Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - दोन किंवा तीन मुलींच्या जन्मानंतर गरोदर असणा-या महिलांचे गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे पहिली दोन्ही अपत्ये मुलगी असलेली महिला पुन्हा गरोदर असल्यास गर्भलिंग चाचणी, स्त्रीभ्रूण हत्येपासून त्यांना रोखण्यासाठी आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात येणार आहे.नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून लेक वाचवा अभियान सुरू आहे. शहरामध्ये जनजागृतीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पण, ग्रामीण भागात आजही त्याबाबत...
  May 11, 10:22 AM
 • सोलापूर - शहरात फारशी पाणीटंचाई नाही, काही भागात किरकोळ आहे. पाणीटंचाई असल्याचा भास निर्माण केला जात आहे. हे म्हणणे आहे महापौर अलका राठोड यांचे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पालक सचिव महापालिका आयुक्तांवर ताशेर ओढत आहेत. नगरसेवक पाण्यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे यांना घेराव घालण्याची तयारी करत आहेत, अशावेळी महापौर अलका राठोड यांनी वरील विधान केले.खंडित वीजपुरवठा, पाइपलाइन दुरुस्तीमुळे शहराला 120 एमएलडीऐवजी 95 एमएलडी पाणीपुरवठा झाला. दोन दिवसांपासून...
  May 11, 10:20 AM
 • सोलापूर - स्टेट बॅँक ऑफ इंडियाने शैक्षणिक कर्जाच्या व्याज दरात एक टक्क्याने कपात करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला. कर्ज परतफेड करताना हप्त्याच्या रकमेत कुठलीही वाढ न होता एकूण हप्ते कमी होणार आहेत. रिझर्व बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी कर्जाच्या व्याजदरात एक टक्का कपात करण्याचे नुकतेच जाहीर केल्याने एसबीआयने ही सूट जाहीर केली. साडेचार ते साडेसात लाखांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदरात 1 टक्का सूट दिल्याने त्याचा दर 14.50 टक्क्यांवरून 13.50 टक्के झाला. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे...
  May 11, 10:20 AM
 • सोलापूर - एकीकडे महाराष्ट्र साहित्य परिषदेत (मसाप) शहराध्यक्षपदावरून वादावादी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या (अ.भा.म.सा.प) सोलापुरात होणा-या 19 व्या नवोदित साहित्य संमेलनाची जय्यत तयारी.1८ मेपासून अभामसापचे तीन दिवशीय नवोदित मराठी साहित्य संमेलन हुतात्मा स्मृती मंदिरात होत आहे. उद्घाटन पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते होईल. महापौर अलका राठोड, आमदार प्रणिती शिंदे, दिलीप माने, विजयकुमार देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. अभामसापचे...
  May 11, 10:17 AM
 • सोलापूर - शहरात दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटना अलीकडील काळात वाढल्या आहेत. मागील महिनाभरात किमान दहा गुन्हे दाखल आहेत. काल बुधवारी आसरा चौक, सलगरवस्ती परिसरात घटना घडल्या. घटनांच्या तपासकामाकडे पोलिस गांभीर्याने बघत नसल्याने गुन्हेगारांना अद्याप अटक झालेली नाही.शहा नगरात हाणामारी - पोलिसांना माहिती कळवल्याच्या संशयावरून राजू तुकाराम जाधव (रा. शहानगर झोपडपट्टी, सलगरवस्ती) यांना मारहाण करून घरावर दगडफेक करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री घडली. सलगरवस्ती पोलिसांत फिर्याद देण्यात...
  May 11, 10:14 AM
 • सोलापूर - बनावट पिवळ्या शिधापत्रिकांच्याआधाराने बार्शी तालुक्यात रेशनिंगच्या धान्याचा 179 कोटींचा घोटाळा ऑक्टोबर 2010 मध्ये उघडकीस आला. परंतु अद्याप चौकशी अहवालही नाही अन् कोणावरही ठोस कारवाई नसल्याने घोटाळा दडपण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तीन समित्या नियुक्त होऊनही दोषींवर कारवाई आणि अपहाराच्या रकमेची वसुलीही नाही. सहा महिन्यांपूर्वी नियुक्त 11 उपजिल्हाधिका-यांच्या समित्यांपैकी पाच समित्यांनी तर मुदत संपल्यानंतही अहवाल दिला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.15 मेपर्यंत अहवाल सादर...
  May 11, 10:13 AM
 • सोलापूर - स्मृतिवनात उभारण्यात येणा-या केटरिंग कॉलेजसाठी केंद्र सरकारकडून 12 कोटी रुपये मिळाल्याची माहिती पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. सोलापूर शहरातील स्मृतिवनात पर्यटन खात्याच्या वतीने केंटरिंग कॉलेज उभारण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी याचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु, निधीअभावी याचे बांधकाम रखडले होते. आता या कामासाठी केंद्र शासनाकडून 12 कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे केंटरिंग कॉलेजचे काम जलदगतीने होणार आहे. त्याचबरोबर राज्य...
  May 11, 10:12 AM
 • सोलापूर - महापालिकेच्या वतीने व्यापार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुधवारी हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यशाळा घेण्यात आली. व्यापार्यांच्या हितासाठी आयोजित कार्यशाळेकडे व्यापार्यांनी पाठ फिरवली. व्यापारी आपल्याच भूमिकेवर आडून बसले असल्याचे यावरून स्पष्ट झाले. शहरात एकूण पाच ते सहा हजार व्यापारी असताना केवळ 70 व्यापारी कार्यशाळेस उपस्थित होते. व्यापार्यांच्या या अत्यल्प प्रतिसादामुळे एलबीटी मार्गदर्शन कार्यशाळाच फेल गेली.एलबीटी कायदा व्यापारी आणि महापालिकेच्या हिताची आहे. यात...
  May 10, 12:01 PM
 • सोलापूर - साहित्याची जाण नसलेल्यांची मसापमध्ये गर्दी झाली असल्याची टीका कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी बुधवारी केली. साहित्याचा प्रवास करणे सोपे नाही. मला वाटते की ज्यांना साहित्याची जाण नाही, जे केवळ नावाकरिता साहित्याच्या प्रवाहात येतात त्यांच्यासह काम करण्यात काहीच अर्थ नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणाची तक्रार करणे हे माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद सोडले आहे, असे कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी दिव्य मराठीला सांगितले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या...
  May 10, 11:52 AM
 • सोलापूर - उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र प्राध्यापकांवर बूमरँग होऊ शकते. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक पावित्र्यात आहेत. संप आणखी काही काळ चालला तर मागण्यांबाबतची सहानुभूतीही संपुष्टात येऊ शकते, असा सूर प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांच्या निमंत्रित प्रतिनिधींच्या चर्चेतून निघाला.दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात बुधवारी प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली. विद्यार्थीहित सर्वात...
  May 10, 11:40 AM
 • सोलापूर - एलबीटी कायदा कदापिही रद्द होणार नाही, पण त्यात दुरुस्ती होऊ शकते. एलबीटी थकविल्यास पहिल्या वर्षी 24 टक्के, दुसर्या वर्षी 36 टक्के व्याजदराने वसूल करण्याचे अधिकार या कायद्याने महापालिकेला दिले आहेत, अशी माहिती विक्रीकर सहआयुक्त महावीर पेंढारी (मुंबई) यांनी दिली.एलबीटी विवरणपत्र कसे भरावे, याची माहिती व्यापार्यांना देण्यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी पेंढारी शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी...
  May 10, 11:33 AM
 • सोलापूर - भीमा योजना जलवाहिनीला चार ठिकाणी लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू झाले. त्यातच उजनी येथील पंपहाऊसला बुधवारी सायंकाळी 4.30 पासून उच्चदाबाने वीजपुरवठा होत असल्याने पंप बंद झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी शहरात पाण्याची तीव्र टंचाई राहणार आहे. चार दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांनी दिली.भीमा जलवाहिनीस टाकळी आणि सोरेगावजवळ गळती लागली होती. सोरेगाव येथील हेडवर्क येथेही गळत्या आहेत. दुरुस्तीसाठी जलवाहिनीतील पाणी...
  May 10, 11:29 AM
 • सोलापूर - पाण्यासाठी त्रस्त असलेल्या लोकांना रात्र जागून काढण्याची शिक्षा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण डोंगरे यांच्या प्रभाग क्रमांक 21मधील नागरिकांची ही व्यथा आहे. पाणी नेमके किती वाजता येईल, याचा नेम नाही. रात्र जागत पाण्याची वाट पाहावी लागते. कर्णिकनगर, पद्मानगर, एकतानगर आदी भागांत गेल्या तीन वर्षांपासून विस्कळीत पाणीपुरवठा आहे. मध्यरात्री कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे नागरिकांना दिवसाआड झोप करावी लागत आहे.तक्रारीचा उपयोग नाहीदिवसाआड पाणी येते. तेही...
  May 10, 11:21 AM
 • सोलापूर - आसरा चौकात क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्याचे पर्यवसान महाराष्ट्र बँकेच्या शेजारी असलेल्या ज्योती एन्टरप्रायजेस या मोबाइल शॉपी दुकानावर दगडफेक करून काचा फोडण्यात झाले. दोघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा प्रकार झाला.शेख नावाचा एक तरुण आसरा चौकातून पायी जात होता. त्यावेळी एका मोटारसायकलस्वाराने त्याला कट मारला, त्यानंतर त्या तरुणाने शिवीगाळ केल्याने दोघांत बाचाबाची, हाणामारी झाली. नंतर दोन्ही गटातील तरुणांनी गोंधळ सुरू केला....
  May 10, 11:17 AM
 • सोलापूर - उन्हाळ्याची सुटी लागली की लहान मुलांमध्ये टाईमपाससाठी जी चढाओढ लागते त्यामध्ये कॉम्प्युटर गेम्स, व्हीडिओ गेम्स आणि मोबाइल गेम्स या साधनांचा समावेश असतो. मैदानावर भान हरपून क्रिकेट खेळल्याप्रमाणे आठ आठ तास आबालवृद्ध कॉम्प्युटरसमोर बसतात हे दृश्य आता कॉमन झाले आहे.देशातील स्थितीसध्या भारतात कॉम्प्युटर गेम्समध्ये राष्ट्रीय उलाढाल एक हजार कोटी रुपयांपर्यंत असून 2014 सालापर्यंत या क्षेत्रातील उलाढाल 1400 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. सध्या देशात 4 कोटी लोक कॉम्प्युटर गेम्स...
  May 10, 11:05 AM
 • सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठीचे पाणी बंधार्यात सोडावे, या मागणीसाठी आमदार दिलीप माने व त्यांच्या सर्मथकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्यानंतर सायंकाळी हतबल झालेल्या प्रशासनाकडून पाणी सोडण्यासाठीची मंजुरी मिळवली. गोंधळ घातल्याबाबत मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांनीही नरो वा कुंजरोवाची भूमिका घेतली. पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांकडून पाणी सोडण्याबाबतचे आदेश आल्यानंतरच आंदोलनाची इतिर्शी झाली.लोकशाहीदिन असल्याने सोमवारी...
  May 8, 11:05 AM
 • सोलापूर - उजनी धरणातूनच पाणी सोडा, असा आग्रह गेल्या काही दिवसांपासून होत होता. वास्तविक धरणातील उपलब्ध पाणी, त्याच्या वाटपाचे नियोजन याचा विचार कोणत्याच पातळीवर होताना दिसून येत नाही. सोमवारच्या आंदोलनाने तर यावर कडीच केली आहे. लोक पाणी मागतात, आमच्याशी भांडतात, असे सांगून आज लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले. पण पाण्यापेक्षा राजकारणच यामध्ये अधिक दिसले. मुळात आडातच नाही, तर पोहर्यात कुठून येणार अशी काहीशी स्थिती या पाण्याबाबत आहे.उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी गेल्या काही...
  May 8, 10:55 AM
 • सोलापूर: दक्षिण व उत्तर सोलापूरच्या पाण्यासाठी काँग्रेस आमदार दिलीप मानेंसह त्यांच्या सर्मथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अधिकार्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. पोलिसालाही मारहाण करण्यात आली. माजी मंत्री व अन्य एका आमदारासमक्ष लोकशाहीदिनात हा प्रकार घडला. सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.आमदार माने, माजी मंत्री आनंदराव देवकते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष 50 शेतकर्यांसह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यांना सीना-कोळेगाव बंधार्यातून पाणी देण्याची मागणी घेऊन...
  May 8, 06:00 AM
 • सोलापूर - वाहनांच्या नंबरप्लेटवरील नेत्यांची नावे, छायाचित्रे काढून टाकावीत, असे आवाहन सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. वाहतूक नियमांच्या पालनासाठी पोलिसांना सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले. अनेक वाहनांच्या नंबरप्लेट नियमबाह्य आहेत. त्यावर आकड्यांऐवजी अप्पा, दादा, अण्णा आदी लिहिलेले आहे. नेत्यांच्या तसबिरी व नावे ठळकपणे असून आकडे अगदी लहान आहेत. याविरुद्ध दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून गेल्या पंधरा दिवसांपासून...
  May 7, 12:47 PM
 • सोलापूर - वीज बिलात महावितरण कंपनीकडून विविध करांची आकारणी केली जाते. सामान्य नागरिकांना त्याचा नेमका अर्थ कळत नाही. करांची योग्यता-अयोग्यता लक्षातही येत नाही. कर कमीतर होत नाहीतच, पण त्यांची संख्या वाढत राहते. चालू महिन्याच्या बिलात वीज कंपनीने अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून 160 रुपये आकारले आहेत. या कराच्या आकारणीची माहिती बिलावर वीज कंपनीकडूनच दिली जाते. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषीक्षेत्राशी निगडित ग्राहकांकडून हे छुपे कर आकारले जातात. नियमानुसार घेतले जातातमहावितरणकडून...
  May 7, 12:32 PM
 
जाहिरात

RECOMMENDED