आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 ने काय शिकवले:हा काळ विसरू नका, याची शिकवण सदैव स्मरणात ठेवा, भविष्याचा पाया मोठ्या आव्हानांतच असतो

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे लोक वाईट काळ समजून त्याला विसरू इच्छितात त्यांना आयुष्यात प्रत्यक्ष गरजा किती कमी आहेत याची जाणीव त्याच काळाने आपणाला लॉकडाऊनमध्ये दिल्या नाहीत का? मनोबलाच्या जोरावर मृत्यू आणि कुटुंब तसेच घट्ट नातेसंबंधाने प्रत्येक समस्या दूर केली जाऊ शकते.

इतिहासाच्या कालखंडात काही वर्षे अशीही होती, जेव्हा भीषण युद्ध किंवा मोठ्या नैसर्गिक संकटामुळे संपूण मानवजातीचे अस्तित्व पणाला लागले होते. अशा वर्षांमध्ये आता २०२० ची नांेद आवश्य होईल. हेच ते वर्ष होते, ज्यात जगाचा सामना कोविड-१९ महारोगराईशी झाला.या एका आजाराने जगात १६ लाख मृत्यूंची नोंद सरकार दप्तरी झाली. वाईट काळ लवकरात लवकर जावा, त्याची आठवणही येऊ नये, अशी मानवी स्वभावाची इच्छा असते. निसर्ग नियमांत हे शक्य नाही. कारण, तुम्ही भलेही २०२० च्या आठवणी दिनदर्शिकेतून मिटवू इच्छित असाल, मात्र सर्वात कठीण आव्हानेच आपणास सर्वात बळकट भविष्याचा पाया घालण्याची संधी देते. सकारात्मकतेच्या या विचारासह दैनिक दिव्य मराठी हे वर्ष लक्षात ठेवण्याची थीम- ‘२०२० ने काय शिकवले?’ ठेवली आहे.

दिव्य मराठीने १ जानेवारी २०२० चा अंक तयार करताना त्याची थीम - उठा, जागे व्हा... कारण रोज जिंकायचे आहे : स्वत:चा नव्याने शोध घेण्याचे वर्ष, ठेवले होते. पण कालचक्रातील या वर्षात प्रत्येक आघाडीवर स्वत:चा शोध आणि जिंकण्याच्या अशा आव्हानाचा सामना करावा लागेल ते कोणाला माहीत होते का? आपल्या आठवणी जाग्या करा किंवा ज्येष्ठांना विचारा की, केवळ १२ महिन्यांच्या काळात जगातील एवढे रंग पाहिले आणि अनुभवले का? सीएएविरोधी आंदोलनाने सुरू झालेले वर्ष फेब्रुवारीत दिल्लीच्या दंगलीपर्यंत पोहोचले तेव्हा संपूर्ण देश क्षुब्ध होता. यानंतर कोरोना विषाणूचे भय वाढवणाऱ्या बातम्या चीन आणि युरोपीय देशांतून आल्या आणि वस्तुस्थिती बनून राहिल्या. सव्वाशे कोटींहून जास्त लोकसंख्येसह आपण एका संकटासमोर उभे होतो. त्याला तोंड देताना महाशक्तीही पराभूत होत होत्या. मात्र, दहा महिन्यांत जगातील १७.७% लोकसंख्येच्या भारतात, महाशक्तींच्या तुलनेत कमी नुकसान झाले.

काही लोक वाईट काळ समजून विसरू इच्छितात, मात्र त्या काळाने आपणास लॉकडाऊनमध्ये प्रत्यक्ष गरजा किती कमी आहेत याचा अनुभव दिला नाही का? मनोबलाने मृत्यू आणि कुटुंब तसेच नात्याच्या ताकदीने प्रत्येक समस्या दूर केली जाऊ शकते हे शिकवले. संसर्ग म्हणजे मृत्यू निश्चित, ही भीती जगभरात पसरली होती त्या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून उपचार केले. ज्या कोलाहलास आपण विकास मानतो,त्याच्या अनुपस्थितीत निसर्गाचे जे जादुई संगीत निर्मिले त्याची अनुभूती अद्‌भूत होती. घरात संपूर्ण कुटुंबाने एवढा दीर्घ वेळ एकत्र घालवला. मोठ्या शहरांतून लाखो मजुरांचे वेदनादायी स्थलांतर पाहिले. स्थलांतरित जनसागरातील माणसांची लोकांनी खुल्या मनाने पोटं भरवली. दैनिक दिव्य मराठी २०२० ला शिकवणीच्या शाळेच्या रूपात सादर करत आहे. असे हे वर्ष, ज्याने मानवजातीला एक धोकादायक, अज्ञात शत्रूविरुद्ध एकजूट होऊन लढण्याची, आव्हानांचा सामना करण्याची शिकवण दिली.

बातम्या आणखी आहेत...