जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - सीना नदीवरील 21 पैकी 18 बंधा-यांची दारे उघडण्यात आली आहेत. उर्वरित बंधा-यांचे दरवाजे बुधवारी उघडण्यात येणार आहेत. यानंतर आता सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडण्यासाठी उस्मानाबादच्या पाटबंधारे खात्याला पत्र पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता दिनकर सोनवलकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीवरील बंधा-यांची दारे उघडून दक्षिण तालुक्यास पाणी द्यावे आणि नंतर सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडावे, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या...
  May 23, 11:28 AM
 • सोलापूर - यंदा जूनपासून पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रणाली वापरली जाणार असल्याची सूचना सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाइटवर गेल्या तीन दिवसांपासून झळकत होती. याबाबत महाविद्यालयांकडून विद्यापीठ प्रशासनाला विचारणा झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनही गोंधळात पडले. अशा प्रकारची कोणतीही सूचना विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यापीठ आणि एमकेसीएल यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे उघड झाले.सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाइटवर गेल्या तीन...
  May 23, 11:27 AM
 • सोलापूर - रुपयाची घसरण सुरूच असल्याने टॉवेल व औषधी घटक निर्यात करणा-या काही कारखानदारांना फायदा होणार आहे. सोलापुरातून सर्वाधिक निर्यात टॉवेलची होते; मात्र उत्पादनासाठी कामगारांचा तुटवडा असल्याने निर्यातदार सावध भूमिका घेत आहेत. औषधी घटक निर्माण करण्यासाठी कच्चा माल आयात करावा लागतो. त्यापासून पक्क्या मालाची निर्यात करणा-यांना मात्र रुपया घसरल्याचा तोटाच सहन करावा लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सोलापूरच्या यंत्रमागांवर उत्पादित होणारे 40 टक्के टॉवेल आखाती देश आणि आफ्रिका खंडात...
  May 23, 11:25 AM
 • सोलापूर - महापालिकेत आरोग्य अधिकारी, साहाय्यक संचालक नगररचना आणि विधान सल्लागार, उद्यान अधीक्षकांसह 712 पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातील सर्वाधिक 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. महसुली उत्पन्नातील जवळपास 50 टक्के रक्कम आस्थापनेवर खर्च होत असल्याने रिक्त पदे भरण्यास महापालिका उत्सुक दिसत नाही. आठ झोन कार्यालयांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमण्याची शिफारस महापालिका सभागृह नेते महेश कोठे यांनी केली आहे.महापालिकेचे आयुक्त, साहाय्यक संचालक...
  May 23, 11:23 AM
 • सोलापूर - वयाच्या सतराव्या वर्षी सोलापूरच्या अमोलने मनाशी ठरवले की, आपल्याला चित्रपटाच्या क्षेत्रातच काम करायचे आहे आणि त्याने आपले पाय मुंबईच्या दिशने वळवले. आज त्याचे वादळ चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्न साकार होत आहे. अमोल लहांडेचा दिग्दर्शनापर्यंतच्या प्रवासाची ही एक झलक.अमोल मुंबईत गेला, तेव्हा तो अर्थातच स्ट्रगलर होता. तो ज्येष्ठ कलावंत शरद तळवळकर यांनी त्याच्यातील गुण हेरले. त्याला मुंबई दूरदर्शनच्या स्वामीनी या मालिकेचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळाले. मालिकेचे...
  May 23, 11:20 AM
 • सोलापूर - सोलापुरातील सहा विसर्जित नागरी सहकारी बँकांवर ठेवीदारांचा प्रतिनिधी घेऊनच अवसायनाची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी म्हटले आहे. याबाबत 30 मे रोजी बँकांवरील लिक्विडेटर, जिल्हा उपनिबंधक यांची पुण्यात बैठक बोलावण्यात आली आहे.सोलापुरात 1999 पासून सहकारी बँका बंद पडण्याची मालिका सुरू झाली. आतापर्यंत सहा बँकांचे विसर्जन झाले. त्यातील ठेवीदारांच्या फक्त विमापात्र रकमाच मिळाल्या. लाखाच्या वरील रकमांसाठी अवसायक प्रयत्न करत नाहीत, संचालकांवर कारवाई...
  May 23, 11:18 AM
 • सोलापूर - रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्पाची सुरुवात जूनमध्ये होत आहे. त्यासाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. विद्युतीकरणाचे नियंत्रण आणि देखरेख यासाठी डीआरएम कार्यालयाने 75 लाख रुपये खर्च करून पाच हजार चौरस मीटर इतक्या भव्य जागेत हे कक्ष उभारणार आहे.सोलापूर विभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. विद्युतीकरणाच्या मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि बारीक हालचाली टिपण्याचे काम या कक्षातून होईल. मनमाड ते दौंड...
  May 23, 11:17 AM
 • सोलापूर - महापालिकेतील बहुचर्चित भंडे घोटाळ्याच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. तपास अधिकारी हरिदास मुंडे यांनी पथकासह मंगळवारी दुपारी एक वाजता थेट महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांची भेट घेऊन तपासासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मागणी केली. सोमवारपर्यंत महापालिका पोलिसांना कागदपत्र देणार आहे. या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र न मिळाल्यास याबाबतचा अहवाल शासनास कळवणार असल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली.महापालिकेत भूमी व मालमत्ता कार्यालयात 1997-98 ते 2005-06 या...
  May 23, 11:16 AM
 • सोलापूर - शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यासाठी वीज नसणेच प्रमुख कारण आहे. वारंवार वीजपुरवठा बंद, एकाच दिवशी तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांत वीजबंदी (शटडाऊन) आणि उजनी व सोलापुरात एकाच दिवशी नसलेली वीजबंदी ही प्रमुख कारणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात स्पष्ट केलेली आहेत.पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 11 उपायही सुचवलेले आहेत. त्यात शहरात वीज बंद असलेल्या दिवशीच उजनी पंपाची वीज बंद असावी, तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रात वेगवेगळ्या दिवशी वीज बंद करावी आणि जुने पंप, जलवाहिनी व...
  May 22, 12:03 PM
 • सोलापूर - भाषावार प्रांतरचना झाली, त्याच वेळी सर्व प्रदेशांच्या सीमा निश्चित होणे अपेक्षित होते. आता वेळ गेल्यानंतर सीमावादाचा प्रश्न उकरून काय उपयोग? असे म्हणत कर्नाटकचे पाटबंधारे व सांस्कृतिक मंत्री गोविंद करजोळ यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.सोलापुरात सोमवारी झालेल्या मराठी-कन्नड भाषा भावैक्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना सीमावादाविषयी छेडले असता, ते म्हणाले, देशातील छोटी राज्ये ठरवताना भाषावार...
  May 22, 11:59 AM
 • सोलापूर - देशातील प्रत्येकाला आपल्या भाषेत शिकण्याचा, लिहिण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. सलोख्याचे वातावरण निर्माण करून भाषावृद्धीचे काम हाती घेतल्यास कुठलाच सीमावाद राहणार नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्राला ऐक्याचे प्रतीक बनवू, असा निर्धार महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण आणि कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री गोविंद करजोळ यांनी सोमवारी केला.बंगळुरूच्या कन्नड प्राधिकार संस्थेच्या वतीने आयोजित मराठी-कन्नड भाषा भावैक्य संमेलनासाठी दोघेही एका व्यासपीठावर आले होते....
  May 22, 11:57 AM
 • उस्मानाबाद - सीना-कोळेगाव प्रकल्पातील 20 दलघमी पाणी सीना नदीतून सोलापूरला सोडण्याबाबत जिल्हाधिका-यांना सोमवारी दुपारी सोलापूरच्या जिल्हाधिका-यांचे पत्र आले. पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचे लेखी पत्र आल्यास पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचाली वाढल्या असून, पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यात येत आहे.परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पातील 20 दलघमी पाणी दक्षिण सोलापूर...
  May 22, 11:55 AM
 • सोलापूर - लेखक डॉ. अब्दुलसत्तार दळवी (रत्नागिरी), ज्येष्ठ कवी अब्दुलअहद साज (मुंबई) व कवी एजाज नबी कारीगर (सोलापूर) उर्दू साहित्य संमेलनाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पुरस्कार अनुक्रमे राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आहेत. अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष अॅड. यू. एन. बेरिया यांनी सोमवारी ही घोषणा केली.पुरस्कारांचे वितरण येत्या शुक्रवारी दुपारी तीनला श्रीराम पुजारी कलासंकुलातील अॅम्फी थिएटर येथे होणार आहे. राज्याचे अल्पसंख्याक व औकाफ मंत्री आरिफ...
  May 22, 11:51 AM
 • सोलापूर - भूमी व मालमत्ता विभागातील जेटींगराया डी. भंडे यांनी महापालिकेच्या गाळे भाडेवसुलीच्या रकमेत केलेल्या अपहारप्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा नोंद होऊनही तपास झालेला नाही. पोलिस म्हणतात, महापालिका चौकशीची फाइल देत नाही, तर महापालिका म्हणते पोलिस नेत नाहीत. या वादात तपास रखडल्याने दोषी निवांत राहिले आहेत. शहरातील मनपा शॉपिंग सेंटरकडील वसुली क्लार्क असलेला भंडे यांनी व्यापा-यांकडून रोखीने पैसे वसूल करून ते मनपाच्या कोशागार कार्यालयात रोखीने जमा करणे आवश्यक असताना ते बोगस...
  May 22, 11:50 AM
 • सोलापूर - शहरात सोमवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत अचानक नाकाबंदी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. वाहतूक शाखा, गुन्हे शाखा व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी ही संयुक्त मोहीम राबविली. पण, यात एकही गुन्हेगार सापडला नाही.वाहतूक शाखेच्या चौदा पथकाने महत्त्वाच्या चौकात नाकाबंदी करून वाहन तपासणी, वाहनपरवाना, वाहन कागदपत्रांची तपासणी केली. गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली. हॉटेल, लॉजेस तपासणी करण्यात आली. याशिवाय महिला समस्या...
  May 22, 11:49 AM
 • मराठी-कन्नड भावैक्य संमेलन सुरू असतानाच सोमवारी शिवसेनेची मराठी अस्मिता जागी झाली. जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील संमेलनस्थळी आले. त्यांच्यासमवेत कार्यकर्तेही होते. गोंधळ होईल असे वाटतानाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कन्नडीगांचा सोलापुरात ज्या पद्धतीने सन्मान होतो आहे; त्याच प्रकारे कर्नाटकात मराठी माणसाचा सन्मान व्हावा. बेळगाव महाराष्ट्राला देण्याचे मान्य करावे, असे ठोंगे-पाटील म्हणाले.ते पुढे म्हणाले, सोलापूर हे बहुभाषिकांचे आहे. या शहरात तेलुगू, कन्नड, उर्दू...
  May 22, 11:48 AM
 • सोलापूर - भाषावार प्रांतरचना झाली त्याच वेळी सर्व प्रदेशांच्या सीमा निश्चित होणे अपेक्षित होते. आता वेळ गेल्यानंतर सीमावादाचा प्रश्न उकरून काय उपयोग? असे म्हणत कर्नाटकचे पाटबंधारे व सांस्कृतिकमंत्री गोविंद करजोळ यांनी सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.सोलापुरात सोमवारी झालेल्या मराठी-कन्नड भाषा भावैक्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. कार्यक्रमानंतर बाहेर पडताना सीमावादाविषयी छेडले असता ते म्हणाले, देशातील छोटी राज्ये ठरवताना भाषावार...
  May 22, 04:01 AM
 • सोलापूर - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने सोलापुरात साहित्य भवन उभारण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. त्याचा ठराव नवोदित साहित्य संमेलनात मांडल्यानंतर टाळ्यांच्या गजराने तो मंजूर करण्यात आला. त्यासाठी शासनाने जमीन द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.संमेलनाच्या सांगता समारंभासाठी ज्येष्ठ साहित्यिक गिरीजा कीर, स्वागताध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत, प्रा. शरद मुथ यांच्यासह मुख्य संयोजक शरद गोरे, राजकुमार काळभोर, दशरथ यादव, देवेंद्र औटी, रामचंद्र मस्के आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना...
  May 21, 10:45 AM
 • सोलापूर - अल्पकालीन गुंतवणुकीपेक्षा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक करणे चांगले असते. देशातील आजचा काळ हा या गुंतवणुकीसाठी अधिक चांगला आहे. म्युचअल फंड, विमा यापेक्षा शेअर्सधील गुंतवणुकीत अधिक परतावा आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जगात चौथ्या क्रमांकाची असल्याचे नॅशनल सिक्युरिटीज अॅन्ड डिपॉझिटस लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांनी सांगितले. दैनिक दिव्य मराठी फाउंडेशन सीएसआर विभागाच्या वतीने रविवारी श्री शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित व्याख्यानात आजच्या संदर्भात आपली...
  May 21, 10:41 AM
 • सोलापूर - मागील दोन-तीन वर्षांपासून बोरामणी येथे उभारण्यात येत असलेल्या विमानतळाचे घोडे केवळ जागा अधिग्रहणावरच अडले आहे. 578.98 हेक्टरच्या भव्य जागेत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. जागा ताब्यात घेतल्यानंतरही प्रशासनाला आणखी 72.48 हेक्टरची गरज भासली. त्यामुळे आणखी जमीन अधिग्रहणाचा निर्णय विमानतळ विकास कंपनीने घेतला. त्या अनुषंगाने जागेची मोजदाद करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.विमानतळाला अतिरिक्त जागा हवी आहे, म्हणून तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विकास कंपनीने...
  May 21, 10:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात