Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- प्लास्टिक बंदीमुळे मालाच्या पॅकिंगचे प्लास्टिकही चालणार नाही, असा पवित्रा मनपाने घेतल्याने कपडे व्यापारी अस्वस्थ झाले अाहेत. दरम्यान मनपाबरोबर झालेल्या चर्चेत पॅकिंग असलेले प्लास्टिक काढून कपडे वा वस्तू ग्राहकांना द्यावेत, प्लास्टिकसह बाहेर देऊ नये, असा तोडगा काढण्यात अाल्याने बाजारपेठेतील वाद टळला अाहे. दरम्यान किरकोळ तेल, मसाले, लोणचे विक्री करणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली अाहे. तर नामवंत कंपन्यांच्या वस्तूवर प्लास्टिकचे अवरण अाहे, त्यावर मात्र बंदी नसल्याने हा दुजाभाव...
  11:21 AM
 • दक्षिण सोलापूर- मंद्रूप व औराद गणातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बाळासाहेब शेळके व इंदुमती अलगोंडा प्रचाराच्या रणधुमाळी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गायब झालेत. तर भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही गणात काँग्रेस नेत्यांच्या प्रतिष्ठेची आणि दोन्ही पॅनलच्या समर्थक कार्यकर्त्यांची परीक्षा पाहणारी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सर्वपक्षीय सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने मंद्रूप गणाची इंदुमती अलगोंडा यांना उमेदवारी दिली. वडील भीमराव पाटील...
  11:12 AM
 • सोलापूर, माढा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येसंदर्भातील कटाचा मेसेज टेंभुर्णीच्या बापू राजगुरू या तरुणाच्या फेसबुक खात्यावर प्रसिद्ध झाला. त्यावरून त्याला दिल्ली व गाझियाबाद पोलिसांनी चौकशीसाठी शनिवारी रात्री ताब्यात घेतले होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा त्याचा या घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचे फेसबुक अकाउंट हॅक करून गाझियाबादच्या तरुणाने हा मजकूर टाकल्याचे समोर येत आहे. माढा तालुक्यातील अकोले खुर्द (गार अकोले) गावातून बापू कुबेर राजगुरू (वय २८) या तरुणास...
  10:58 AM
 • सुस्ते (जि. साेलापूर)- अल्पभूधारक शेतकरी वडिलांची अार्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते अापला व बहीण-भावांच्या शिक्षणाचा खर्च पेलू शकत नसल्याच्या वैफल्यातून एका महाविद्यालयीन तरुणीने रविवारी घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. ईश्वरवठार गावात ही घटना घडली. अनिशा हनुमंत लवटे (१७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती तासगाव येथील पाॅलिटेक्निक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत हाेती. मी गेल्यावर तरी वडील बहीण व भावाला चांगले शिक्षण देऊ शकतील, म्हणून मी जीवन संपवत अाहे, असे...
  09:10 AM
 • सोलापूर - मनुष्याच्या शरीरात निरोगी आयुष्यासाठी सरासरी दीड लाख प्लेटलेटस असणे गरजेचे असते. प्लेटलेट्स कमी झाल्यास आरोग्य बिघडते. लाखाच्या आत प्लेटलेटस आल्यास मनुष्याच्या नाका-ताेंडातून रक्त येऊ लागते. शिवाय त्याला बेडवरच राहावे लागते. पण आरोग्याच्या या नियमाला धक्का देत शरीरात केवळ सहा हजार प्लेटलेट्स असताना एक माणूस सर्वसाधारण आयुष्य जगत असून दररोज दहा तास बँकिंग क्षेत्रातील किचकट काम करत आहे. मेडिकलच्या भाषेत याला लाखातील एक केस मानण्यात येते. केवळ सहा हजार प्लेटलेटसवर...
  June 24, 11:24 AM
 • सोलापूर - शनिवारपासून महापालिकेने प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली. शहरातील नवी पेठ, अशोक चौक, देगाव, सात रस्ता, विजापूर रोड, एमआयडीसी परिसरातील बाजार पेठ, व्यापारी संकुलातील दुकानांवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात बेकायदेशीर प्लास्टिक आढळून आले तेथे पाच हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. नवी पेठेत कारवाई करताना महापालिका पथक आणि व्यापारी यांच्यात वाद झाला. शनिवारी दिवसभर ४३ दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.१५ लाख रुपये दंड वसूल...
