Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - विद्यापीठ कुलगुरू शोध समितीवरील एका सदस्य निवडीसाठी झालेल्या बैठकीत नॅकचे संचालक एच. ए. रंगनाथ यांचे नाव अग्रक्रमाने निश्चित करण्यात आले. इतर तीन नावेही निश्चित करण्यात आली. सोलापूर विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांचा कार्यकाळ येत्या 26 नोव्हेंबरला पूर्ण होत आहे, या पार्श्वभूमीवर कुलगुरू शोध समितीच्या एका सदस्याची शिफारस किमान तीन महिने आधी कुलपतींकडे करणे अपेक्षित असते. यामुळे विद्या परिषद व व्यवस्थापन परिषद यांच्या सदस्यांची संयुक्त बैठक आज दुपारी...
  July 31, 08:58 AM
 • सोलापूर - निष्क्रिय आरटीओ अधिकार्यांचा धिक्कार असो..आणखी किती लोकांचे बळी घेणार.. ओव्हरलोड वाहने आणि अँपेरिक्षांवर कारवाई कधी करणार, अशा घोषणा देत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हंगामा केला.जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, सदानंद येलुरे, अस्मिता गायकवाड, शांताबाई जाधव, विष्णू कारमपुरी यांच्यासह 50 ते 60 शिवसैनिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांच्या दालनात घुसले आणि घोषणाबाजी करीत त्यांचे छायाचित्र असलेले...
  July 31, 08:52 AM
 • उस्मानाबाद - भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलन उभे करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत एका मुलाखतीद्वारे दिले आहेत. अण्णांच्या या संकेतावरू न राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील अशा काही प्रातिनिधीक प्रतिक्रियांचा दिव्य मराठी ने आढावा घेतला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अण्णा हजारे देशभरात दौरा करणार आहेत. तसेच लोकांमधून सक्षम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात...
  July 30, 11:07 AM
 • सोलापूर - शहरातील गुरुनानक चौक ते अशोक चौक रस्त्याच्या पदपथावरील (फूटपाथ) अतिक्रमण रविवारी पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले. शनिवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी या ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली. यास सत्ताधारी नगरसेवकांनीच विरोध केला.तातडीने घेतली दखल - शहरात रस्त्यांवरील अतिक्रमण आणि जड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी अशोक चौकातून पायी घरी जाताना ट्रकने ठोकरल्याने रविकिरण...
  July 30, 10:34 AM
 • सोलापूर - ड्रेनेजची सुविधा असलेल्या भागातीलच नागरिकांकडून यूजर चाज्रेस (मलनिस्सारण कर) वसूल करावा, असा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने झालेला असतानाही अचानक कोणालाही विश्वासात न घेता महापालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांच्या यूजर चाज्रेसचे एकत्रित बिल दिले आहे. यूजर चाज्रेस आकारणीबाबतच्या अंतिम निर्णयाबाबत अधिकारी आणि पदाधिकार्यांमध्ये मतभेद दिसून येत आहे. या मतभेदाचा फटका मात्र सोलापूरकरांना सहन करावा लागत आहे.सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील...
  July 30, 10:31 AM
 • सोलापूर - येथील रेल्वे स्थानकावर गाड्या पकडण्यासाठी प्रवासी ट्रॅकवर उभे राहतात. अशा प्रवाशांसह ट्रॅक ओलांडणार्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी ही माहिती दिली.हुतात्मा, इंद्रायणी व पॅसेंजर गाड्यांना प्रवाशांची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. दुपारी सुटणार्या इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गाडीत जागा मिळवण्यासाठी अनेक प्रवासी फलाट क्रमांक एकवर उभे राहत नाहीत. त्याऐवजी ते त्याच्या शेजारच्या...
  July 30, 08:57 AM
 • सोलापूर - अनेकांची प्रेरणा बनलेला युथ आयकॉन आनंद बनसोडे, सोलापूरचा पहिला एव्हरेस्टवीर म्हणून गणला. त्याच्या या यशानंतर महापालिकेचा ब्रॅण्ड अँम्बॅसिडर, पाच लाख रुपयांची मदत, भूखंड अशी आश्वासने त्याला मिळाली, पण आज ती हवेतच विरली आहेत. आता राहते घर विकून कर्ज फेडण्याची वेळ बनसोडे कुटुंबीयांवर आली आहे.आनंद बनसोडे यांचे वडील अशोक बनसोडे जीएम चौकात व्हील रिपेअरिंगचे छोटे भाडेतत्त्वावरील गॅरेज चालवतात. त्यामुळे त्यांनी स्वत:चे घर गहाण ठेवून, आई-वडिलांचे दागिने विकून आपल्या मुलाचे...
  July 30, 08:51 AM
 • सोलापूर - अनेकांची प्रेरणा बनलेला यूथ आयकॉन आनंद बनसोडे सोलापूरचा पहिला एव्हरेस्टवीर म्हणून गणला. त्याच्या या यशानंतर महापालिकेचा ब्रँड अॅम्बेसेडर, पाच लाख रुपयांची मदत, भूखंड अशी आश्वासने त्याला मिळाली, पण आज ती हवेतच विरली आहेत. आता राहते घर विकून कर्ज फेडण्याची वेळ बनसोडे कुटुंबीयांवर आली आहे. आनंदचे वडील अशोक बनसोडे छोटे गॅरेज चालवतात. त्यांनी स्वत:चे घर गहाण ठेवून, दागिने विकून मुलाचे एव्हरेस्टचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, आज या कुटुंबावरील कर्जाचा बोजा अशक्य बनला आहे. जगातील सर्वात...
  July 30, 01:20 AM
 • सोलापूर - वटवाघळे हा लोकांच्या आवडीचा नसलेला पण लोकांच्या उपयोगी पडणारा निशाचर प्राणी. पण, ते कोणी लक्षात घेत नाही. वाढते शहरीकरण व झपाट्याने होणारे नूतनीकरण यामुळे वटवाघळांची वसतिस्थाने धोक्यात आली आहेत. ती शहरांपासून लांब जात आहेत. सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा जिल्ह्यात आढळणार्या वटवाघळांच्या पाहणीतून हा निष्कर्ष निघाला आहे.पश्चिम घाटांप्रमाणे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसह त्या शेजारील सातारा अन् पुणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील उत्तर-दक्षिण पठारावर अनेक दुर्मीळ...
  July 29, 08:34 PM
 • सोलापूर - शहरात वारंवार होणार्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातून होणारी जड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अपघात रोखण्यासाठी शहर अतिक्रमण मुक्त करणे, जड वाहतूक मोहोळमार्गे वळवणे आदी निर्णय घेण्यात आले.अशोक चौक भागात गुरुवारी ट्रकच्या धडकेत रविकिरण सनमुखे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी भाजप, शिवसेना, माकप, मनसे आदी पक्षांनी अशोक चौकात रविकिरण सनमुखे याचा मृतदेह ठेवून रस्ता रोको...
  July 29, 11:50 AM
 • सोलापूर - जिल्ह्यातील राखीव व खासगी मालकीच्या वनक्षेत्रावर रोपे लावून ते हरित करण्यासाठी 1 ऑगस्टपासून सुरू होणार्या यंदाच्या वनमहोत्सवासाठी वनविभागाने तब्बल 19 लाख रोपे तयार केली आहे. झाडांसाठी खड्डे खोदण्यात आले असून दमदार पाऊस सुरू होताच, रोपे लावण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक लाख दहा हजार रोपे लावणार असून त्यासाठी खड्डे खोदले आहेत.सोलापूर जिल्ह्यातील वनक्षेत्र उष्ण कटिबंधीय काटेरी व झाडे-झुडपे...
  July 29, 11:48 AM
 • सोलापूर - महापालिकेने एलबीटी वसुलीची मोहीम तीव्र केल्याने व्यापारीही आक्रमक झाले आहेत. कर भरण्यास नकार देत नाहीत, पण एलबीटीतील जाचक अटी रद्द झाल्या पाहिजेत, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षाची अपेक्षित एलबीटी महापालिकेकडे जमा असताना थकबाकी दाखवून नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची दिशाभूल करण्यात येत असल्याची तक्रार व्यापार्यांनी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याकडे शनिवारी सायंकाळी शासकीय विर्शामगृहात केली. व्यापार्यांनी एलबीटी भरावे त्यात काही अडचणी असतील तर आपण...
  July 29, 11:45 AM
 • सोलापूर - एनटीपीसीकडून सोलापूर ते उजनी धरण या दरम्यान पाण्याची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यापैकी सोलापूर शहर आणि प्रकल्पग्रस्त गावांसाठी एक लाइन टाकण्यात येईल. या नव्या योजनेस एनटीपीसी बोर्डाने शुक्रवारी तत्त्वत: मान्यता देऊन त्यासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी दिली. यामुळे शहरास रोज सुमारे 80 एमएलडी पाणी मिळणार असून, रोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.सोलापूर शहरासाठी उजनी, टाकळी आणि हिप्परगा तलाव येथून रोज 100 ते 110 एमएलडी पाणी...
  July 29, 11:42 AM
 • सोलापूर- विजापूर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक 13) गुरुनानक चौक ते जुना बोरामणी नाका या दरम्यान होणार्या अपघातांमध्ये गेल्या पाच वर्षांत 20 जणांचा मृत्यू झाला. त्यात एक ज्येष्ठ महिला आणि एक दाम्पत्य सोडल्यास उर्वरित सर्व विद्यार्थीच होते. अशोक चौक पोलिस चौकीसमोरच्या रस्त्यावर सर्वाधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. गुरुवारच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रविकिरण सनमुखे याचा मृतदेह अपघातस्थळी ठेवून आणखी किती बळी घेणार? असा फलक लावलेला होता. शनिवारी होणार्या...
  July 28, 11:46 AM
 • सोलापूर- शासनाच्या नियमानुसार लागणार्या कागदपत्रांसाठी या लोकांना तलाठी, शासकीय रुग्णालये, तहसील, ग्रामपंचायत आदी कार्यालयांकडे चकरा माराव्या लागतात. एवढी पायपीट करून, पैसा खर्च करून जुळवाजुळव केलेली कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केली जातात. मात्र संयज गांधी व र्शावणबाळ योजनांच्या फाइल्स अनेक वर्षांपासून या कार्यालयांत धूळखात आहेत. शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या अनेक योजनांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जातात. तथापि, गोरगरिबांच्या व अपंग आणि वृध्दांच्या या...
  July 28, 11:40 AM
 • सोलापूर- महापालिकेने प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वास्तूचे नूतनीकरण केले आहे. नूतनीकरणाचे उद्घाटन शनिवारी (28 जुलै) होत आहे. त्यामुळे या इमारतीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.सोलापुरात 1930 मध्ये स्वातंत्र्यलढा झाला. त्यावेळी सोलापूरकरांनी तीन दिवस स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. स्वातंत्र्यवीरांना तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी सोलापूरमधून पलायन केले होते. 1930 मध्ये या इमारतीत तत्कालीन नगराध्यक्ष माणिक शहा यांनी तिरंगा फडकवला होता. पुढे इंग्रजानी त्यांचे आंदोलन दडपून...
  July 28, 11:17 AM
 • सोलापूर- एलबीटीप्रकरणी महापालिका सेवक राजशेखर वनारोटे यांना मारहाण झाल्याने त्या घटनेचा निषेध करण्यासाठी महापालिका कामगार कृती संघटनेच्या वतीने मनपा आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी निदर्शने करण्यात आली.हैदराबाद नाका येथे एलबीटीची माहिती घेण्यासाठी व्यापार्यांची गाडी अडवून चौकशी करीत असताना वनारोटे यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. महापालिका आयुक्त अजय...
  July 28, 11:12 AM
 • सोलापूर- घरातील लाडक्या व प्रामाणिक कुत्र्यांना सकस व पोषक आहार देण्याकडे शहरातील श्रीमंत लोकांचा कल वाढतो आहे. दर महिन्याला तब्बल दीड हजार किलो खाद्यांची विक्री होतेय. जिल्ह्यातील सुमारे 50 हजार कुत्र्यांचे फूड मार्केट पाच लाखांच्या पुढे गेले आहे.घरच्या खाण्यात, अगदी मांसाहारातही सुमारे 70 ते 80 टक्के न्यूट्रिशन मिळत नाही. मात्र, कंपन्यांनी तयार केलेल्या पॅकफूडमध्ये दहा टक्के पाणी व उर्वरित 90 टक्के न्यूट्रिशन असतात. बाजारातील पेटफूड देण्याबरोबर डोळे, हाडांचे ऑपरेशन्स योग्य औषधोपचार...
  July 28, 11:06 AM
 • सोलापूर- गुरुनानकनगर, शास्त्रीनगर, अशोक चौक, शांती चौक, बोरामणी नाका ते दयानंद महाविद्यालय या महामार्गावरील अपघातांमध्ये विद्यार्थ्यांचे बळी जात आहेत. ते रोखण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. गुरुवारी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रविकिरण सनमुखेचा मृतदेह रस्त्यावरच ठेवून विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींनी महापालिका आणि पोलिसांविरुद्धचा असंतोष व्यक्त केला.शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकणारा सनमुखे गुरुवारी सायंकाळी अशोक चौकातून पायी घरी निघाला...
  July 28, 10:51 AM
 • सोलापूर- चैत्राली राजे प्रस्तुत चैत्रालीचा नाद करायचा नाय हा लावणी कार्यक्रम बार्शी, कुडरुवाडी आणि सोलापुरात होणार आहे. लावणीसह अप्सरा आली.. ते चिकनी चमेली.. या आयटम साँगच्या गाण्यांवर चैत्राली राजे यांची अदाकारी यात आहे. शुक्रवारी (ता. 27) रात्री साडेनऊला बार्शीच्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन, शनिवारी कुडरुवाडीतील र्शीराम मंगल कार्यालयात रात्री साडेनऊ आणि रविवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होईल. एकाच दिवशी सलग तीन प्रयोग करून चैत्राली...
  July 27, 11:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED