आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2021 हे वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी कसे? यावर आम्ही आपल्याला प्रसिद्ध तज्ज्ञांचे मत सांगत आहोत. आतापर्यंत आपण अर्थव्यवस्था, शिक्षण, नोकरी आणि राजकारणावर लेख वाचले आहेत. मनोरंजन क्षेत्रासाठी 2021 हे वर्ष कसे असेल हे व्यापार विश्लेषक आदित्य चौकसे यांच्याकडून आज जाणून घेऊयात...
देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. सध्याचे संकट काही काळात संपेल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत एंटरटेनमेंट विश्वातील सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर चित्रपटगृह, OTT (ओव्हर द टॉप) आणि टीव्ही यांच्यात आपापसांत संघर्ष निर्माण होऊ शकतो का? उत्तर आहे… नाही. हे शक्य नाही.
याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले - OTT गेली तीन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तरीही थिएटर आणि टेलिव्हिजन यांचे स्थान कायम आहे. दुसरे कारण म्हणजे भारतासारख्या विशाल देशात बाहुबली - 2 सारखा यशस्वी चित्रपट चित्रपटगृहात केवळ पाच कोटी प्रेक्षकच बघू शकतात.
टेलिव्हिजनवरील प्रसारणामुळे चित्रपटाची प्रेक्षक संख्या आणि कमाई दोन्हीमध्ये वाढ होते. ओटीटीच्या आगमनामुळे प्रेक्षकांची संख्या आणि कमाईसाठीचे एक प्लॅटफॉर्म वाढले आहे. करमणुकीची ही तिन्ही साधने स्वतःचे अस्तित्व कायम ठेवतील. चित्रपट निर्मितीसाठी वाढते बजेट हेदेखील एक आव्हान आहे. ओटीटीच्या रूपात कमाईची अतिरिक्त साधने ही समस्या सोडवू शकतात.
कोरोना काळात मोठ्या बजेटचे ओटीटी वेब-सीरिज तयार होण्यास सुरुवात झाली. असे असूनही, आज 9 महिन्यांनतर, जेव्हा OTT कंपन्या त्यांच्या खर्चाचा हिशेब लावत आहेत, तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्यांच्या व्यवसायाला वेग आला नाही, असेच चित्र आहे.
प्रत्यक्षात चित्रपटगृह, टेलिव्हिजन आणि ओटीटी या तिन्ही माध्यमांचे प्रेक्षक वेगवेगळे आहेत. सध्याच्या OTT वरील बराच कंटेंट हा विदेशी फॉर्मेटमध्ये तयार होत आहे. त्यांचे प्रेक्षक बहुतेक महानगरांमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये असतात. हे स्पष्ट आहे की तिन्ही माध्यमांचे प्रेक्षक वेगळे आहेत, अशा परिस्थितीत तिन्ही माध्यमे आपले अस्तित्व टिकवून ठेवतील.
मार्च 2020 च्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउनमुळे थिएटर बंद झाले. अनेक निर्मात्यांचे चित्रपट तयार झाले होते. अशा परिस्थितीत दोन अडचणी निर्माण झाल्या पहिली अडचण म्हणजे, थिएटर उघडण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा कंटेंट शिळा होणार होता आणि दुसरा धोका म्हणजे - चित्रपट तयार करायला लागलेल्या रकमेवर दरमहा व्याज वाढणार होते. दुसरीकडे OTT इंडस्ट्रीच्या लक्षात आले की, याकाळात प्रेक्षकांना नवीन कंटेंटची आवश्यकता आहे आणि भारतात पाऊल ठेवण्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला काळ असू शकत नाही. त्यामुळे निर्मात्यांना म्हणेल तितका पैसा दिला गेला. अट फक्त एवढीच होती की, निर्माते OTT वर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 120 दिवसांनी तो चित्रपट टेलिव्हिजनवर टेलिकास्ट करु शकतील. हा व्यावसायिक करार अनेक निर्मात्यांसाठी संजीवनी ठरला. खाली दिलेल्या चार्टद्वारे हे गणित स्पष्ट होईल...
दुसरीकडे, देशभरातील चित्रपटगृहांच्या मालकांना चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित करणे फारच चुकीचे वाटत आहे. वास्तविक, ही सध्याच्या काळाची मागणी आहे, याकडे ते दुर्लक्ष करत आहेत. निर्मात्यांना आपले भांडवल सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले आहे.
यशराज फिल्म्सचा 'बंटी और बबली -2' आणि 'जयेशभाई जोरदार', रिलायन्सचा 'सूर्यवंशी', '83' आणि सलमानचा 'राधे' असे फक्त निवडक चित्रपट तयार आहेत, पण निर्मात्यांना थिएटरऐवजी चित्रपट थेट OTT वर प्रदर्शित करण्यात रस नाही. या चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रचंड संयम ठेवून मोठे आर्थिक नुकसान उचलले आहे.
आगामी काळात अनेक चित्रपट केवळ OTT साठी बनवले जातील. 'रात अकेली' आणि 'लूटकेस' ही त्याची यशस्वी उदाहरणे आहेत. छोट्या बजेटचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्याला चित्रपटाच्या निर्मिती खर्चाव्यतिरिक्त प्रसिद्धी आणि वितरणात किमान पाच कोटी रुपये खर्च करावे लागतात. बर्याच चित्रपटांची अवस्था अशी आहे की हा खर्च चित्रपटगृहांमधून निघू शकत नाही, अशात या सर्व चित्रपटांचा थेट OTT -टीव्हीवर जाण्याचा निर्णय योग्य आहे.
'लूटकेस' हा चित्रपट दोन वर्षांपासून प्रदर्शनासाठी तयार होता, परंतु निर्मात्याला जोखीम उचलायची नव्हती. चित्रपट थेट OTT वर रिलीज झाला आणि त्याची प्रशंसा देखील झाली.
अभिषेक बच्चन आणि सैफ अली खानसारखे मध्यम लोकप्रिय स्टार OTT वर आले आहेत. गुणवत्तेत सुधारणा होईल आणि यामुळे प्रेक्षक आणि इंडस्ट्री दोघांनाही फायदा होईल.
अलीकडे पर्यंत, कोणताही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी टीव्हीवर प्रसारित केला जायचा. त्यानंतर अनेक दिवसांनी तो OTT वर पोहोचायचा. टीव्हीवर टेलिकास्ट करून निर्मात्याला ओटीटीपेक्षा चारपट अधिक पैसे मिळायचे. म्हणजेच चित्रपट वितरण प्रणाली अशी होती - सर्वप्रथम थिएटर, नंतर टीव्ही आणि शेवटी OTT . ओटीटीचे कमाई मॉडेल सबस्क्रिप्शन वर आधारित आहे. जितके अधिक ग्राहक, तितकी कमाई अधिक.
सुरुवातीच्या वर्षांमध्ये OTT चा फारसा प्रभाव नव्हता. प्रेक्षक थिएटरनंतर चित्रपट टेलिव्हिजनवर पाहात होते. त्यामुळे OTT चे सबस्क्रिप्शन घेऊन करमणुकीवर जास्त पैसे खर्च करण्यास ते तयार नव्हते. OTT इंडस्ट्रीने हे सत्य ओळखले आणि निर्मात्यांना अधिक पैसे देणे सुरू केले. त्यांची एकच अट होती, ती म्हणजे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर तो OTT वर रिलीज करावा आणि त्यानंतर तो टीव्हीवर दाखवला जावा. या नवीन समीकरणामध्ये निर्मात्यांना टेलिव्हिजनपेक्षा OTT कडून पाचपट जास्त पैसे मिळाले. त्याच काळात, OTT ने आपले पाय पसरवण्यासाठी मोठ्या बजेटच्या वेब सीरिज तयार करण्यास सुरवात केली. 'सीक्रेट गेम्स, फॅमिली मॅन, स्पेशल ऑप्स' ही त्याची काही मोठी उदाहरणे आहेत.
OTT मध्ये बरेच बदल करणे आवश्यक आहे
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.