आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मधील 20 धडे:स्वत:ला बदलण्याची ताकद हे सर्वात मोठे शस्त्र

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या संकटाच्या वर्षात आपण बरेच काही बघितले व शिकले. २०२० मधील सर्वात महत्त्वाचे २० धडे तुम्हाला सांगताहेत भास्कर एक्स्पर्ट.

१. पहिले सुख-निरोगी शरीर : आर्थिक संकटामुळे लोकांना पुन्हा एकदा बचतीचे महत्त्व कळाले आहे. बचतीची सवय असलेल्यांना फारशी अडचण आली नाही. मात्र इतरांना यातून बचतीचा धडा मिळाला.

२. बचत हीच संपत्ती आहे : आर्थिक संकटामुळे लोकांना पुन्हा एकदा बचतीचे महत्त्व कळाले आहे. बचतीची सवय असलेल्यांना फारशी अडचण आली नाही. मात्र इतरांना यातून बचतीचा धडा मिळाला.

३. दातृत्वही आहे महत्त्वाचे : कोरोनाकाळात दानशूरांची संख्या वाढली. अब्जाधीशांनी सढळ हाताने संशोधन-उपचारासाठी देणगी दिली. हा काळ सहकार्याचाही श्रेष्ठ काळ होता.

४. जसा आहार तसे तन-मन : कोरोनाकाळात लोकांनी आहाराला कदाचित पहिल्यांदाच एवढे महत्त्व दिले. चवीऐवजी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांना प्राधान्य दिले.

५. शिकण्यासाठी वयाची अट नसते : यावर्षी प्रत्येकाने काही ना काही शिकले आहे. मुलांनी ऑनलाइन शिकणे, तर शिक्षकांनी ऑनलाइन शिकवणे शिकले. अनेकांनी प्रथमच डिजिटल पेमेंट केले.

६. संकट संधीही घेऊन येते : कोरोनामुळे अनेक उद्योगांसमोर संकट उभे राहिले तर अनेकांनी यातून संधी शोधली. चित्रपटगृहे बंद झाली, मात्र ओटीटी प्लॅटफॉर्म्स वाढले

.७. घर हाच स्वर्ग आहे : संकटकाळात लाखो लोक घरी परतले. काही रोगाच्या भीतीने, तर काही रोजगार गेल्याने परतले. यामुळे आपल्या राज्यात, शहरातच रोजगाराच्या संधी का उपलब्ध होत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न समोर आला.

८. वेळेपेक्षा अमूल्य भेट कोणतीही नाही : लॉकडाऊनमध्ये लोकांनी कदाचित पहिल्यांदाच आपल्या कुटुंबासोबत एवढा वेळ घालवला असेल. कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेचे महत्त्वही कळाले.

९. प्रत्येक अडचणीवर उपाय आहे : लॉकडाऊनमुळे कार्यालये, मैदाने बंद झाली. मात्र प्रत्येक संकटावर उपाय आहे हे वेळेने दाखवून दिले. वर्क फ्रॉम होम झाले. खेळही ऑनलाइन झाले.

१०. वास्तवातही सुपरहीरो असतात : या संकटकाळात लोकांनी खरेखुरे सुपरहीरो बघितले. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असो किंवा पोलिस. या सर्वांनीच अविरतपणे सुपरहीरोप्रमाणे काम केले.

११. एकजुटीने अडचणीवर मात शक्य : यापूर्वी कुठल्याही आजारावर एवढ्या लवकर लस तयार झाली नव्हती. मात्र यंदा संशोधनकार्यातील देशांनी-संस्थांनी वेळोवेळी जगासमोर माहिती ठेवली. संकटावर एकजुटीने मात करणे शक्य आहे.

१२. मनात देव असेल तर घरही मंदिर : लॉकडाऊनमध्ये मंदिरांची दारे बंद झाली. मात्र परमेश्वर मनामनात वसलेला आहे हे लोकांना कळाले. भाविकांनी घरातूनच देवाचे दर्शन घेतले. पूजा केली.

१३. अचूक माहिती अत्यावश्यक : कोरोनाचे आकडे असो किंवा चीनसोबत असलेला सीमावाद. अचूक माहिती अत्यावश्यक असल्याचे आपण २०२० मधून शिकलो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या माहितीमुळे लोक त्रस्त होते.

१४. कुठलेही काम छोटे नसते : आधी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे कोणाचेही लक्ष नसायचे. मात्र कोरोनामुळे स्वच्छतेचे महत्त्व कळाल्याने त्यांच्यावर अनेक ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला.

१५. थेंबे थेंबे तळे साचे : लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. मात्र अनलॉकनंतर छोट्या-छोट्या उपायांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. छोटेसे प्रयत्नही महत्त्वाचे असतात.

१६. स्वच्छतेत ईश्वराचा वास आहे : स्वच्छतेत ईश्वराचा वास आहे हे कोरोनामुळेच कळाले. स्वच्छता आता सवयीचा भाग झाली आहे.

१७. संयम हीच सर्वात मोठी शक्ती आहे : कोरोनामुळे लोकांचा संयम वाढला. फिजिकल डिस्टन्सिंगचा संयम असो की मास्कचा, लोकांनी प्रचंड संयम पाळला. संयम पाळणारे विजयी झाले.

१८. संकट गरीब-श्रीमंत भेद करत नाही : ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सपासून ते अनेक राष्ट्राध्यक्ष कोरोनाच्या विळख्यात सापडले. अनेक दिग्गज आपल्याला सोडून गेले. महामारीने गरीब-श्रीमंत असा भेद केला नाही.

१९. मन भक्कम तर संकटावर मात शक्य : कुठलाही आजार शरीराच्या आधी मनाला पराभूत करतो. मात्र कोरोनाला पराभूत करणाऱ्या वृद्धांमध्ये अनेकांना आधीपासूनच गंभीर आजार होते. मात्र आपल्या साहसाने त्यांनी कोरोनावर मात केली.

२०. आयुष्य निरंतर पुढे जात राहते : ही या काळातील सर्वात मोठी शिकवण आहे. संकटे येतात, अनेकदा जवळच्या माणसांना गमवावे लागते. मात्र आयुष्य पुढे जात राहते. काळोख्या रात्रीनंतर आशेचा सूर्य उगवतच असतो.

भास्कर एक्स्पर्ट पॅनल {हर्ष गोएंका- चेअरमन, आरपीजी एंटरप्रायजेस {शालिनी भरत- संचालक, टीआयएसएस {सौम्या स्वामिनाथन- मुख्य शास्त्रज्ञ, डब्ल्यूएचओ {गौरव मुंजाल- सहसंस्थापक, अनअकॅडमी {राजदीप सरदेसाई- वरिष्ठ पत्रकार {डॉ. डी. पी. डोभाल- शास्त्रज्ञ, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी आणि महेश व्यास- सीएमआयईचे प्रमुख

बातम्या आणखी आहेत...