Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - भटक्या विमुक्त, आेबीसी व एसबीसी प्रवर्गातील समूहांना क्रिमिलेयरच्या अटीतून वगळण्याची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केली आहे. त्याचा अहवाल शासनाला दिला आहे. त्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत हरकती मागवल्या आहेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यास या सर्व समूहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळवण्यात अडचणी येणार नाहीत. पूर्वी नोकरी आणि व्यवसायातील एकूण उत्पन्न ६ लाखांच्यावर असू नये, अशी अट होती. ही मर्यादा ८ लाख करण्याचा निर्णय नुकताच झाला. परंतु ही अटच वगळण्याची मागणी सातत्याने...
  October 11, 04:30 AM
 • सोलापूर- कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात यंत्रमागावरील उत्पादन बंदचा सोमवारी तिसरा दिवस होता. दिवाळीच्या तोंडावर रस्त्यावर आलेल्या कामगारांनी हलग्या वाजवून कारखानदारांचे लक्ष वेधले. परंतु ते ऐकण्यासाठी कोणीच आले नाहीत. निवेदन देण्यासाठी संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ यंत्रमागधारक संघाच्या कार्यालयासमोर गेले. तिथे कोणीच पुढे आले नाहीत. त्यामुळे गेटलाच ते डकवण्यात आले. कारखानदारांचा धिक्कार करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत कामगार परतले. दुसरीकडे मनसेप्रणीत...
  October 10, 10:55 AM
 • सोलापूर- चिकमहूद (सांगोला)येथे शुक्रवारी गुडमाॅर्निंग पथकाने उघड्यावर शौचास गेलेल्या महिलेच्या गळ्यात हार घालून फोटोसेशन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सीईअो राजेंद्र भारुड यांना सोमवारी घेराव घालून धारेवर धरले. यावेळी बाजू मांडताना भारुड म्हणाले, मी महिलांना हार घातला नाही, अपमानित करण्याचा उद्देश नव्हता, त्या माझ्या अाईसमान अाहेत. संतप्त महिला म्हणाल्या, अाईसमान म्हणता तर त्यांच्या अब्रूचे िधंडवडे का उडवले? फोटोसेशन का केले, फोटोसाठी पोज...
  October 10, 10:43 AM
 • सोलापूर- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) नवजात शिशू अतिदक्षता विभागात महिन्याकाठी सरासरी १६ ते १८ टक्के नवजात बालकांचा मृत्यू होतो. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात नवजात शिशू मृत्यू प्रमाणाची माहिती घेतली असता कोल्हापूर - १२ ते १५ टक्के, लातूर - २०.१ टक्के, मिरज- २२ टक्के असे सरासरी प्रमाण आहे. कमी कालावधीमध्ये जन्मल्याने मेंदू विकृती, श्वास- अन्न नलिकेच्या समस्या तसेच प्रमाणापेक्षा अति कमी वजन, शारीरिक व्यंग आदी नवजात...
  October 10, 10:20 AM
 • सोलापूर- प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन माढा शहर व परिसरातील बेरोजगार तरुणांना लाखोंचा गड्डा घालणाऱ्या सुधीर मानेचा ताबा विजापूर पोलिसांनी घेतला आहे. तर माध्यमिक शिक्षक जहाँगीर चांद तांबोळी याचा जामिन माढा न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. शर्मा यांनी फेटाळला आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. विशाल सक्री यांनी काम पाहिले. माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांनी या आरोपींना अटक केली होती.अटक करुन त्यांना कोर्टासमोर हजर केले असता या दोघा संशयित...
  October 9, 07:57 PM
 • सोलापूर- जीएसटी (वस्तू सेवा कर) या नव्या कर प्रणालीच्या व्यवहाराची ही पहिली िदवाळी मिठाई गोड करणारी ठरली असली तरी एकूणच परिणाम म्हणून मागणी घटल्याचे मिठाई विक्रेत्यांनी म्हटले अाहे. तर दुसरीकडे १२ टक्के जीएसटीमुळे सुकामेवा महागला अाहे. वेगवेगळ्या सुकामेव्याचे एकच गिफ्ट पॅकेट घ्यायचे म्हटल्यावर त्यावर साधारण १५ ते १८ टक्के जीएसटी असल्याने सुट्या खरेदीवर भर असल्याचे दिसून येत अाहे. येत्या सोमवारपासून िदवाळीचे उत्सव सुरू होतील. त्यामुळे खरेदीची लगबग हळूहळू मार्केटमध्ये दिसू लागली...
