 • या चिनी फ्लूने आधीच आजारी असलेल्या लोकांना लक्ष्य केले

13 जुलै 1968 रोजी हाँगकाँगमध्ये या फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता.. या कारणास्तव, याला हाँगकाँग फ्लू म्हणतात. तथापि, काही तज्ज्ञांचे असेही मत आहे की हा फ्लू चीनमधून हाँगकाँगमधून आला. या फ्लूसाठी H3N2 विषाणू जबाबदार होता. काही महिन्यांतच हा व्हायरस व्हिएतनाम, सिंगापूर, भारत, अमेरिका आणि युरोपमध्ये पोहोचला. या विषाणूमुळे मृत्यू झालेल्या बहुतेक लोकांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त होते. गंभीर आजार असलेल्या लोकांच्या या व्हायरसने गाठले होते. या आजारामुळे जगभरात 10 लाखांहून अधिक मृत्यू झाले.

9. एचआयव्ही एड्स | वर्ष: 1981

 • चिंपांझींपासून पसरलेला हा रोग आजही दरवर्षी कोट्यावधी लोकांचा जीव घेतो

1981 मध्ये, एचआयव्ही विषाणूचा प्रसार झाला. त्याला ह्युमन इम्युन डेफिशियन्सी व्हायरस म्हटले जाते. हा विषाणू मानवांमध्ये एड्स नावाच्या रोगाचा प्रसार करतो. आफ्रिकन देश काँगोची राजधानी किन्शासा येथे या आजाराची सुरुवात झाली. रोगाच्या उत्पत्तीचे कारण 30 वर्षांनंतर समोर आले होते. हा रोग चिंपांझींपासून मनुष्यापर्यंत पसरला. त्यावेळी, किन्शासा बुशमीट (आफ्रिकन वन्य प्राण्यांचे मांस) ची एक मोठी बाजारपेठ होती आणि येथूनच हा विषाणू मानवांमध्ये आला. या आजारामुळे आतापर्यंत साडेतीन कोटीहून अधिक जणांचा बळी गेला आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये सुमारे 6.90 लाख लोक एड्समुळे मरण पावले. या आजारावर आतापर्यंत कोणतेही प्रभावी उपचार सापडले नाहीत.

10. स्वाइन फ्लू | वर्ष: 2009

 • डब्ल्यूएचओने 1 वर्षाआधीच साथीच्या यादीतून वगळले, परंतु अद्याप प्राणघातक आहे

एप्रिल 2009 मध्ये मेक्सिकोमध्ये स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर 13 मे रोजी स्वाइन फ्लूची पहिली घटना भारतात समोर आली. 11 जून 2009 रोजी, याला महामारी म्हणून जाहीर करण्यात आले. H1N1 विषाणूमुळे स्वाईन फ्लू झाला आणि डुकरातून हा विषाणू मानवांमध्ये आला. ऑगस्ट 2010 मध्ये डब्ल्यूएचओने साथीच्या आजारांच्या यादीतून याला वगळले. पण, हा आजार आपल्यात अजूनही आहे. आतापर्यंत जगभरात 5.5 लाखाहून अधिक लोक स्वाइन फ्लूमुळे मरण पावले आहेत. यावर्षी सप्टेंबरपर्यंत या आजारामुळे भारतात 44 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...