Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • माढा- तालुक्यातील एकाचा चवरे बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक जण दारफळ (सीना) येथील बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. दोघेही सोमवारी जनावरे चारण्यासाठी गेल्यानंतर या घटना घडल्या. जनावरांना पाणी पाजत असताना तोल गेल्याने आसिफ दिलावर झारेकरी (वय २८,रा. मोमीन गल्ली, माढा) हा पाण्यात बुडाला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. रात्री पावणेसातला हा प्रकार उघडकीस आला. माढा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. दुसऱ्या घटनेत दारफळ (सीना, ता. माढा) गावाजवळ कोल्हापूर...
  17 mins ago
 • सोलापूर- मेंदूमृत ज्येष्ठ महिलेचे यकृत, दोन मूत्रपिंड दान करण्यात आले आहेत. तसेच एका मेंदूमृत ज्येष्ठ पुरुषाचे डोळे दान करण्यात आले असून, त्यांचे अवयव काढण्याची शस्त्रक्रिया सोमवारी मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होती. या दानामुळे तिघांना जीवनदान तर चौघांचे जीवन प्रकाशमान होणार आहे.कालिका उत्तम महामुनी (वय ५५) असे महिला दात्याचे नाव आहे. तर दुसरे दाते चंद्रकांत घोळसगाव (वय ६४) आहेत. आई गेली, परंतु आईचे अस्तित्व इतरांमध्ये पाहायला मिळणार आहे, अशी भावना नागेश महामुनी यांनी दिव्य मराठीकडे...
  17 mins ago
 • सोलापूर - राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफीच्या अधिकृत संकेतस्थळावरून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गायब झाल्याने कर्जमाफीतील सावळागोंधळ समोर आला आहे. कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी सुटी संपल्यानंतर सोमवारपासून प्रक्रिया सुरळीत होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, सोमवारपासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अधिकृत संकेतस्थळावरून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याच गायब झाल्या आहेत. यावर जिल्हाधिकारी...
  24 mins ago
 • माढा- घरी अठराविश्व दारिद्र्य. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. अशा स्थितीतही जामगाव येथील लता जाधव यांनी कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी हाॅटेल व्यवसाय सुरू केला. त्याद्वारे संसार उभा केला. विशेष म्हणजे हे हाॅटेल आता सामान्य माणसापासून पुढारी, अधिकारी यांच्या आवडीचे बनले आहे. रुचकर जेवणामुळे परिसरात मान्यता पावली आहे. सुरुवातीला लता जाधव रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली चहा कँटीन चालवायच्या. तेथेच गोळ्या बिस्किटे विकायच्या. जवळील आश्रमशाळेतील विद्यार्थी तेथून खाऊ घ्यायचे. प्रवासी,...
  October 23, 10:39 AM
 • अकलूज- सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असताना अवसायनात काढणे चुकीचे आहे. त्याची २२५ ते २५० कोटींची स्थावर मालमत्ता आहे. हा कारखाना वाचवण्यासाठी न्यायालयीन लढा देऊ. त्यासाठी बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करू, असे खासदार विजयसिंह मोहिते यांनी म्हटले. शंकर कारखान्याप्रश्नी येथील शिवरत्न बंगल्यावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. श्री शंकर कारखान्याकडे निवडणूक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने शासनाने या कारखान्याची निवडणूक...
  October 23, 10:36 AM
 • कुर्डुवाडी- दीपावली सणामुळे सोलापूर - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांची प्रंचड गर्दी अाहे. अशात रविवारी (दि. २२) दुपारी तीनच्या सुमारास पत्नी गाडीत चढली तर दोन लहान मुलांसह पती स्थानकावरच राहिल्याची घटना घडली. पत्नीने प्रसंगावधान राखून चेन ओढल्याने गाडी एक किलोमीटर अंतराव थांबली. तेथून त्यांना मोटरसायकलवर आणण्यात आले. दरम्यान, वडील सोबत असूनही आईची चुकामूक झाल्याने मुलांनी हंबरडा फोडला होता. दिवाळीचा सण संपला. गावी आलेली मंडळींनी कामावर जाण्यासाठी रविवारी कुर्डुवाडी...
  October 23, 10:34 AM
 • माढा (सोलापुर)-माढा तालुक्याचे माजी आमदार रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. एम. पाटील याचे रविवारी (22 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजता पुणे येथील बिर्ला रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 92 वर्षाचे होते. एस. एम. पाटील यांनी शेकाप पक्षाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. चळवळ उभी करुन आंदोलने करीत विविध प्रश्नांवर प्रभावी कामे करीत त्यांनी जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण केली. 1967 साली ते माढा तालुक्याचे शेकाप पक्षाचे...
  October 23, 10:30 AM
 • सोलापूर- सोलापूरचे ब्रँडिंग करण्याची भाषा नुसतीच बोलली जात होती. मात्र अाता ती महापालिकेने प्रत्यक्षात उतरवली अाहे. शहरातील सर्व स्थळांची माहिती एका िक्लकवर मिळेल. असे स्मार्ट इन्फॉर्मेटिव्ह किऑस्क यंत्र एसटी स्टँड, सिद्धेश्वर मंदिर परिसर महापालिकेच्या आवारात बसवले आहे. रेल्वे स्टेशनवर बसवण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र त्यांनी भाडे मागितल्यामुळे रद्द झाला. दररोज ५०० जण माहिती घेत असल्याचे सुखद चित्रही समोर अाले अाहे. संगणकीय यंत्रावर होम पेजवर छायाचित्रे, शिक्षण, पर्यटन,...
  October 23, 10:12 AM
 • सोलापूर- गतिमंद,अंध, मूकबधिर आणि बालकामगार यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या वतीने शिक्षणाबरोबरच विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळी वस्तूंचे प्रदर्शन भरवून विक्री करण्यात आली. ग्राहकांनी यास प्रतिसाद दिला. दिवाळी काळात तीन संस्थांच्या १९२५ विद्यार्थ्यांनी ३७ हजारांचा व्यवसाय केला. सोलापूर शहरात अशा अनेक संस्था आहेत. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांना दिलेल्या...
  October 23, 10:06 AM
 • सोलाापूर -सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ हेच असावे, असा ठराव सिनेट सभागृहाने केला असला तरी तब्बल ३० नावांचे प्रस्ताव सोलापूर विद्यापीठाकडे आले आहेत. कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी ही माहिती दिली. विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. सोलापूर विद्यापीठासाठी पुढे नावे सुचवण्यात आली आहेत. शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ (अॅड. गंगाधर पटणे), महात्मा बसवेश्वर किंवा सिद्धेश्वर (शिवा वीरशैव संघटना), सिद्धेश्वर (सोलापूर विद्यार्थी संघ, सतीश राजमाने),...
  October 22, 10:06 AM
 • सोलापूर -देशभरात विविध ठिकाणी कार्यरत असताना वर्षभरात ३७९ पोलिस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले अाहेत. त्यांना शनिवारी अादरांजली वाहण्यात आली. सोलापुरात पोलिस मुख्यालयातील शहीदस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात अाले. २१ अाॅक्टोबर हा दिवस शहीद पोलिस स्मृतिदिनानिमित्त इंडीयन नेव्हीचे निवृत्त कॅप्टन प्रवीण पानसे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात अाले. पोलिस अायुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीणचे उपअधीक्षक संदीप नेटके यांच्या...
  October 22, 10:04 AM
 • उस्मानाबाद - शहरातील दुचाकी, चारचाकी वाहने, कापड, सौदर्य प्रसाधने विक्रेते, सुवर्णकार आदी व्यवसायिकांनी यावेळी दमदार व्यवसाय करत सुमारे ७१ कोटींची दिवाळी साजरी केली. जीएसटी, अतिवृष्टीचा काहींच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. बसच्या संपामुळे ग्राहक शहरातील दुकानांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे अनेक व्यावसायिकांची ओरड आहे. दुष्काळी परिस्थितीचे चार वर्ष ेसंपल्यानंतर विविध व्यवसायांना पुन्हा बहर चढत आहे. सातत्याने व्यवसायामध्ये वाढ होत आहे. यावर्षीही दिवाळीमध्ये...
  October 22, 09:45 AM
 • सोलापूर- एरवीच्या तुलनेत दिवाळीत कचऱ्याचे प्रमाण २० टक्के वाढते. अशा स्थितीत कचरा उचलण्यासाठी विशेष नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, तसे नियोजन झालेले नसल्याने शहरातील अनेक भागात कचराकुंड्या साठून आहेत. काही ठिकाणी कचरा रस्त्यावर, परिसरात विखुरला गेला आहे. रोज ३०० टन कचरा निर्माण होत आहे. पण महापालिकेने मागील चार दिवसांत सरासरी २२९ टन कचरा उचलला. हद्दवाढ भागात समावेश असलेला शहरातील सर्वात मोठ्या झोन क्रमांक पाचमध्ये चार दिवसांत फक्त ५४ टन कचरा उचलला तर सर्वात जास्त झोन क्रमांक...
  October 22, 09:43 AM
 • माढा (सोलापुर)- दिवाळी सणासाठी मामाच्या गावाला आलेल्या एका 10 वर्षीय मुलाचा विहिरीत पडुन मृत्यु झाला. ही घटना माढा तालुक्यातील अजंनगाव (खेलोबा) येथे सकाळी 7 च्या सुमारास घडली. सुमित सिध्दराम तरटे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मोहोळ तालुक्यातील हिवरे येथे तो चौथी इयत्तेत शिकत होता. सुट्टीसाठी तो मामा दशरथ अंकुश गडेकर यांच्याकडे शुक्रवारी (20 ऑक्टोबर) आला होता. शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास तो अजंनगाव येथील मामाच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत सत्यजीत तरटे या मावस भावांबरोबर गेला...
  October 21, 05:44 PM
 • माढा (सोलापूर )-जमीन माझ्या नावावर कर असे म्हणत सावत्र मुलांनी आईच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याची घटना घडली आहे. माढा तालुक्यातील केवड गावात शुक्रवारी (दि.20) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. राजाबाई उर्फ हरिशचंद्र पवार (वय 40, रा. केवड) असे खून झालेल्या महिलेचे (आईचे) नाव आहे. या प्रकरणी समीर हरिश्चंद्र पवार, राजेंद्र हरिश्चंद्र पवार, गणेश हरिश्चंद्र पवार, लक्ष्मी हरिशचंद्र पवार या तिघा सावत्र मुलासह व एक सावत्र मुलगी अशा चौघांविरोधात माढा पोलिसात खुनाचा गुन्हा...
  October 21, 01:20 PM
 • उस्मानाबाद परंडा -राज्यपरिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा गुरुवारी (दि.१९) तिसरा दिवस होता. या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरी भागात खासगी बस तर ग्रामीण भागात मालवाहतुकीची वाहनेच प्रवाशांचा आधार बनली आहे. दरम्यान, अनेक पक्ष, संघटनांकडून या संपाला पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे तोडगा निघणार कधी, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेऊन दि.१७ ऑक्टोबरपासून संपाचे...
  October 20, 10:28 AM
 • सोलापूर -माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांच्या सोबो फिल्म कंपनीने निर्मित केलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेने तब्बल सात पुरस्कार पटकावले अाहेत. उत्कृष्ट मालिका, कलावंतांसाठीचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. त्यात लागिर झालं जीबरोबरच तुझ्यात जीव रंगला मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचाही पुरस्कार पटकावला आहे. निर्मितीच्या क्षेत्रात स्मृती शिंदे यांचा प्रवेश २०११ मध्ये झाला. त्यांनी सोबो फिल्म ही निर्मिती संस्था सुरू केली. बोले तो मालामाल,...
  October 20, 10:26 AM
 • सोलापूर -यंत्रमागकामगार भविष्य निर्वाह निधीसंदर्भात सोलापुरात सुरू असलेला संघर्ष ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत सांगितला. त्यावर श्री. फडवणीस म्हणाले, कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. २५ ऑक्टोबरनंतर सर्वांना बोलावतो. निश्चित तोडगा काढू. येत्या बुधवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू साेलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते कामगारांच्या घरकुलांचे भूमिपूजन आयोजित केले अाहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी श्री. आडम यांनी वर्षावर...
  October 20, 10:24 AM
 • सोलापूर -गतवर्षात केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात शहराचा क्रमांक १२६ वर गेला. पुढील वर्षात शहराचा पुन्हा सर्व्हे केला जाणार आहे. त्यासाठी शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. चार गुणांचा सर्व्हे असून, यात नागरिकांचा सहभाग ३५ टक्के असणार आहे. चार हजार पैकी पहिल्या टप्प्यात १४०० गुणांवर आधारित काम महापालिकेस करावे लागेल. त्यासाठी महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी मनपा झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षकांची बैठक घेत याबाबत माहिती दिली. जानेवारी महिन्यात...
  October 20, 10:24 AM
 • सोलापूर- राज्य शासनाने कर्जमाफी देण्याची घोषणा केली, त्यानुसार त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू केली, ही समाधानाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने ही याेजना यशस्वी व्हायची असेल तर वास्तव लक्षात घेणे अावश्यक आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ केले, पण दीर्घ मुदतीचे पीककर्ज माफ करण्यासाठी अट घातली आहे. एकीकडे देशातील अनेक कुटुंबांकडे कोट्यवधी रुपयांची कर्जे थकीत असताना दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी अट घातली जात अाहे. दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेले अनेक शेतकरी...
  October 20, 03:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED