Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- रेल्वेच्या विजेच्या खांबावरून तोल जाऊन पडल्याने नीलेश अशोक कोळी (वय ३०, रा. कुर्डुवाडी, नेमणुकीचे ठिकाण वाडी, कर्नाटक) या युवकाचा मृत्यू झाला. नीलेश हा त्याच्या वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मदतनीस म्हणून नोकरीस लागून केवळ आठच दिवस झाले होते. कोणतेही प्रशिक्षण पूर्ण करून न घेताच त्याला कामावर जुंपण्यात आल्याने हा जीवघेणा अपघात घडला. गुरुवारी ही सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. नीलेश खांबावर चढल्याच्या दहा मिनिटांतच सुमारे वीस फुटांवरून पडला. त्यांच्या पाठीला व...
  June 14, 09:46 AM
 • सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकारणात १७ जणांना अंतरिम अटकपूर्व मंजूर अाहे. त्यांच्यासह नऊ जणांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. जी. हेजीब यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, बाजार समितीचे माजी पदाधिकारी दिलीप माने, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंडा पाटील यांच्यासह १७ जणांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला असून त्यांना बुधवारी सुनावणी न्यायालयात हजर राहण्याचे अादेश अाहेत. तत्कालीन संचालक मंडळांनी ३९ कोटी ६ लाखांचा गैरव्यवहार...
  June 13, 11:23 AM
 • सोलापूर- २०१५ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी भय्यूजी महाराजांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यावेळी उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. ती त्यांची सोलापूरची शेवटची भेट ठरली. सोलापूरचे आणि भय्यूजी महाराज यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या सूर्योदय परिवारात अनेक साधक कार्यरत होते. सांगोला येथे त्यांनी निवासी आश्रम शाळा स्थापन करून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दार उघडे केले होते. तुळजापूर तालुक्यात शाळा स्थापन केल्या होत्या. ८ वर्षांपासून...
  June 13, 10:54 AM
 • अकलूज- वेळापूर (ता. माळशिरस) येथे गर्भलिंग निदान व गर्भपात करणारे डॉक्टर दांपत्य पोलिसांमुळेच पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पोलिस अधीक्षकांनी या घटनेच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींवर कारवाईसाठी येथील डॉटर मॉम फाउंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेळापूर येथील आनंद मॅटर्निटी व सर्जिकल नर्सिंग होम आणि दोशी अल्ट्रासाउंड या दवाखान्यात डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री दोशी हे डॉक्टर दांपत्य बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपासणी व गर्भलिंग निदान करत असल्याची...
  June 13, 10:38 AM
 • माढा- पुण्याच्या सभेत मी तिसऱ्या आघाडीचा विषय बोललोच नाही. शक्य तिथे समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास भाजपला पर्याय देता येईल, असे मी म्हणालो होतो. तसेच शिवसेनेला आॅफर द्यायचा किंवा त्यांना तिसऱ्या आघाडीत येण्याचे निमंत्रण द्यायचा विषयच कुठे येतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. मंगळवारी कुर्डुवाडी येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माेदीविराेधी अाघाडीत शिवसेनेला साेबत घेणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, अशी काही चर्चा झाली नाही. तशी...
  June 13, 03:43 AM
 • माजलगाव (जि. बीड)- पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर असलेल्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या जालना जिल्ह्यातील भाविकांची बोट गोदापात्रात उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. वेळीच मदत मिळाल्याने २८ प्रवासी बालंबाल बचावले. यात्रेनिमित्त पैठणच्या नाथसागरातून पात्रात पाणी सोडलेले आहे. सोमवारी परतूर तालुक्यातील रेवलगाव, रामनगर येथील २८ भाविक दर्शनासाठी बोटीतून पुरुषोत्तमपुरीला आले होते. परत जात असताना अप्रशिक्षित चालक आणि...
  June 12, 10:12 AM
 • सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुंभारी मतदारसंघात माझ्या उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या मोठी आहे. अर्ज भरला आहे, मी निवडणूक लढवणार आहे. कोणाला विचारण्याची गरज नाही. निवडणुकीत कोणाशी युती करणार नाही, कोणाशी आघाडी करणार नाही. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी लढवावी. कुंभारी येथे शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. त्यांनी योग्य उमेदवार निवडावा असे आवाहन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. बाजार समितीसाठी निवडणूक सुरू आहे. १९...
  June 12, 10:02 AM
 • सोलापूर- महापालिकेत भाजपच्या कारभाराला जनता वैतागली आहे, अशी कबुली भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी सोमवारी महापालिकेत पत्रकारंापुढे दिली. भाजपच्या काळात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे कारणही त्यांनी यावेळी नमूद केले. दुसरीकडे पक्षाच्या बैठकीत निरीक्षकांपुढे कार्यकर्त्यांनी कारभारावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनीही घरचा आहेर दिला. अॅड. बनसोडे यांनी सोमवारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकाविषयी चर्चा...
  June 12, 09:55 AM
 • वेळापूर- वेळापूर (ता. माळशिरस) येथील आनंद मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम, दोशी अल्ट्रासाउंड क्लिनिकची जिल्हा अारोग्य विभागाच्या पथकाने साेमवारी (दि. ११) दुपारी तपासणी केली. यात गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉ. आनंद दोशी, डॉ. जयश्री दोशी या दांपत्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने डॉक्टर दांपत्याने पलायन केले. गर्भपात केंद्राची मान्यता नसतानाही दोशी दांपत्य गर्भपात करत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ....
  June 12, 09:50 AM
 • सोलापूर- विमानसेवेत अडथळा ठरत असलेल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीसाठी पर्यायी जागा देण्याबाबत विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पण त्यांचा अंतिम अहवाल आम्हाला मिळाला नाही. त्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार फ्लाईंग झाेनच्या पाच किलोमीटर परिसरात चिमणी उभारता येणार नाही. कमी उंचीच्या दोन चिमण्या उभारणे शक्य आहे का, याची तांत्रिक बाजू तपासून कारखाना व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. हा...
  June 12, 09:39 AM
 • माढा (सोलापुर)-शिक्षण घ्यायला आणि शिकायला कधी वयाचे बंधन नसते असे म्हणतात वयाच्या साठी सत्तरीतही दहावी बारावी परीक्षा पास होण्याच्या अनेक बातम्या तुम्ही आम्ही पहिल्या किंवा वाचल्या असतील मात्र माढा तालुक्यातील वडाचीवाडी (त.म) येथिल वडील आणि मुलगा एकाच वेळी दहावी पास झालेत.विशेष म्हणजे या पिता पुत्रांना 57 टक्केच गुण मिळालेत. या गोष्टीची (प्रकाराची )सोशल मीडियासह तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे. शिवाजी ढेकळे व विश्वजीत ढेकळे अशी या दोघा पिता पुत्राची नावे आहेत. शिवाजी ढेकळे हे...
  June 11, 07:40 AM
 • सोलापूर- मंजूर बंधाऱ्याच्या ठिकाणी खोदकाम न करता साखर कारखान्याच्या आयत्या खड्ड्यात बंधारा बांधून लघुसिंचन अधिकाऱ्यांनी नऊ लाखांचा निधी लाटला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या अंदाजपत्रकावर व्हाईटनर लावून हा ब्लॅक उद्योग केला आहे. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब माहीत असल्याची माहिती मिळत अाहे. लाटलेल्या निधीचे सिंचन त्यांच्याही खिशात झाल्याने इतके दिवस या प्रकरणावर पांघरूण घालण्यात आले आहे.लघु सिंचन विभागाच्या सोलापूर कार्यालयात घोटाळा झाल्याची बाब समोर येत आहे....
  June 11, 04:14 AM
 • सोलापूर - पंतप्रधान कार्यालयाने फटकारल्यानंतर सोलापूर विभागातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम फास्ट ट्रॅकवर येत नाही. दुहेरीकरण व विद्युतीकरणाबाबत वारंवार तक्रारी करूनही काम मार्गी लागत नसल्याने रेल्वे बोर्डचे वित्त आयुक्त ए. के. प्रसाद यांनी थेट दिल्लीहून सोलापूर गाठले. शनिवारी सोलापूर ते गुलबर्गा दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर डीआरएम कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी आरव्हीएनएलच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. निधी उपलब्ध असताना कामे...
  June 10, 10:32 AM
 • सोलापूर - नवी दिल्ली -आग्रा रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांत चोरी करून सिकंदराबाद येथे जाणाऱ्या हरियाणा येथील चार चोरांना मुंबई -हैदराबाद एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून सोलापूर आरपीएफने शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई दोन दिवसांपूर्वी सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान करण्यात आली असून त्यांच्याकडून अडीच लाख रोख रक्कम तर ८ मोबाइल जप्त करण्यात आले. सुरेन्द्र कुमार मुन्शीराम (वय ३६,रा. साेरखी, ता. हंसी, जि. हिसार), जगदीश चरणदास (वय ३८, रा. लोहारी राधे, ता.नारोंद, जि.हिसार), रामदिया दीपचंद...
  June 10, 10:24 AM
 • सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात गुरुवारी सकाळी ८.३० ते शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत तब्बल ९५.५ मि.मी. पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. पहाटे अडीच ते साडेपाचपर्यंत ४८.३ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ११.६० पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. सर्वाधिक पाऊस उत्तर सोलापूर तालुक्यात ३५.२४ मि.मी. पाऊस झाला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील अपेक्षित पावसाच्या १२९ टक्के म्हणजे ३५.११ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी...
  June 9, 11:20 AM
 • सोलापूर-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३९ कोटी ६ लाख ३९ हजार कथित गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सभापती, सदस्य, सचिव यांच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह पाच जणांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला. अन्य संचालकांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. या सगळ्यांच्या अटकपूर्व जामिनावर येत्या सोमवारी (ता. ११) अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. जी. हेजीब यांच्या समोर सुनावणी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी या खटल्याची सुनावणी...
  June 9, 11:17 AM
 • सोलापूर- वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अघोषित संप सुरू केला. सांगोला वगळता सर्वत्र संपास प्रतिसाद मिळाला. सोलापूर विभागातील १४६० पैकी सुमारे १५० बस मार्गावर धावल्या. अचानक संप केल्याने प्रवाशांची ऐनवेळी तारांबळ उडाली. अनेक प्रवासी रात्री बारानंतर स्थानकावर अडकले. त्यांना सकाळपर्यंत थांबावे लागले. शुक्रवारी दिवसभर प्रवाशांचे हाल होत राहिले. एसटी प्रशासन मात्र काहीच करू शकले नाही. वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी...
  June 9, 11:13 AM
 • सोलापूर- केंद्र शासनाकडून शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या अनेक योजना राबविल्या जात असताना अधिकाऱ्यांकडून योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न होत नाही. शेतकरी अपघात विमा योजना, रोजगार हमी योजना, महावितरणच्या योजना व सर्व शिक्षा अभियानाबाबत अधिकारी लक्ष घालत नसल्याचे बैठकीत दिसून आले. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी बैठकीत अपूर्ण माहिती सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. तर केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या...
  June 9, 11:06 AM
 • पुणे/सोलापूर- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला. बारावीप्रमाणे इयत्ता दहावीतही मुलींनीच बाजी मारली. सोलापूर जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात एकूण ९४.८० टक्के मुली आणि ९०.३२ टक्के मुले उत्तीर्ण झाले. गत वर्षी जिल्ह्याचा ९२.४७ टक्के इतका निकाल लागला होता. यंदा ०.२० टक्क्यांनी निकाल कमी लागला असून, जिल्ह्याचा निकाल ९२.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात ६५ हजार ८८१...
  June 9, 10:55 AM
 • सोलापूर- एका अपघातात मेंदूमृत झालेल्या कृष्णाहरी बोम्मा यांच्या अवयवदानाची मोहीम गुरुवारी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) यशस्वी झाली. यकृत, दोन मूत्रपिंड दान केल्याने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. पूर्व भागातील एका टेक्स्टाईलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या कृष्णाहरी बोम्मा (वय ४६) यांचा ५ जून रोजी रिक्षाची धडक बसून अपघात झाला. मेंदूला गंभीर दुखावत झाली. ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले....
  June 8, 10:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED