आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
२०२० मधून आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे मिळाले. आपापसातील सामाजिक संबंध, स्वच्छता आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या कामगार वर्गाचे महत्त्व ओळखणे हे सर्वात महत्त्वाचे धडे आहेत. कोविडमुळे शारीरिक अंतर पाळणे अनिवार्य झाले आहे. प्रवास, भेटीगाठी अशा अनेक गोष्टी बंद झाल्या आहेत.
यामुळे सामाजिक व कौटुंबिक पातळीवर परस्परातील संबंध जोपासण्याची शिकवण आपल्याला २०२० मधून मिळाली. आपल्या घरी कामासाठी येणाऱ्यांचेही मूल्य आपल्याला कळाले. यामुळे संबंध जोपासणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मी वारंवार सांगेन.
स्वच्छ भारत अभियानाची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच वारंवार हाथ धुण्यास सांगितले जात आहे. मात्र त्यासाठी पाणी आहे का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. यामुळे दुर्गम भागात पाण्याची व्यवस्था करण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. एवढेच नव्हे तर झोपडपट्टी भागात सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक पाणीपुरवठा, छोट्या खोल्या असणाऱ्या ठिकाणी स्वच्छता कशी ठेवावी हे सुनिश्चित करावे लागेल. तसेच गर्दीची ठिकाणे व घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे लागेल. महामारीला रोखण्यासाठी अशा भागांत मूलभूत सुविधा द्याव्या लागतील.
भारताला अशा महामारीसाठी तयार राहायचे असल्यास गरीब व गरजूंना अशा मूलभूत सुविधा द्याव्याच लागतील. मास्क घालणे, हाथ धुणे, स्वच्छता राखणे आपल्याला महामारीने शिकवले आहे. मात्र अशीच स्वच्छता आपण आयुष्यभरही पाळणे आवश्यक आहे. दरम्यान, कुठल्याही महामारीचा सामना करण्यासाठी आपल्या संस्थांनी सज्ज असावे हा धडा २०२० मधून आपण घेतला आहे. अशा परिस्थितीसाठी संस्थांकडे कृती आराखडा असणे गरजेचे आहे. तांत्रिकदृष्ट्या बळकट असणाऱ्या संस्थांनी महामारीत अविरतपणे काम सुरू ठेवल्याचे आपण पाहिले आहे. जसे की, या काळातही टीसचे सर्व क्लासेस व कोर्सेस सुरू होते. २०२१ मध्ये आपापसातील संपर्क कायम राहण्यासाठी सरकारने लोकांना तांत्रिकदृष्ट्या बळकट करायला हवे. आगामी वर्षातील आव्हानांचा विचार केल्यास मानसिक स्वास्थ्य सर्वात मोठे आव्हान असेल. तणाव, नैराश्य व एकाकीपणा वाढेल. सर्वच गोष्टी औषधांनी ठीक होत नाही. आधार देण्यासाठी लोकही जवळ हवे असतात. आपण राग, संवेदना, प्रेम एकमेकांना भेटल्यानंतरच व्यक्त करू शकतो. टीसच्या एका अभ्यासानुसार, महामारीत महिला, बालकांना शिवीगाळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२१ मध्ये अशीच अडचण कोणाला असेल तर त्याची मदत करणे सुनिश्चित करावे लागेल.
शालिनी भरत
संचालक, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.