आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2021 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील परिस्थिती कशी असेल? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने आहेत आणि त्यातले मोठे बदल काय असू शकतात? नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्ही या मुद्द्यांवर प्रसिद्ध तज्ज्ञांचे मत आपल्यासमोर आणत आहोत. आज आपण जाणून घेऊया देशातील नोकरीच्या संधीविषयी Freshersworld.com & TeamLease.com उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड कौशिक बॅनर्जी काय सांगत आहेत…
नोक-यांच्या बाबतीत 2020 हे एक अनिश्चित वर्ष होतं. 2008 च्या मंदीच्या काळात 5 लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली होती. परंतु 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे 3 कोटी नोक-या गेल्या.
CMIE कंझ्युमर पिरामिड हाऊस होल्ड सर्व्हेनुसार, केवळ नोव्हेंबर 2020 मध्ये 35 लाख लोकांनी त्यांच्या नोकर्या गमावल्या. आता नवीन वर्षात जानेवारीपासूनच कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू होणाार आहे. त्यामुळे नोकरीच्या बाबतीत 2021 चांगले असेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
फ्रेशर्स बद्दल बोलायचे झाल्यास, सध्या त्यांच्यासाठी परिस्थिती अनिश्चित आहे. 2019 मध्ये नोकरी मिळाली, मात्र रुजू 2020 मध्ये व्हायचे होते, अशा अनेक फ्रेशर्सना आपली नोकरी गमवावी लागली आहे. ते या काळात नोकरीवर रुजू होऊच शकले नाहीत. त्यापैकी बर्याच जणांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर 2020 दरम्यान आपल्या टर्मिनल परीक्षा देखील पूर्ण केल्या.
2020-21 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील हायरिंगमध्ये पहिली आणि दुस-या तिमाहीच्या कालावधीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरच्या तुलनेत वाढ झाली आहे. आता अखेरची तिमाही म्हणजेच जानेवारी ते मार्च या कालावधीत 3 पट हायरिंग वाढण्याची अपेक्षा आहे.
आयटी, ई-कॉमर्स, फिनटेक (फायनान्शियल टेक्नॉलॉजी), एज्युटेक (एज्युकेशन टेक्नॉलॉजी) यासारख्या नियमित क्षेत्राव्यतिरिक्त गेल्या तीन महिन्यांत ऑटो क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक व्हेइकल सेगमेंट, बीपीओ, रिलेटमध्ये फ्रंट ऑफिस आणि रिसेप्शनिस्ट, फिल्ड सेल्स, अकाउंटंट जॉब यात चांगली वाढ झाली आहे. या रोजगारांमध्ये सरासरी 60% ते 70% सह 300 % पर्यंत वाढ नोंदली गेली.
विजयवाडा, म्हैसूर, कोची, कोयंबटूर, चंडीगड, अहमदाबाद, जयपूर, गुवाहाटी, इंदूर, पटना, लुधियाना, भुवनेश्वर आणि विशाखापट्टनम अशा शहरांमध्ये नोकरीच्या संधी वाढल्या आहेत, सहसा या शहरांमध्ये नोकरीच्या संदी फारशा नसतात.
एप्रिल 2020 पासून बरेच लोक स्किलिंग आणि री-स्किलिंगमध्ये गुंतले आहेत. म्हणजेच लोक आपल्या स्किल्स वाढवत आहेत. आज बरेच ई-लर्निंग प्लॅटफॉर्म विनामूल्य किंवा अत्यंत सवलतीच्या दरात कौशल्य वर्धित अभ्यासक्रम देत आहेत.
कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीची आतुरतेने वाट पाहणा-या फ्रेशर्सचा अशा कोर्सेकडे कल वाढलेला दिसतोय. दुसरीकडे, बर्याच कंपन्यांचे एल अॅण्ड डी विभाग (शिक्षण आणि विकास) सर्व स्तरांवर विद्यमान कामगारांच्या कौशल्यांमध्ये वाढ करण्यात व्यस्त आहेत.
अशा इंडस्ट्रीज जिथे लोक लोक उद्योगभिमुख अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम करत आहेत…
सरकारच्या मदतीने अप्रेंटिसशिपमध्ये तेजी येणार
दोन प्रमुख कारणांमुळे अॅप्रेंटिसशिपमध्ये तेजी येईल अशी अपेक्षा आहे. पहिले कारण म्हणजे, कौशल्य व उद्योजकता विकास मंत्रालयाने (एमएसडीई) 2.4 लाख अप्रेंटिससाठी पूर्ण वेतन दिले आहे. यासाठी 36s कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दुसरे म्हणजे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अप्रेंटिसशिप आधारित रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
कोरोनाच्या काळात असंघटित क्षेत्रावर तीव्र परिणाम झाला आणि आजही ते तशाच परिस्थितीत आहेत. मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपापल्या शहरांमध्ये व खेड्यात स्थलांतरित होणे अत्यंत वेदनादायक होते. लवकरच त्यांना परत आणणे खूप मोठे काम आहे. त्यांना सरकार व नोकरी देणा यांकडून ठोस आश्वासनांची आवश्यकता आहे. या प्रकरणात, त्यांना दिलासा देणा-या कायद्यांसह ते काटेकोरपणे अंमलात आणणे गरजेचे आहे.
असे म्हटले जाऊ शकते की असंघटित क्षेत्र स्वतःला सावरण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे.
ई-कॉमर्सशी संबंधित अनौपचारिक क्षेत्राला मोठी मागणी होती. डिलिव्हरी, कुशल आणि अर्धकुशल कामगारांना बर्याच संधी मिळाल्या आहेत आणि येथे सतत मागणी आहे. Teamlease.com सारख्या पोर्टलवर मागील वर्षीच्या तुलनेत असंघटित क्षेत्रातील दुप्पट नोक-या पोस्ट केल्या जात आहेत. लॉकडाउनच्या महिन्यांच्या तुलनेत, नोकरीच्या या संधी पाच पट वाढल्या आहेत.
एकंदरीत, 2021 नोकरीच्या बाबतीत सकारात्मकता आणण्याचे वर्ष असेल. विशेषत: फ्रेशर्ससाठी. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दुस-या आणि तिस-या तिमाहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच, नवीन रोजगारांच्या संधीच्या बाबतीत 2021 चांगले ठरेल, असे निश्चितपणे म्हणता येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.