आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2021 मधील 8 मोठे बदल:नवीन हेल्थ कार्ड व कृत्रिम किडनीमुळे जगणे सुसह्य होणार; 5 जी नेटवर्क, फास्टॅग आपली गती वाढवणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील नियम-तंत्रज्ञान बदलणार

चारचाकींना फास्टॅग आवश्यक, चिप असलेले ई-पासपोर्ट दिले जातील
फेब्रुवारीपासून चारचाकी वाहनांना फास्टॅग आवश्यक असेल. नसेल तर दुप्पट पैसे द्यावे लागतील. इलेक्ट्रॉनिक चीपचे पासपोर्ट दिले जातील. ते स्कॅन केल्यास पासपोर्टधारकाची माहिती स्क्रीनवर येईल. फसवणूक टळण्याबरोबरच वेळही वाचेल. ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी देण्यात आली आहे.

चेक पेमेंटवर पॉझिटिव्ह पे लागू, काँटॅक्टलेस पेमेंट मर्यादा वाढेल
पॉझिटिव्ह पे सिस्टिम २०२१ मध्ये सुरू होईल. ५० हजारांहून अधिक धनादेश जारी केल्यास बँकेला एसएमएसद्वारे सूचना द्यावी लागेल. आरबीआयने १ जानेवारीपासून काँटॅक्टलेस कार्ड पेमेंट्सची मर्यादा २,००० हून वाढवून ५,००० हजार केली आहे. म्युच्युअल फंड कंपन्या रिस्कोमीटर जाहीर करतील. मल्टिकॅप फंडातील ७५% रक्कम समभागांत गुंतवावी लागेल.

कृत्रिम किडनी येणार, स्मार्टफोन कनेक्टेड पेस मेकरचीही तयारी
अमेरिकी शास्त्रज्ञांनी कृत्रिम किडनी बनवण्यात यश मिळवले आहे. ती किडनीच्या खालील बाजूस लावली जाईल. नलिकेचे एक टोक रक्तवाहिन्यांना, तर दुसरे टोक मूत्राशयाला जोडले जाईल. २०२१ मध्ये स्मार्टफोन कनेक्टेड पेसमेकर आणण्याची तयारी सुरू आहे. यात मोबाइल फोनद्वारे पेसमेकरवर निगराणी ठेवली जाईल.

५ जी येईल, लँडलाइनहून मोबाइल कॉलसाठी आधी 0 लावणे आवश्यक
लँडलाइनहून कोणत्याही मोबाइलवर कॉलसाठी तुम्हाला मूळ नंबरपूर्वी ० लावावा लागेल. २०२१ मध्ये भारतात ५ जी नेटवर्क सुरू होण्याची शक्यता आहे. तर अँड्रॉइड ४.०.३ ऑपरेटिंग सिस्टिमपेक्षा जुन्या व्हर्जनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. यूपीआयद्वारे पेमेंट महागडे होईल. एनपीसीआय थर्ड पार्टी अॅपवर अतिरिक्त शुल्क लावेल.

परीक्षेतील गुण पद्धती बदलेल, परीक्षा छोट्या, ४ वेळा होणार जेईई
सीबीएसई १० वी आणि १२ वीमध्ये आता १० % गुण केस स्टडीजशी निगडित असतील. मार्किंग पॅटर्न बदलेल. प्रश्नांची संख्याही कमी होईल. वर्षात ४ वेळेस जेईई मेन होईल. २०१९ पर्यंत शाळा आणि क्लासरूम पारंपरिक होते, तर २०२० मध्ये मुले ऑनलाइन लर्निंगला सामोरे गेले. २०२१ मध्ये या दोन्हीचा संयुक्त सार म्हणजे ब्लेंडेड लर्निंग असेल.

सर्वांचे डिजिटल हेल्थ कार्ड, हवामान विभाग वर्तवणार हिवतापाचा अंदाज
२०२१ मध्ये संपूर्ण देशात हेल्थ कार्ड लागू केले जाईल. हे कार्ड सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांत मिळतील. यात सर्व रुग्णांचा डाटा सुरक्षित असेल. एका क्लिकवर हा रिपोर्ट केव्हाही आणि कधीही बघितला जाऊ शकेल. तर तिकडे हवामान खाते हिवताप, डेंग्यूसारख्या आजारांचा अंदाज व्यक्त करेल. यामुळे आजारांना पायबंद घालणे सोपे जाईल.

हिपॅटायटिस-सीच्या नव्या उपचारांना मंजुरी, एआर-व्हीआरद्वारे उपचार
अमेरिकेने युनिव्हर्सल हिपॅटायटिस सीच्या नवीन उपचारांना मंजुरी दिल्याने हे उपचार आधीच्या उपचारांपेक्षा ९०% परिणामकारक आहेत. घरच्या घरी उपचारांसाठी व्हर्च्युअल रिअॅलिटीसारखे टूल्स २०२१ मध्ये येतील. उदा. नेत्रतज्ञ व्हीआरद्वारे एचडी कॅमेऱ्यांतून रुग्णाच्या डोळ्यांचे अगदी स्पष्ट चित्र बघू शकतील.

एप्रिलपासून वेतन नियमांत बदल, हातात कमी वेतन, पण बचत वाढेल
एक एप्रिलपासून नवीन वेतन नियम लागू होतील. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक भत्ते देऊ शकणार नाहीत. म्हणजे एकूण वेतनातील बेसिक देय आणि एचआरचा भाग ५० टक्के होईल. या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये अधिक रक्कम जणार असली तरी दरमहा हाती पडणारे वेतन कमी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...