  June 24, 11:22 AM
 • सोलापूर - शुक्रवारी सायंकाळी शहरात मुसळधार पाऊस पडल्याने रस्त्यावर पाणी साचले, आदर्शनगर, म्हाडा काॅलनी, लाभामास्तर चाळ आदी ठिकाणी पाणी साचले होते. ते पाणी काढण्याचे काम महापालिका आपत्कालीन विभागाच्या वतीने शनिवारी दुपारपर्यंत करण्यात आले. रस्त्यावर पाणी साचल्याने तेथे रस्ता खराब होत असून, रस्ता करताना पाण्याचे नियोजन न केल्याचे दिसून आले. मुसळधार पाऊस सुमारे दोन तास सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरा पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. लोभामास्तर चाळ येथे...
  June 24, 11:21 AM
 • सोलापूर - उजनी धरणावर एक हजार मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. त्याची अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी महावितरणचे संचालक सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने सर्व बाबींची पडताळणी करून दोन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. राज्याच्या उद्योग, ऊर्जा विभागाने याबाबतचे शासन निर्णय जाहीर केला. राज्यातील ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता, नवीन अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास करणे अपरिहार्य असल्याचे मत नोंदवत ऊर्जा...
  June 24, 11:21 AM
 • सोलापूर - ऑनलाईनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता महावितरणाने निःशुल्क केला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील वीजग्राहकांनी ऑनलाईन द्वारे जास्तीत जास्त वीजबिलांचा भरणा करावा यासाठी महावितरणकडून जागर सुरू करण्यात आला आहे. विविध उपक्रमांद्वारे ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याबाबतचे फायदे वीजग्राहकांना पटवून देण्यात येणार आहेत. वीज बिल भरणा केंद्र येथे पाेस्टर लावणे, सोशल मीडियावर क्लिप प्रसिध्द करणे आदी विविध उपक्रमाद्वारे वीज ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे....
  June 24, 11:06 AM
 • सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराचा सिद्धरामेश्वर पॅनेलने शुक्रवारी हत्तूर येथे धडाक्यात शुभारंभ केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अाक्रमक भाषण करीत गेली ५० वर्षे बाजार समिती ताब्यात असताना विकास का केला नाही?, व्यापारी, अडते कर चोरी करण्यासाठी चार प्रकारची बिले करताहेत, यावर बाजार समितीने काय कारवाई केली? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान पॅनलचे एक नेते डाॅ. चनगोंडा हाविनाळे यांनी पत्रकारांवर विकले गेल्याचा अारोप केल्यानंतर शहाजी पवार, अशोक निंबर्गी, शिवशरण...
  June 23, 10:41 AM
 • सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण राबवित आहे. काँग्रेसच्या काळात क्रूड तेलावर १६ टक्के तर रिफाईन तेलावर ४४ टक्के आयातशुल्क होते, पण पंतप्रधान मोदी यांनी देशातील तेलबियांना चांगला भाव मिळण्यासाठी क्रूड तेलावर ७५ टक्के तर रिफाईन तेलावर ९० टक्के आयात शुल्क लावले आहे. कच्चे तेल, रिफाईन तेल, हरभरा, वाटाणा यावरील आयात शुल्कामध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळण्यास मदत झाली आहे. शिवाय येत्या काळात उसापासून...
  June 23, 10:38 AM
 • सोलापूर- शालेय पोषण आहार, कुपोषण निर्मूलन, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आैषधांचा तुटवडा, हायमास्ट दिवे बसविण्याकडे होणारे दुर्लक्ष, शिक्षणाधिकारी व सदस्यांवर गुन्हे दाखल प्रकरणावरून शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. सभागृहातील चर्चेदरम्यान होणारे विषयांतर टाळत काही विभागांच्या कार्यपद्धतीवरील वारंवार तक्रारी करणाऱ्या सदस्यांना ठोस उपाययोजना सुचविण्याची मागणी करीत अध्यक्ष संजय शिंदे यांनी पावणेचार तासांमध्ये सर्वसाधारण सभा संपवली. जिल्हा...
  June 23, 10:33 AM
 • माढा- येथील जगदंबा अनुसूचित जाती जमाती सहकारी सूत गिरणी जमिनीच्या व्यवहारावरून पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संदीपान थोरात, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे या तिघांवर माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम (माढा कृषी बाजार समितीचे शासन नियुक्त संचालक) यांच्या फिर्यादीनंतर माढा न्यायालयाने आदेश दिले. शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला. माढ्यातील जगदंबा अनुसूचित जाती-जमाती सहकारी सूत...
  June 23, 10:23 AM
 • अकलूज- बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी दहा दिवसांपासून फरार डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री दोशी यांना वेळापूर पोलिसांनी गुरुवारी निपाणी (जि. बेळगाव) येथून अटक केली. शुक्रवारी त्यांना माळशिरस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वेळापूर (ता. माळशिरस) येथील आनंद मॅटर्निटी आणि सर्जिकल नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये ११ जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने छापा टाकून अवैध गर्भपात होत असल्याचे उघडकीस आणले होते. या रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. चार बॉक्स मुदतबाह्य औषधसाठा व गर्भपात करण्याच्या मशीन...
  June 22, 10:46 AM
 • सोलापूर- बुधवारी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात कोंढारपट्टा (नेवरे) ता. माळशिरस येथील अजीम खाजालाल शेख, कुगाव, ता. करमाळा येथील संतोष अर्जुन कामटे आणि माढा येथील सूरज शिवाजी राऊत यांनी यश मिळवले. उत्तर सोलापूर तालुक्यातील दोघे आणि माढा तालुक्यातील दोघांनी त्यात यश मिळवले. अकलूज । कोंढारपट्टा (नेवरे) येथील अजीम खाजालाल शेख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. अजीम शेख हे संगणक अभियंता आहेत. त्यांनी कला शाखेची पदवीही घेतली आहे. त्यांचे नेवरे,...
  June 22, 10:40 AM
 • सोलापूर- निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. तरीही आमच्या लोकांनी माझ्याविरोधात कुंभारी गणामध्ये उमेदवार दिला. यामुळेच मी सिद्धेश्वर पॅनलसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे ग्रामदैवत सोमेश्वर-बनसिद्धेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शेतकरी व व्यापारी यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणुकीस उभा आहे. मी सलग...
  June 22, 10:35 AM
 • पंढरपूर- श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरात सुमारे ७० कोटी रुपये खर्च करून पर्यावरणपूरक असे भक्त निवास बांधण्यात आले आहे. सुमारे साडेआठ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या भक्त निवासामध्ये अग्निशमन यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापनाद्वारे सेंद्रिय खतनिर्मिती, मैला शुद्धीकरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, विजेसाठी सोलार यंत्रणेचा अवलंब करण्यात आलेला आहे. येत्या आषाढी एकादशीवेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या निवासाचे उद्््घाटन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, मंदिर...
  June 22, 07:14 AM
 • माढा ( सोलापुर) - दिवसाढवळ्या कुर्डूवाडी शहरात धारधार हत्याराने विकी गायकवाड या तरुणाची हत्या केल्याची घटना ता. 17 रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा माढा तालुक्यातील जाधववाडी(मो) गावात एका तरुणाची पूर्ववैमनस्यातुन हत्या करण्यात आली. लक्ष्मण चांगदेव सुर्वे (वय 28) असे तरूणाचे नाव आहे. या तरुणाच्या घरात घुसून आई-वडीलांसमोर त्याला गाडीत टाकून नेत त्याची हत्या करण्यात आली. अधिक माहिती अशी की, लक्ष्मण चांगदेव सुर्वे हा तरुण आपल्या आई वडीलांसोबत बुधवारी (ता. 20) रोजी घरात असताना...
  June 21, 09:22 PM
 • सोलापूर- बाजार समिती निवडणूक पक्षावर होत नसते, असे सोयीचे विधान राजकीय पक्षांकडून केले जात असले तरी निवडणुकीत मात्र राजकीय पक्षाच्या लोकांना उमेदवारी दिली जाते. त्याचाच प्रत्यय काल मंगळवारी अर्ज माघारी घेतेवेळी आला. सहकारमंत्री गटाच्या सिद्धरामेश्वर पॅनलने काँग्रेसच्या निष्ठावंतांना जवळ करीत उमेदवारी बहाल केली तर काँग्रेसने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना कुंभारी गणातून संधी देऊन विरोधी गटाला शह दिला. पण काही मतदारसंघामध्ये नाराज अपक्षांनी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना...
  June 21, 10:22 AM
 • सोलापूर- भौतिक सोयीसुविधांसाठी होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे नैसर्गिक आपत्तीना तोंड द्यावे लागते. वेळीच जागरुक होऊन पर्यावरण संवर्धनासाठी स्वत:च्या घरापासून त्याबाबत ठोस उपाययोजना राबवण्यासह त्यात सातत्य आवश्यक आहे, असे सांगून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी प्लास्टिक बंदीची शिस्त लागण्यासाठी प्रशासनाने काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली. हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये बुधवारी प्लास्टिक व थर्माकोल बंदी, शाश्वत स्वच्छता, तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता...
  June 21, 10:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED