Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर -लिंगायतला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी रविवारी साेलापूरमध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली भव्य माेर्चा काढण्यात अाला. कौंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. तर होम मैदानावर सभेने समाराेप झाला. भगव्या पताका, डोक्यावर टोपी व गळ्यात भगवे उपरणे घालून हजारो लिंगायत बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. भारत देशा, जय बसवेशा, लिंगायत धर्माला मान्यता मिळालीच पाहिजे यासह इतर...
  June 4, 02:43 AM
 • सोलापूर- लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा या मागणीसाठी आज (3 जून) अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने सोलापुरात लिंगायत महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा दुपारी 12 वाजता महात्मा बसवेश्वर सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यात महाराष्ट्रासह कर्नाटकमधील लिंगायत बांधव सहभागी झाले. यावेळी 50 हून अधिक लिंगायत धर्मगुरूंची उपस्थिती होती. हा मोर्चा कोणा इतर धर्माविरोधात नाही तर...
  June 3, 06:39 PM
 • सोलापूर - सोलापूर बाजार समितीच्या १८ संचालकांच्या जागेसाठी ३९४ इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी शेवटच्या दिवशी १८७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, रतिकांत पाटील, दिलीप माने, शिवशरण पाटील-बिराजदार, माजी सभापती महादेव चाकोते, इंदुमती अलगोंडा-पाटील, माजी उपसभापती सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, नगरसेवक नागेश वल्याळ, मेनका राठोड, गणेश वानकर व राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर या...
  June 3, 10:05 AM
 • सोलापूर-होटगी रोडवरील अग्निशमन दल, शाॅपिंग सेंटरसह इतर कारणासाठी आरक्षित जागा असताना त्या जागेवर निवासी बांधकाम केले. सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह त्या परिसरातील दहा मोठ्या व्यक्तींचा बांधकाम परवाना महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी रद्द केला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवाना दिल्याने त्यांच्यावर कारवाईची शिफारस महापालिका आयुक्तांनी अहवालात नमूद केली आहे. कारण अट टाकून बांधकाम परवाना देता येत नाही. दहा जणांचा बांधकाम परवाना महापालिका...
  June 3, 07:24 AM
 • सोलापूर- होटगी रस्त्यावरील अग्निशामक दलासाठी आरक्षित ठेवलेला भूखंड सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी खरेदी करून तेथे बंगला उभारला अाहे. अारक्षित भूखंड असताना महापालिकेने निवासी बांधकामास परवाना कसा दिला? या मुद्द्यावरून उच्च न्यायालयात याचिका अाहे. उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार या वादग्रस्त बांधकाम परवानगी संदर्भातील चौकशी अहवाल न्यायालयास महापालिकेचे अायुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी सादर केला. अग्निशामक दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर निवासी बांधकाम केल्याने...
  June 2, 03:50 PM
 • मुंबई- सोलापुरात आरक्षित भूखंडावर बेकायदा बंगला बांधल्याप्रकरणीराज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत सापडले आहेत.याप्रकरणी सोलापूर आयुक्तांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सुभाष देशमुख यांनी नियमभंग करून बांधलेला बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल आयुक्तांनी हायकोर्टात सादर केला आहे. अग्निशामक दल आणि भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर सुभाष देशमुख यांनी बंगला बांधल्याचे समोर आले आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाची सोलापूर महापालिका आयुक्तांसमोर सुनावणी...
  June 2, 02:54 PM
 • सोलापूर- विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करण्याचे ध्येय असणाऱ्या सोलापूर विद्यापीठाने यंदा सर्व विषयांच्या, सर्व अभ्यासक्रमांच्या म्हणजे तब्बल २ हजार ९९० परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने नियोजनबद्ध, अत्याधुनिक तंत्राने पाठविल्या. राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत नवीन व केवळ एका जिल्ह्यापुरते सोलापूर विद्यापीठ अशा विविध बाबींमुळेच रोल मॉडेल ठरत आहे. त्याचाच प्रत्यय परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या नवनवीन प्रयत्नातून दिसून येतो आहे. सोलापूर विद्यापीठाने माहिती...
  June 2, 09:55 AM
 • सोलापूर- सोलापूर बाजार समितीसाठी शुक्रवारी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार, सुरेश हसापुरे, पृथ्वीराज माने, महादेव चाकोते, अविनाश मार्तंडे, श्रीशैल हत्तुरे, अमर पाटील यांच्यासह इच्छुकांनी १५१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शनिवारी शेवटचा दिवस असून काँग्रेसचे प्रमुख इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. कुंभारी मतदारसंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, श्रीशैल हत्तुरे,...
  June 2, 09:50 AM
 • सोलापूर- सोलापूर बाजार समितीसाठी शुक्रवारी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार, सुरेश हसापुरे, पृथ्वीराज माने, महादेव चाकोते, अविनाश मार्तंडे, श्रीशैल हत्तुरे, अमर पाटील यांच्यासह इच्छुकांनी १५१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शनिवारी शेवटचा दिवस असून काँग्रेसचे प्रमुख इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. कुंभारी मतदारसंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, श्रीशैल हत्तुरे,...
  June 2, 09:43 AM
 • सोलापूर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करताना दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे कामही सहकार खात्याने हाती घेतल्याचे दिसून येते. बँकेला झालेल्या अार्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याची चौकशी अहवाल तयार आहे. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. १८ जूनला त्यावर सुनावणी असून, त्या दिवशी स्थगिती उठवली तर प्रशासक थेट पोलिसांत गुन्हे नोंदवायला पोलिसांत जातील, इतकी तयारी सहकार खात्याने करून ठेवली. याबाबत प्रशासक अविनाश देशमुख यांनी, पुढे काय होईल...
  June 1, 10:27 AM
 • सोलापूर- रुद्देवाडी (ता. अक्कलकोट) येथील आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याने ५ कोटी ४६ लाख रुपयांचा अबकारी कर थकवला. त्याच्या वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाने ही कारवाई केली. मे २०१६ पासून जून २०१७ या काळात कारखान्याने साखर विक्री केली. त्यावरील अबकारी कर म्हणून ३ कोटी १४ लाख रुपये ग्राहक व व्यापाऱ्यांकडून वसूल केला. तो सरकारी खात्यात भरला नाही. याबाबत कारखान्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. समन्सही...
  June 1, 10:23 AM
 • सोलापूर- शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेने सात एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. तत्पूर्वी जोरदार मोहीम राबवून अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली होती. त्यामुळे यावेळेस अनधिकृत बांधकात नियमित करण्यासाठी किमान पाच हजार प्रस्ताव येतील, तसेच महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल असा अंदाज होता. मात्र, कारवाईनंतरही महापालिकेच्या आवाहनाला मिळकतदारांनी प्रतिसाद दिला नाही. केवळ २७८ प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यातही शेवटच्या दिवशी ८४ प्रस्ताव दाखल झाले. शहरातील अनधिकृत...
  June 1, 10:19 AM
 • सोलापूर- शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर बाजार समितीचे संचालक होण्याचे दिवास्वप्न अनेकांनी पाहण्यास सुरुवात केली. त्यातूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली. काँग्रेस, भाजप, सेना व राष्ट्रवादी यांनी अद्याप कोणतीही अधिकृत पॅनलची घोषणा केली नाही, पण सर्वच पक्षाच्या नेत्यांनी अाधी उमदेवारी अर्ज, पुन्हा उमेदवारीचे पाहू, असा निरोप सर्व इच्छुक उमेदवारांना दिला आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे. पण...
  June 1, 10:14 AM
 • सोलापूर - पगारवाढी संदर्भात सरकारचे धोरण चुकीचे अाहे. याबाबत सरकारने कर्मचाऱ्यांचा योग्य विचार करावा, अशा विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी दुपारी शहराच्या काही प्रमुख भागातून रॅली काढण्यात आली. या रॅलीतून सरकार विरुद्ध रोष व्यक्त केला. बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस संप असल्यामुळे बँकांचे व्यवहार बंद झाले आहेत. महिनाअखेर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे बँकेत पगार होणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. तसेच विक्रेते, व्यापाऱ्यांचे व्यवहार थांबणार...
  May 31, 09:55 AM
 • सोलापूर - सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.३६ टक्के इतका लागला. नियमीत व पुनर्परीक्षार्थी यांचा एकत्रित निकाल पाहिला तर तब्बल ९४.०५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात मुली उत्तीर्ण होऊ शकल्या. तर ८३.२९ टक्के मुले उत्तीर्ण होऊ शकली. सोलापूर जिल्ह्यातील ३१ हजार ७९५ मुले व २१ हजार १२६ मुलींनी परीक्षा दिली. यात २६ हजार ४८३ मुले तर १९ हजार ८६९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण होण्यातील मुलींचा टक्का जसा जास्त आहे, तसे गुणवत्तेच्या निकषावरही मुलीच अव्वल आहेत. पुणे विभागातील एकूण...
  May 31, 09:52 AM
 • सोलापूर- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विदयमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सहकार खात्याच्या कलम 110 अ च्या कलमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआय म्हणजेच रिजर्व बॅंकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने कारवाई करत विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. दरम्यान, संचालक मंडळ बरखास्त करताच सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची बॅंकेच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. गेली अनेक वर्षे ही बॅंक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यामुळे सर्व नेत्यांनी...
  May 30, 04:26 PM
 • सोलापूर- सोलापूरच्या विमान सेवेबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम असले तरीही सोलापूर विमानतळ मात्र विमानसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी सज्ज झाले. विमानतळाच्या मुख्य इमारतीचे विस्तारीकरण तर झालेच आहे शिवाय त्याला राष्ट्रीय विमानतळाचा लूक देखील आला आहे. इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले. उर्वरित काम अवघ्या १० दिवसांत पूर्ण होणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या मुख्य इमारतीच्या विस्तारीकरणाबरोबरच...
  May 30, 10:41 AM
 • सोलापूर- सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी इच्छुकांनी अर्जाची खरेदी केली. पण राखीव जागेवरून निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवार जात पडताळणी प्रमाणपत्रावरून संभ्रमात पडले आहेत. प्राधिकरणाच्या आदेशानुसार आम्ही जात पडताळणी प्रमाणपत्र स्वीकारणार असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केेले तर दुसरीकडे जातपडताळणी समिती सदस्य नागेश चौगुले यांनी कारण असल्याशिवाय जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी आम्हाला अर्ज स्वीकारता येणार नसल्याचे...
  May 30, 10:34 AM
 • सोलापूर- मुख्यमंत्री विशेष निधी, नियाेजन समिती व केबल खोदाई पोटी महापालिकेस मिळालेल्या पावणे तीन कोटींसह सुमारे ४० कोटींच्या रस्ते विकास कामांचा शहरात धडाका सुरू आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचे सोहळे रंगत असले तरी ७ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्याने रस्ते, ड्रेनेज, पाइपलाइनची कामे करता येणार नाहीत. शासन निर्देशानुसार साधारण आॅक्टोबरमध्येच रस्त्यांची ही कामे सुरू होतील. शासनाच्या निधीतून कामे प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न...
  May 30, 10:25 AM
 • सांगोला- पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर कमी करावेत. दुधाला शासकीय हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून सातबारा कोरा करावा. धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि रखडलेल्या टेंभू, म्हैसाळ योजनेसह सांगोला शाखा कालव्याची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा मागण्यांसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्ष शाखा सांगोला यांच्या वतीने शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख...
  May 30, 10:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED