आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताळेबंदाची चांगली प्रकृती गरजेची:प्रत्येक समस्या सुलभता घेऊन येते, कोविड-19 ने उद्योग जगतास डिजिटल अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले आहे...

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर्ष गोएंका - Divya Marathi
हर्ष गोएंका
  • कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणे चांगली गुंतवणूक

कोविड-१९ महारोगराईमुळे निर्माण झालेल्या गोंधळास स्कॉटिश कवी रॉबर्ट बर्न्सचे वाक्य “उंदरं आणि माणसांच्या सर्वोत्कृष्ट योजना बऱ्याचदा उलट्या पडतात’ यातून चांगले समजून घेता येईल. विषाणू नैसर्गिकरीत्या किंवा प्रयोगशाळेत तयार केला हा रहस्यमय विषय आहे. मात्र, याने सरकार आणि उद्योग दोन्हींच्या योजनांचा नैसर्गिक प्रवाह रोखला. जगभरातील अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाल्या आणि दैनंदिन हालचाली ठप्प केल्या. जगभरातील सर्व देश या विषाणूशी लढताहेत,अशा स्थितीत मी शांत चित्ताने विचार करतो की, उद्योगाने मोठ्या प्रमाणात यातून कोणता धडा घेतला, जो सुखकर भविष्यासाठी आपणाला उभे करू शकेल.

हे लोकांचे सबलीकरण, डिजिटल नवोन्मेष, एआय आणि क्लाऊड कॉप्युटिंग, ताळेबंदाची प्रकृती आणि रोकड संरक्षणातून शक्य आहे. फार खोलात जाऊन विचार केल्यास या काळात आपला समाज, इकोसिस्टिमला मदत करणे आणि प्रत्येक संघटनेच्या अस्तित्वासाठी एक उद्देश होण्याच्या आवश्यकतेची गरज भासली. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनची घोषणा झाली, सर्व लोक अचानक त्यात अडकले. याची आधी अंदाज आला नव्हता. पिंजऱ्यात बंद पक्ष्याप्रमाणे कठोर निर्देशांसोबत आपण घरात कैद झालो होतो. स्वातंत्र्य आणि सबलीकरणाच्या पायाभूत गरजाही हिरावल्या होत्या. दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी बाहेर पडण्याच्या मर्यादेसह हा काळ २० व्या शतकाच्या मध्यातील युद्धग्रस्त काळासारखा झाला होता. त्या काळात जेव्हा मी आपल्या संस्थेतील लोकांसोबत केलेल्या चर्चा आठवतो तेव्हा लक्षात येते की, ते आपल्या नोकरीपेक्षा सर्वात जास्त प्राधान्य देत होते ते म्हणजे लोकांचे सबलीकरण होते. आणि हे सबलीकरण आणखी काही नव्हे तर त्यांच्यावर सतत निगराणी करण्याऐवजी काम करण्याचे स्वातंत्र्य देणे आहे.

महारोगराईशी लढताना आपण कुठूनही काम करण्याचे धोरण जाहीर केले, जो खऱ्या अर्थाने नवोन्मेष होता. यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी निवडलेल्या कुठल्याही ठिकाणावरून काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. यामुळे लोकांना एक नवी ताकद मिळाली आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्ही लोकांवर ठेवलेला विश्वास त्यांच्या कामात दीर्घकाळ उतरत राहील.महारोगराईचे निर्बंध भविष्य हटवल्यानंतरही जारी राहतील.

प्रत्येक समस्या कोणती तरी सुलभता घेऊन येते आणि कोविड-१९ ने उद्योग जगतास डिजिटल अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले. केवळ कंपन्यांच्या पद्धतीत बदल झाला नाही तर ग्राहकाच्या वागणुकीतही बदल आला. आज क्लायंट, भागीदार आणि कर्मचाऱ्याशी जोडण्यासाठी झूम किंवा टीम्ससारखे प्लॅटफॉर्मचा वापर फोन कॉलप्रमाणे सामान्य पद्धतीने केला जात आहे.

हर्ष गोएंका
चेअरमन, आरपीजी एंटरप्रायजेस

बातम्या आणखी आहेत...