  October 9, 09:36 AM
 • सोलापूर- सोलापूर-पुणे पॅसेंजरला आधीच्या डब्यांच्या ठिकाणी आता लोकलचे डबे वापरणे सुरू झाले आहे. उरलेल्या सोलापूर -रायचूर पॅसेंजर, सोलापूर -गदग पॅसेंजर, सोलापूर -फलकनामा पॅसेंजर, सोलापूर -विजापूर पॅसेंजर आदी गाड्यांचे जुनाट डबेही बदलण्यात येणार आहेत. त्यांनाही लोकलचे डबे वापरण्यात येणार आहेत. एक ते दोन महिन्यात हा बदल होईल. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. हे डबे चेन्नई येथील रेल्वेच्या कारखान्यात तयार केले जात आहेत. लोकलचे डबे जोडल्याने...
  October 9, 09:34 AM
 • सोलापूर- केंद्र,राज्य आणि महापालिकेतील भाजपच्या अन्यायकारक, चुकीच्या धोरणांमुळे गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने हा जनतेचा आक्रोश मोर्चा बुधवारी दुपारी वाजता काढणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाला कॉँग्रेस भवन येथून सुरुवात होईल. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. तेथून तो महापालिकेकडे नेण्यात येणार आहे. महापालिकेसमोर त्याचे सभेत रूपांतर होईल. आयुक्तांना निवेदन दिले जाईल, असेही...
  October 9, 09:26 AM
 • सोलापूर- एमएसईबी उपअभियंता संघटना एमएसईबी अभियंता सहकारी पतसंस्था या दोन्ही संघटनेने गेल्या २० वर्षांपासून पगारातला काही वाटा काढून गरजू होतकरूंना मदतीचा हात पुढे केला आहे. आजपर्यंत त्यांनी स्कूल बस, पाण्याची टाकी, रुग्णवाहिका, हॉल बांधून देणे आदी अनेक मदतीचे कार्य त्यांनी केले आहे. समाजाचे देणे लागतो या विचाराने आपल्या पगारातून काही तरी रक्कम गरजूंना द्यावी, असे २० वर्षांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटले. यावर चर्चा झाली अन्् सर्वानी एकमताने मंजुरी दिली. प्रथम बोटावर...
  October 9, 09:18 AM
 • सोलापूर-जुळे सोलापुरातील सावन हाॅटेल, सपना लाॅजमध्ये मुंबई येथून दोघा तरुणींना अाणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल हाॅटेल व्यवस्थापक एजंट यांना अटक झाली होती. शनिवारी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी माहेश्वरी पटवारी यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवस पोलिस कोठडी देण्यात अाली. हाॅटेल मॅनेजर रमेश रामचंद्र बोडगेवार (वय ३६, रा. प्लाॅट नंबर दोन, बिलालनगर, जुळे सोलापूर), एजंट हितेश हस्तीमल अोसवाल (वय ३९, रा. रूम नंबर १०१, स्वराली अपार्टमेंट, सार्थकनगर, वाघोली- हवेली, पुणे)...
  October 8, 11:20 AM
 • सोलापूर -सोलापूर विद्यापीठाच्या १४ व्या युवा महोत्सवास उद्या मंगळवेढा येथील संत दामाजी महाविद्यालयात सुरू होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सुमारे ४५ महाविद्यालयांतील १५०० विद्यार्थी युवा महोत्सव प्रांगणात दाखल होणार आहेत. विविध २६ कलाप्रकारांतून विद्यार्थी सहभाग नोंदवतील. सर्वाधिक स्पर्धा गाजवून सर्वाधिक सांघिक वैयक्तिक यश मिळविणारे महाविद्यालय हे जनरल चॅम्पियनशिपचे विजेते ठरतात. विद्यापीठ युवा महोत्सवाच्या आतापर्यंतच्या १३ जनरल चॅम्पियनशिप चषकांपैकी...
  October 8, 11:17 AM
 • सोलापूर -कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात उत्पादन बंद ठेवून कारखानदारांनी कामगारांची अवहेलना केली. त्यांची दिवाळी काळी ठरवली. यंत्रमागधारकांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी दिला. कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने शनिवारी जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. कारखानदारांचा बंद शनिवारपासून सुरू झाला. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगार रस्त्यावर आले. त्याचा प्रचंड रोष नेत्यांनी व्यक्त केला. मनसेप्रणीत...
  October 8, 10:55 AM
 • सोलापूर -पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्य यांची माहिती आनंद घेता यावा, या दृष्टीने राज्यातील २०० निवडक किल्ल्यांमध्ये निवास व्यवस्था उभी करण्याचे सूतोवाच राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी केले आहे. यासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याशी समन्वय साधण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. त्यानुसार ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था झाली तर पर्यटनाला उत्तम चालना मिळू शकते. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात अशी व्यवस्था झाली तर शहर...
  October 8, 10:53 AM
 • सोलापूर-एकही भूल कमल का फुल,अच्छे दिन आने वाले है, मोदीजी जाने वाले है, भाजप सरकार मजेत मस्त, सामान्य जनता त्रस्तच त्रस्त, जनता उपाशी सरकार तुपाशी, भाजप सरकार नव्हे ब्लू व्हेल गेमच, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? आदी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चात शनिवारी ऐकू आल्या. इंधन दरवाढ, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, गॅस दरवाढ, सोलापुरातील मिनी आणि मेजर गाळेधारकांना रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी करावी, सध्याचे गाळे त्यांना कायमस्वरूपी विकत...
  October 8, 10:42 AM
 • 95 MY FM सोलापुरची राणी RJ श्रद्धाने कोल्ड स्टोरेजची एक भन्नाट स्टोरी आपल्यासोबत शेअर केली आहे. या स्टोरेजमध्ये एक व्यक्ती कशी अडकते. त्यानंतर त्याची त्यातून कशी सुटका होते. विशेष म्हणजे त्याची एक सवय त्याची कशी सुटका करते हे बघण्यासारखे आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा आरजे श्रद्धाची स्टोरी....
  October 7, 08:43 PM
 • उस्मानाबाद -जिल्ह्यात अवेळी वेळी सुरू असलेल्या भारनियमनाचा फटका बीएसएनएलच्या ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे. मुख्य कार्यालयातील वीज सेवा पूर्ण ठप्प झाल्यामुळे बिल भरणे, आधार अन्य सेवा पूर्णपणे ठप्प होत आहेत. येथील जनित्रही बंद असल्यामुळे ग्राहकांना काम होण्यासाठी तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत अाहे. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अन्य कामांचा खोळंबा होत असल्याने तेही वैतागले आहेत. महावितरणकडून वेळी अवेळी करण्यात येत असलेल्या भारनियमनाचा फटका सर्वच कामांना बसत आहे. यामधून...
  October 7, 10:07 AM
 • उस्मानाबाद -घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या नातीसमान अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरात नेऊन तिच्या तोंडावर चिकटटेप लावून अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६५ वर्षीय वृद्धाला वर्षे सक्तमजुरी १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. कळंब तालुक्यातील सोंदणा (ढो) येथे दि. १५ जून २०१५ रोजी पीडित मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर अंगणात एकटीच गजगे खेळत बसली होती. यावेळी आई कामानिमित्त उस्मानाबादला गेली होती तर आजी घरामध्ये कामात होती.यावेळी आरोपी बाबूराव शंकर उर्फ कोंडिबा...
  October 7, 10:05 AM
 • सोलापूर-सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाइकांनी आणि वृत्तपत्र विक्रेता संघटनेने जनता बँकेवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी मध्यस्थी केली आणि बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. बँकेच्या त्रासामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांचे म्हणणे होते. मुश्ताक वळसंगकर (वय ५५, रा. विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक २) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी समजूत...
  October 7, 10:03 AM
 • सोलापूर -वादग्रस्त हलाल हा चित्रपट शुक्रवारी सोलापुरात प्रदर्शित झाला. बंदोबस्तासाठी १५ कमांडो पोलिस भागवत चित्रमंदिर संकुलात आले. त्यांचे वाहन थेट मागील तळात जाऊन थांबले. दुपारी साडेबाराला सर्व कमांडो गडप झाले. दरम्यान, बंदोबस्त पाहण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त संजय भांबुरे आले, तर बंदोबस्ताला तिथे कोणीच दिसले नाही. उमा थिएटरच्या खाली असलेल्या सिक्युरिटी गार्डला त्यांनी विचारणा केली. गार्डने सांगितले, की सगळी मंडळी थिएटरात आहेत. झाले... सर्वांना बोलावून भांबुरे यांनी चांगलेच...
  October 7, 10:03 AM
 • सोलापूर- आज दुपारी राज्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासाह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात चार जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) दुपारी 3 वाजेच्या सुमारास मोहोळ येथे घडलेल्या घटनेत योगेश भोसले (रा. पापरी) आणि पाडुरंग लबडे (रा. हीवरे) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दुसरीकडे धुळ्यात पावसामध्ये झाडाच्या आडोशाला थांबलेल्या दोघी मायलेकींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापरी येथे योगेश सुनील भोसले हा 20 वर्षीय तरूण आपल्या शेळ्या चारण्यासाठी...
  October 6, 08:15 PM
 
जाहिरात

RECOMMENDED