जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - दुष्काळ नाही म्हणणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केली. जनावरांच्या चारा आणि पाण्याचीही समस्या गंभीर बनत आहे. जिल्ह्यात मागेल त्या ठिकाणी चारा डेपो सुरू करावेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठीही पाण्याची सोय करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चार...
  May 30, 10:40 AM
 • सोलापूर - शहराची तिसरी हद्दवाढ 10 मे 1992 रोजी झाली. त्यापूर्वी जुळे सोलापुरातील 350 हेक्टर जागेवर म्हाडाने आरक्षण टाकले होते. 20 वर्षांनंतर नवीन आराखडा तयार करण्याचा नियम आहे. त्यानुसार महापालिकेच्या नगर रचना कार्यालयाचे प्रभारी अधिकारी संभाजी कांबळे यांनी आराखडा तयार केला. जानेवारीत आयुक्तांच्या शिफारसींसह आराखड्याची फाइल महापालिका सभागृहाकडे जाणे आवश्यक होते, पण ती आयुक्त कार्यालयात अडकल्याने व परस्परविरोधी बाबींमुळे अर्थपूर्ण संशयाला जागा निर्माण झाली आहे. नियमानुसार नव्याने...
  May 30, 10:37 AM
 • सोलापूर - खासगी विद्यापीठे कदापि येऊ द्यायची नाहीत, असा निर्धार करतानाच शिक्षणाच्या अधिकाराचा प्रभावी अंमल करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) राज्यस्तरीय अभ्यास शिबिराच्या सांगता कार्यक्रमात घेण्यात आला.कुंभारी परिसरातील गोदूताई विडी कामगार वसाहतीतील सभागृहात मंगळवारी सायंकाळी सातला शिबिराचा समारोप झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य नरसय्या आडम, डॉ. अशोक ढवळे, एसएफआयचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब...
  May 30, 10:34 AM
 • सोलापूर - मुंबई मोटार वाहतूक कायद्याअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रवासी वाहतूक करणा-या गाड्यांची, मालवाहतूक करणा-या गाड्यांची तपासणी करण्याचा अधिकार आहे. या अंतर्गत लवकरच आरटीओच्या सोलापूर कार्यालयाकडून एसटी महामंडळाच्या गाड्यांची तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन समजल्या जाणा-या एसटीच्या गाड्यांची अवस्था सध्या वाईट आहे. लांब पल्ल्यासाठी सुस्थितीतील बस सोडल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात जाणा-या बसची दुरवस्था झालेली आहे.अशी होणार...
  May 30, 10:31 AM
 • सोलापूर - तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागत असल्याने पेट्रोलची दरवाढ ही बाबच खोटी आहे. उलट कंपन्यांचा फायदा वाढवण्यासाठी पेट्रोलची दरवाढ असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. अशोक ढवळे यांनी मंगळवारी दिव्य मराठीला सांगितले.स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी ते सोलापूरला आले होते. कुंभारी परिसरातील गोदूताई विडी कामगार वसाहतीत शिबिर सुरू आहे. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात डाव्यांसह इतर पक्षांनी गुरुवारी (ता. 31) भारत...
  May 30, 10:29 AM
 • सोलापूर - हिंदू धर्माची ध्वजा त्रिखंडात गाजवणारा योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद यांची जीवनगाथा डोळ्यांत साठवण्यासाठी सोलापूरकरांनी केलेली गर्दी विक्रमी ठरली. कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या अर्धा तास आधीच हुतात्मा स्मृती मंदिर खचाखच भरल्याचे चित्र सोमवारी रात्री पाहायला मिळाले. सभागृहाच्या पाय-या आणि बाजूच्या मोकळ्या जागेतही प्रेक्षक भारतीय बैठक मारून बसले होते. सभागृहाबाहेरील स्क्रीनसमोरही तोबा गर्दी झाली होती. सावरकर विचार मंचने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या...
  May 30, 10:27 AM
 • सोलापूर - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दीड तासांच्या चर्चेनंतर रंगभवनजवळील आरक्षण क्रमांक 7/1 जागेवरील आरक्षणात फेरबदल करण्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. या जागेवर मुस्लिम कब्रस्थान असल्याने ट्रस्टच्या नावाने उतारा आहे. ट्रस्टने केलेल्या अर्जानुसार या जागेवरील आरक्षण बदलण्यास महापालिका सभेने मान्यता दिली. आता त्या जागेवर व्यवसायिक गाळे आणि नागरी वसाहत होणार आहे.महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सायंकाळी महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. मार्च आणि मे...
  May 30, 10:24 AM
 • सोलापूर - बार्शी तालुक्यात बनावट पिवळ्या शिधापत्रिकांच्या आधारे 189 कोटींच्या रेशनच्या गहू व तांदळाचा अपहार झाल्याचे तपासणीत उघडकीस आले. त्यानंतर दोन समित्या नियुक्त होऊन अपहाराची चौकशी पूर्ण होत नसल्याने या गंभीर घोटाळ्याचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता 11 उपजिल्हाधिका-यांचा अहवाल एकत्रित करण्यासाठी पुन्हा समिती नेमण्यात आली आहे.बार्शी तालुक्यात पिवळ्या व अंत्योदय शिधापत्रिका बनावट दाखवून 189 कोटी रुपयांच्या गहू व तांदळाचा अपहार झाल्याचे उघडकीस...
  May 30, 10:23 AM
 • सोलापूर - महापालिकेतील बहुचर्चित भंडे घोटाळ्याची कागदपत्रे तपास अधिकारी हरिदास मुंडे यांना सोमवारी मिळाली. त्यासाठी त्यांनी आपल्या दोन सहकार्यांसह साहाय्यक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या मारून कागदपत्रे ताब्यात घेतली. 23 पैकी 10 महापालिका कर्मचा-यांची विभागीय चौकशी अधिकरी व्ही. सी. हंगे यांनी सोमवारपासून सुरू केली. त्यामुळे एकंदरीत भंडे घोटाळ्याच्या तपासाला गती येणार आहे.तपास अधिका-यांना महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांना...
  May 29, 10:23 AM
 • सोलापूर - जडेसाब कब्रस्तान येथे काही गैरप्रकार सुरू आहेत. त्याविषयीची नाराजी राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. याविषयी बातमी डीबी स्टारमध्ये शनिवारी प्रसिद्ध झाली होती. त्यानुषंगाने सोमवारी मान्यवरांची दिव्य मराठीने शहर कार्यालयात चर्चा आयोजित केली होती. श्रीमंतांचे मृतदेह दफन करण्यासाठी पैसे घेऊन जुन्या कबरी उकरल्या जात आहेत. ही अतिशय असंवेदनशील कृती तेथील कामगार करीत असल्याची टीका मान्यवरांनी केली.जडेसाब व मोदी कब्रस्तान येथे जागा अपुरी पडत आहे....
  May 29, 10:22 AM
 • सोलापूर - सीना-कोळेगाव धरणातून सोडलेले पाणी कव्हे आणि म्हैसगाव हे दोन बंधारे ओलांडून सोमवारी सायंकाळी रिधोरे बंधा-यात पोहचले. कव्हे आणि म्हैसगाव या दोन्ही बंधा-यातून एक मीटरवरून पाणी वाहत आहे. रविवारी धरणातून सीना नदीत पंधराशे क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. सलग चार दिवस दररोज पंधराशे क्युसेस पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. हे पाणी फ क्त पिण्यासाठी वापरण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर सीना नदीकाठी दररोज दोन तास वीजपुरवठा करण्याच्या सूचना...
  May 29, 10:15 AM
 • सोलापूर - देशभरात सध्या निवडणुका नाहीत,त्यामुळेच संधी साधून काँग्रेसने जनतेवर इंधन दरवाढ लादली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यात वेगळे कर आकारत आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी करावयाचे असल्यास राज्यातील कर रद्द करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री अविनाश कोळी यांनी केली आहे.पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 31 मे रोजी देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. त्या संदर्भात श्री. कोळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केंद्र...
  May 29, 10:14 AM
 • सोलापूर - कब्रस्तानातील गैरप्रकाराचा निषेध मुस्लिम समाजातील मान्यवरांनी केला. कबरी उकरून हाडे काढणे, तेथे जुगार खेळणे व मद्य प्राशन करणे निंद्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. हाडे बाहेर टाकून देण्याचा प्रकार संतापजनक आहे. तसाच तो भावना दुखावणारा आणि माणुसकीहीन कार्य असल्याचे मान्यवरांनी सांगितले.डीबी स्टारच्या शनिवारच्या अंकात जडेसाब बंगला मुस्लिम कब्रस्तानातील गैरप्रकारावर वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुस्लिम समाजातील मान्यवरांची चर्चा दिव्य मराठीच्या...
  May 29, 10:12 AM
 • सोलापूर - स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकीत राहिल्याने 122 व्यापा-यांवर महापालिकेने गुन्हे दाखल केले. त्यानंतर ते मागे घेऊनही कर न भरणा-या 47 व्यापा-यांची बँक खाती गोठवण्यात येणार आहेत. कर वसूल होण्यासाठी 68 व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक 31 मे रोजी, तर बँक आणि पतसंस्थेच्या प्रतिनिधींची बैठक 4 जून रोजी महापालिकेत घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी पत्रकारांना दिली.कर रद्द होणार नाही, असे नगरविकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याबरोबर झालेल्या 25 मेच्या...
  May 29, 10:09 AM
 • सोलापूर - कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) हद्दीतील गोदूताई नगरातल्या माळरानात असलेल्या एका समाजमंदिरात राज्यभरातून 120 विद्यार्थी जमले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पश्चिम बंगाल, हैदराबाद, मुंबई, पुणे, नांदेड व औरंगाबाद येथून मान्यवर येत आहेत. रिक्षाने ये-जा करणारी ही मंडळी कुठल्या हॉटेलमध्ये उतरलेली नाही. तेथीलच एका खोलीत जेवण आणि राहण्याची त्यांची व्यवस्था आहे. रिक्षातून ये-जा करणारी ही माणसे हिंदी व मराठीतून बोलतात. काय चालले आहे तेच कळत नाही, अशा बुचकळ्यात सोलापुरातील गुप्त वार्तांचे...
  May 29, 10:08 AM
 • सोलापूर - शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी सुरू करण्यात आलेले निरंतर शिक्षण अभियान गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून निरंतर सुरू असले तरी, या उपक्रमाला आता उतरती कळा लागली आहे. गेल्या पाच वर्षांपासून या कार्यालयात शिक्षणाधिका-यांचे पद रिक्त असूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे पद भरले जात नाही. या कार्यालयात इतरही पदे रिक्त असल्याने निरंतर शिक्षण अभियान आता फक्त कागदावरच उरले आहे.शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे 1979...
  May 29, 10:06 AM
 • सोलापूर - क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून रविवारी सकाळी विलास रामू चव्हाण (वय 30, रा. घोडातांडा, कुमठेजवळ, सोलापूर) या रिक्षाचालकाचा खून केल्याप्रकरणी एका आरोपीला सोमवारी पोलिस कोठडी मिळाली आहे.राजू अर्जुन चव्हाण (वय 25, रा. घोडातांडा) याला अटक करून सोमवारी मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एन. भोसले यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संतोष अर्जुन चव्हाण, शिवाजी अर्जुन चव्हाण, रवी तारू राठोड यांच्यासह अन्य दोघेजण अद्याप फरार आहेत. विलास चव्हाण व राजू चव्हाण...
  May 29, 10:05 AM
 • सांगली - पंतप्रधान भ्रष्टाचारी नाहीत, असे आजही माझे मत आहे; पण खाण घोटाळ्यात त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यास त्यांच्याविरोधातही आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी दिला.सांगलीत पत्रकारांशी बोलताना अण्णा म्हणाले की, मनमोहनसिंग यांच्याकडे खाण मंत्रालयाची जबाबदारी असताना त्यांनी दिलेल्या 55 ठेक्यांमुळे शासनाचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा आरोप होत आहे. त्याबाबतची काही कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत. त्याचा अभ्यास करून नंतर निर्णय घेतला जाईल. राज्याच्या...
  May 29, 04:44 AM
 • सांगली - मायावतींचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग महाराष्ट्रात राबवण्याचा संकल्प रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. रिपब्लिकन पक्ष विविध समाजांच्या आघाड्या स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.आठवले म्हणाले, की महापालिका निवडणुकांत आलेल्या अपयशाचे आम्ही चिंतन केले तेव्हा अपयशाची काही कारणे समोर आली. आमच्या पक्षाला चिन्ह नाही, आमच्याकडे पैसा नाही आणि सवर्णांची मते आम्हाला मिळत नाहीत, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे...
  May 29, 04:39 AM
 • परंडा - उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केलेला विरोध मोडीत काढून प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे रविवारी सायंकाळी सीना- कोळेगाव धरण प्रकल्पाच्या 4 दरवाजातून पाणी सोडले. पाणी सोडण्यासाठी विरोध करणा-या आमदारांसह सर्वपक्षीय नेत्यांना आणि शेतक-यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पाणी सोडल्याच्या निषेधार्थ सोमवारी उस्मानाबाद आणि परंडा बंदची हाक देण्यात आली आहे तर सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यवाहीचे स्वागत केले आहे. सीना-कोळेगाव प्रकल्पातील 20 दलघमी पाणी...
  May 28, 12:06 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात