Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- सिद्धरामेश्वर यात्रेतील होम विधी आणि भाकणुकीचे कार्यक्रम रविवारी मध्यरात्री एकनंतर पार पडले. तत्पूर्वी, सातही मानाच्या नंदीध्वजांची मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवार पेठेतील कालिका मंदराजवळ नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना घडली तेव्हा हजारो भाविक यात्रेत सहभागी झाले होते. व्यत्यय आल्यानंतर सिद्धेश्वर भक्तांनी अडीच तासांत नवीन नंदीध्वज आणून नागफण्याने सजविला आणि मिरवणूक होम मैदानाकडे मार्गस्थ...
  January 15, 03:02 PM
 • कुर्डुवाडी - माढा तालुक्यामध्ये उडीद, मूग व मका हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले होते. मात्र अचानक मका हमीभाव खरेदी केंद्र बंद झाले तर तूर खरेदी अद्याप सुरू नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रश्नाकडे कोणत्याही राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांचे दुर्लक्ष होत आहे. फेडरेशनचे अधिकारी आदेशच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील बाजार समितीमध्ये उडीद खरेदी सुरू करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये बंद झाले. यानंतर मका खरेदी सुरू करण्यात आले. या वेळी गोदाम नसल्यामुळे पाच दिवस खरेदी बंद...
  January 15, 09:07 AM
 • सोलापूर - माणिक चौक ते विजापूरवेस दरम्यानच्या कालिका मंदिराजवळील व्यत्ययानंतरही सिध्देश्वर भक्तांनी केलेल्या धडपडीनंतर अडीच तासात नव्याने सजवलेल्या नागफणा नंदीध्वजाची मिरवणूक मार्गस्थ झाली. २५ किलो वजनाचे साहित्य घेऊन एक किलोमीटर चालणे जिकिरीचे होते. मात्र, श्री सिद्धरामेश्वर यांचा जयघोष करत १५० किलो वजनाचा नंदीध्वज घेऊन दोन किलोमीटरचे अंतर एकट्या सोमनाथ मेंगाणे यांनी रविवारी पार केले. नागफणीचा नंदीध्वज सोडता इतर नंदीध्वज धरून नेण्यासाठी प्रत्येकी दीडशे सेवेकरी लागले....
  January 15, 09:07 AM
 • सांगली-मकर संक्रांतीचे अाैचित्य साधून रविवारी सांगलीत सामाजिक समतेचा संदेश देणारी सद्भावना एकता रॅली काढण्यात अाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, खासदार अमर साबळे यांच्यासह सर्व स्थानिक लाेकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती हाेती. सर्वसामान्य नागरिकांसह मान्यवरांनी या वेळी जातीय सलाेखा, सामाजिक एेक्य कायम राखण्याची शपथ घेतली. सकाळी दहा वाजता पुष्कराज चौकातून सुरू झालेल्या या तीन किलाेमीटर रॅलीचा शिवाजी स्टेडियममध्ये समाराेप झाला....
  January 15, 02:00 AM
 • उस्मानाबाद - तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात चरणतीर्थ पूजेवेळी मिळणारी दक्षणा व नंदादीपातील तेल घेण्यास महंत तुकोजी बुवा यांच्यावर विश्वस्त समितीने घातलेले निर्बंध औरंगाबादच्या महसूल न्यायाधीकरणाने तात्पुरते शिथील केले. विश्वस्थांचे मत सादर होईपर्यंत जैसे थेचे आदेश दिले. यासंदर्भात अॅड. शिरीष कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे विश्वस्थ अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, सदस्य उपविभागीय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार दिनेश झांपले,...
  January 14, 09:35 AM
 • सोलापूर- जवळपास तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत सोलापुरातील शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचा विवाह सोहळा शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पार पडला. या यात्रेचे विशेष म्हणजे अनेक राजकीय मंडळींनी यात हजेरी लावली आणि रांगोळीच्या पायघड्यांनी सर्वांची मने जिंकली. मागील ८०० ते ९०० वर्षांपासून हा प्रतिकात्मक विवाह सोहळा होत आहे. यात मानाच्या सात नंदीध्वजांना श्री सिद्धेश्वर देवस्थान परिसरातील सम्मती कट्ट्याजवळ नगर प्रदक्षिण करीत आणण्यात येते. येथे हा विवाह सोहळा होत असतो. या...
  January 14, 02:00 AM
 • सोलापूर - राष्ट्रीयकृत बँकांकडून पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवांवर शुल्क आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारणी खातेदारांवर केली जात आहे. वर्षातील पहिल्यांदा मोफत लाभ घेता येऊ शकेल. दुसऱ्या वेळी लाभ घ्यायचा असल्यास मात्र शुल्क व त्यावर १८ टक्के कर आकारणी केली जात आहे. १ जुलैपासून जीएसटी आकारणीची अंमलबजावणी सुरू आहे. यास बँक ऑफ इंडियाचे प्रशांत निशाणदार यांनी दुजोरा देत प्रत्येक बँकेचे सेवा शुल्क वेगवेगळे असले तरी त्यावर जीएसटी मात्र १८ टक्के अाकारणी करीत आहेत. यापूर्वी १५ टक्के...
  January 13, 09:48 AM
 • सोलापूर - सिद्धेश्वर गड्डायात्रेस शुक्रवारी अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करीत, सनई चौघड्यांचा मंजूळ आवाज, भक्तिगीते व हलग्यांच्या कडकडाट होता. पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या शेकडो भक्तांच्या उपस्थितीत सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक (यण्णीमज्जन) झाला. नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला. मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात...
  January 13, 09:42 AM
 • सोलापूर - बुधवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेली बैठक परिणामकारी झाल्याचे दिसत आहे. यापुढील काळात महापालिकेच्या बाबतीत होणारे निर्णय पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सामूहिक पद्धतीने घेणार आहेत. यासाठी भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची एक समितीही गठित करण्यात येणार असून याच्या समन्वयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे सोपवली आहे. गठित होणाऱ्या समितीत दोन्ही मंत्री, खासदार अॅड. शरद...
  January 12, 08:39 AM
 • सोलापूर- नारायण राणे हा विषय आता शिवसेनेसाठी संपला आहे. राणे आणि शिवसेना यांचा कोणताही संबंध नाही. १० वर्षांपूर्वीच त्यांनी पक्ष सोडला असल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विषय नगण्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. डॉ. गोऱ्हे यांनी बुधवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे दर्शन घेतले. देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, अस्मिता गायकवाड, शाहू...
  January 11, 08:23 AM
 • सोलापूर- सोलापूरचा कारभार नीट करा, नाही तर सोलापूर महापालिका बरखास्त करू, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मध्यरात्री सोलापूर महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांसह सहकारमंत्री सुभाष देशमुख राज्यमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सुनावले. या बैठकीसाठी केवळ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले होते. पण मुख्यमंत्र्यांनी एेनवेळी सगळ्याच नगरसेवकांना पाचारण केल्याने दुपारी सगळे नगरसेवक मुंबईला रवाना झाले. खासदार शरद बनसोडे मात्र सोलापुरातच थांबून होते....
  January 11, 08:19 AM
 • आळंद- समाजातील घडवून आणलेल्या जातीय हिंसाचाराची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा. घटनेचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी. या घटनेला जबाबदार म्हणून हिंदू एकता समितीचे मिलिंद एकबोटे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करावी, अशा मागण्या आळंद बंद आंदोलना करण्यात आल्या. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी दलित मुस्लिम समन्वय समितीच्या वतीने...
  January 11, 08:16 AM
 • सोलापूर- शहर, जिल्ह्यात २०१४ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत रोज चार अपघात झाले असून, यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला आहे. अपघात होण्यामागे नागरिकांचे दुर्लक्ष हलगर्जीपणा या कारणाशिवाय रस्त्यांवरील खड्डे, धोकादायक वळणे अपघातानंतर मिळणारी वैद्यकीय मदत ही कारणेही कारणीभूत ठरली आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विना अपघात वाहतूक सुरळीत होण्यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृती रस्ता सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा...
  January 11, 08:14 AM
 • केंद्रात आणि राज्यात सत्तापालट झाल्यानंतरही बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँगेस, राष्ट्रवादीची राजवट असायची. ही मक्तेदारी मोडण्यासाठी भाजप सरकारने महापालिका व जिल्हा परिषदा वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. अगदी गाव पातळीवरच्या सरपंचांची निवडदेखील सर्व ग्रामस्थांच्या मतदानातून झाली. या बदलाचा भाजपला फायदाही झाला. थेट निवडणुकीतून सरपंचपद भाजपकडे बऱ्याच गावांतून आले. याच अनुभवातून...
  January 11, 02:30 AM
 • सोलापूर- आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) साठी बार्शीच्या अमर देवकर यांच्या म्होरक्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या फेस्टिव्हलमधील मराठी चित्रपट स्पर्धा विभागात महाराष्ट्रातून केवळ सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यात म्होरक्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे देवकर यांनी स्वत:ची शेती विकून चित्रपट बनवण्याचे स्वप्न साकार केले. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रॉडक्शन आणि अमर चित्रवाणी यांची संयुक्त निर्मिती असलेला म्होरक्या हा चित्रपट...
  January 10, 08:55 AM
 • सोलापूर- सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी हित जोपासण्यासाठी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत देण्याची सुविधा प्रत्येक विद्यार्थ्यांना दिली आहे. अर्थात या सुविधेसाठी फी भरून अर्ज करावा लागतो. पण खरी समस्या पुढेच येते. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत विद्यार्थ्यांच्या हाती आल्यानंतर त्यात काही चुका आढळू शकतात. कधी गुणच दिले नाहीत. कधी बेरीजच चुकली. कधी एखादा प्रश्न तपासलाच गेला नाही, असे विद्यार्थ्यांना आढळून येऊ शकते. असे झाल्यास करायचे काय ? हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येतो. पण एक...
  January 10, 08:47 AM
 • सोलापूर- नाट्यमय घडामोडींनी महापालिकेतील राजकारणाला मंगळवारी वेगळीच कलाटणी मिळाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाच्या १६ नगरसेवकांच्या मदतीला शिवसेना एमअायएमचे नगरसेवक धावून आले आणि विभागीय कार्यालये चक्क वाटून घेतली. त्यांची गुप्त हातमिळवणी काँग्रेस राष्ट्रवादीला गाफील ठेवण्यात यशस्वी झाली. त्यामुळे काँग्रेसच्या हाती धुपाटणेच आले. पालकमंत्री गटाचे ३५ नगरसेवक गैरहजर राहणार असे दिसून आल्याने सहकारमंत्री गटाने शिवसेनेचे महेश कोठे यांच्याशी हातमिळवणी केली. दोन झोन समित्या...
  January 10, 08:32 AM
 • सोलापूर- गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासन अनुदानाच्या माध्यमातून मदत करीत आहे. मात्र फक्त शासनाचे अनुदान मिळते, म्हणून प्रस्ताव सादर करू नका. शेतकरी गटाच्या क्षेत्राचा शेतकऱ्यांचा विचार करून गटाचे भाग भांडवल वाढवावे, गटाची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात कृषी विभागाकडील योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी माजी कॅप्टन परदेशी, अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज...
  January 10, 08:28 AM
 • सोलापूर- शासनाच्या योजना शासनाने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी लोकांमध्ये मिसळले पाहिजे. लोकांमधून मिळणाऱ्या प्रतिक्रियांवरूनच प्रशासनाचा गाडा अधिक चांगल्या प्रकारे हाकण्यास मदत होते. हा माझा आतापर्यंतच्या शासकीय सेवेतील अनुभव आहे. पंढरपूर येथील नामदेव महाराज स्मारकाचे उदाहरण सांगत नुसत्या सूचना वा आदेश देऊन कामांचा आढावा घेता येत नाही. प्रत्यक्षात ठिकाणाची पाहणी, भेटी देऊन कामे पूर्ण करण्यावर भर असतो, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले....
  January 10, 08:22 AM
 • सोलापूर- काँग्रेस सरकारने विकासाच्या अनेक योजना आणल्या होत्या. पण आम्हाला त्याचे मार्केटिंग करता आले नाही. त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुरू आहे. न केलेल्या कामांचे उद्घाटन करत ते श्रेय लाटतात, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीअक्कलकोट (जि. सोलापूर) येथे एका कार्यक्रमात केली. केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची परंपरा भाजपमध्ये आहेच आणि ती वरपासून पाळली जाते असा टोलाही शिंदेंनी लगावला. दक्षिणेतील राजकारणावर केले होते भाष्य...
  January 9, 04:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED