Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - सुशिक्षितांसह अशिक्षितांनाही रोजगार देऊन जीवन जगण्याचा आणि मोठा उद्योजक होण्याचा मार्ग बनलेली पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजना बंद झाल्याने बेरोजगारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. शहरासह ग्रामीण भागातील बेरोजगारांना गेल्या काही वर्षांत या योजनेमुळे स्वत:च्या पायावर उभे राहता आले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील कृषीवर अधारित व्यवसायांना या योजनेचा चांगला लाभ झालेला आहे. योजना बंद झाल्याने त्याचे पडसाद रोजगारनिर्मितीवर उमटणार आहेत.ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी...
  April 9, 09:03 AM
 • सोलापूर - नाश्त्यात दररोज पोहे आणि तूप म्हणून डालड्याचा वापर... या आणि अशा अनेक अडचणींचा पाढा विजापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिव्य मराठीच्या डीबी स्टार प्रतिनिधीसमोर वाचला. दिव्य मराठीच्या डीबी स्टारमध्ये रविवारी वसतिगृहातील विद्यार्थी उपेक्षितच असे वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्तात सिद्धेश्वर मंदिराजवळील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या. हे वृत्त वाचल्यानंतर डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी...
  April 9, 09:00 AM
 • सोलापूर - नीलमनगर, एमआयडीसी भागात कामगारांवर पाळत ठेवून चाकूचा धाक दाखवून पैसे लुबाडणा-या, रिक्षातील सहप्रवाशाला दमदाटी करून मारहाण करीत पैसे पळवणा-या एका टोळीला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दारू पिण्याची हौस भागवण्यासाठी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.परमेश्वर राजू कांबळे (वय 19, रा. विनायकनगर), नजीर कोथिंबरे (वय 20, रा. शास्त्रीनगर), महिबूब जकलेर (वय 20, रा. गोदूताई विडी घरकुल, सोलापूर) या तिघांना अटक झाली. सिद्धार्थ नारायणकर (रा. माळीनगर, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद...
  April 9, 08:57 AM
 • सोलापूर - कमी भांडवल, कमी रिस्क फॅक्टर असणारा, लायसन्समुक्त उद्द्योग या संचालकांच्या दृष्टीने जमेच्या बाजू असलेल्या दहावी, बारावीच्या खासगी क्लासेसचे शहरात पीकच आले आहे. खासगी क्लासेसमधील शिकवण्या दिवसेंदिवस महागड्या होत आहेत. वाढत्या शुल्कावर अंकुश कसा लावावा, ही पालकांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. खासगी क्लासेसवर कोणत्याही सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसते. शुल्क भरल्याची पावती दिली जात नाही. गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा नसतात. क्लासमधून मिळालेल्या यशानंतर काही...
  April 9, 08:56 AM
 • सोलापूर - शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित धोरणामुळे नवीन कला, वाणिज्य व शास्त्र या पारंपरिक अभ्यासक्रम सुरू करण्यात जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांची अनुत्सुकता दिसून येत असल्याचे सोलापूर विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडगे यांनी सांगितले.सोलापूर विद्यापीठांतर्गंत 123 महाविद्यालयांमधून विविध अभ्यासक्रम चालवले जातात. कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयांपेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणारी महाविद्यालये सुरू करण्याकडे कल वाढत आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार...
  April 9, 08:55 AM
 • सोलापूर - सातत्याने हाताळण्यामुळे मोबाइलवर जिवाणू जमा होतात. त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. हे टाळण्यासाठी येथील निलीन बंडा याने जिवाणूविरोधी वाइप्सचा शोध लावला. या वाइप्सने मोबाइल पुसल्यास हॅण्डसेटवरील जिवाणू दूर होतात.बंडा उद्योग समूहाचे प्रमुख कृष्णाहरी बंडा यांचा नातू निलीनने व्यवस्थापनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर संशोधनाकडे लक्ष वेधले. मोबाइलवरील जंतुसंसर्गाची एक बातमी टीव्हीवर पाहण्यात आली. ब्रिटिश प्रयोगशाळेतील संशोधकांनी याची विस्तृत माहिती दिली होती....
  April 9, 05:56 AM
 • सोलापूर - सण, उत्सव, जयंतीसाठी पोलिस बंदोबस्ताची गरज लागत नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेत येण्याची गरज आहे, असे आवाहन पोलिस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलिस मुख्यालय मैदानावर मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलिस अधिकारी, महापालिका अधिका-यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी प्रत्येक मंडळासोबत पोलिस बंदोबस्त न ठेवता संपर्क पोलिस मित्र म्हणून एक पोलिस शिपाई नेमण्यात येईल. डॉल्बीचा...
  April 8, 12:50 PM
 • सोलापूर - रेल्वेच्या झोळीत भरभरून दान टाकणा-या सोलापूरकरांना मात्र विविध सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या 20 वर्षांपासून ही परिस्थिती कायम असून, विकासकामे, सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करून रेल्वेने शहरवासीयांची क्रूर चेष्टा केली आहे. रेल्वेमार्ग दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामांना विलंब लागत असल्याने अनेक गाड्यांना फटका बसत आहे. रेल्वेची ही उदासीनता शहराच्या प्रगतीतही अडसर ठरू लागली आहे.दहा लाख लोकसंख्येच्या या शहरातून दररोज साधारण 40 हजार जण रेल्वेतून प्रवास करतात. शहरात...
  April 8, 12:41 PM
 • सोलापूर - महापालिकेचा कारभार 'आंधळे दळते अनकुत्रे पीठ खाते' असे असल्याचा अनुभव सोलापूरकरांना आला आहे. खुद्द महापौरांना आता नगर अभियंता कार्यालयाच्या ढिसाळपणाचा अनुभव घ्यावा लागत आहे. कारण, महापौर निवाससमोरील रस्ता उखडलेला असतानाही नगर अभियंता खात्याकडून गेल्या कित्येक दिवसांपासून त्याची दखल घेतली जात नाही. यावरून नागरिकांच्या तक्रारीकडेही पाहिले जात नसणार हे नक्की आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून शहरातील काही मुख्य रस्ते विकसित करण्यात आले. मेकॅनिकी चौक ते होटगी...
  April 8, 12:34 PM
 • सोलापूर - विजापूर रस्त्यावरील राखीव, संरक्षित वनक्षेत्रात असलेल्या सिद्धेश्वर वनविहारात तोडण्यात आलेल्या झाडांचा शनिवारी वनविभागाने पंचनामा करून गुन्हे दाखल केले. वनक्षेत्राच्या संरक्षणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका अधिका-यासह दोन कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.माशाळवस्ती लगत असलेल्या वनविहाराचे कुंपण तोडून शंभरपेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक दिव्य मराठीने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले. वनविभागाने त्याची...
  April 8, 12:29 PM
 • सोलापूर - किल्ला बागेतील नागबावडी विहिरीतून उपसा करण्याची परवानगी मिळाल्यास 15 हजार नागरिकांना वापरण्यासाठीचे पाणी मिळू शकते. पुरातत्त्व विभागाकडून परवानगी न मिळवताच या योजनेचे काम केल्याने महापालिकेचे 20 लाख रुपये वाया जाण्याची भीती आहे. नऊ वर्षांपूर्वी हे काम पूर्ण झाले असले तरी योजना बंदच आहे.अभ्यासू वृत्तीचा अभाव आणि तांत्रिक माहिती नसलेले अधिकारी यामुळे महापालिकेचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचा एक नमुना समोर आला. योजना यशस्वी होईल की नाही याचा कोणताही विचार न करता आठ...
  April 8, 12:23 PM
 • सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या 40 वर्षांत एक गोष्ट प्रथमच घडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना बाजूला ठेवून केल्या गेल्या. आजवर असे कधी घडले नव्हते.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या बदललेल्या घडीचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचा परिणाम सोलापूर जिल्ह्याला प्रकर्षाने जाणवला. 1972 च्या दुष्काळादरम्यान विजयसिंह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून अगदी...
  April 8, 04:43 AM
 • सोलापूर । पाण्यासाठी नागरिकांतून व्यक्त होणारा संताप पाहून लोकप्रतिनिधींनी केलेल्या हालचालींमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरासाठी टंचाई निधीतून 2 कोटी 77 लाख रुपये तातडीने मंजूर केले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिका-यांमार्फत प्रस्ताव सादर केला होता. विस्कळीत आणि दूषित पाणीपुरवठ्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केल्यानंतर आमदार शिंदे यांनी टंचाई निवारण निधीसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अनियमितपणा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत...
  April 8, 04:15 AM
 • सोलापूर- मच्छिंद्र मोरे दिग्दर्शित मुक्ती हा चित्रपट शुक्रवारी आशा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सोलापूरचे अमीर व अश्विनी तडवळकर यांची या चित्रपटात भूमिका आहे. या चित्रपटाचे कथानक कर्जबाजारी शेतक-याच्या आत्महत्येवर आधारित आहे.दुष्काळग्रस्त भागातील भानू हा पाण्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतो. यासाठी त्याला सावकाराचे कर्ज घ्यावे लागते, पण विहिरीला पाणी लागत नाही. त्या नैराश्यात तो कोरड्या विहिरीत आत्महत्या करतो. इथंपर्यंतचा मध्यांतर व त्यानंतर...
  April 8, 12:15 AM
 • सोलापूर - शहरातील प्रमुख हॉटेलांसह परमिट रूम, बिअर बार आणि एमआयडीसीतील काही कारखाने यांच्याकडे अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉटेल सिटी पार्कच्या किचन रूमला गुरुवारी आग लागली. त्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने अग्निशामक दलाकडे केलेल्या चौकशीतून हॉटेल व्यावसायिक आणि कारखानदारांची बेफिकिरी उघडकीस आली आहे.आगीच्या घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते. हॉटेल व्यावसायिक व कारखानदार यांना...
  April 7, 12:55 PM
 • सोलापूर - दारात ढवळ्या-पवळ्याची बैलजोडी असणारा शेतकरी काळाच्या ओघात नव्या तंत्रज्ञानाची कास धरत ट्रॅक्टर बाळगू लागला आहे. तरीही ट्रॅक्टर सर्वांनाच परवडतो, असे नाही. त्यावर उपाय म्हणून एसईएस तंत्रनिकेतनच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी दिसायला लहान, वजनाने हलका, शिवाय किमतीत कमी अशा तीन चाकी टॅक्टरची निर्मिती अवघ्या पंधरा हजार रुपयांत करून नवा आविष्कार घडवला आहे.फक्त 46 किलो वजनाचा हा मिनी ट्रॅक्टर आहे. यासाठी विशाल काशीद, मल्लिकार्जुन खराडे, उमेश कांबळे, रितेश अंबेकर आणि ओकार...
  April 7, 12:48 PM
 • सोलापूर - सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या मंदिरास पाच प्रवेशद्वार आहेत. यापैकी लक्ष्मी मंडईकडील प्रवेशद्वारात कायम कच-याचा ढीग असतो. याच प्रवेशद्वारात सुलभ शौचालय असून, भंगारची दुकानेही आहेत. मंडईतील भाजीपाल्याचा कचरा इथे मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत असल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा कायम ठिय्या असतो. इथला कचरा उचलला जात असला तरी महापालिकेच्या आरोग्य विभगाचे इथे दुर्लक्ष आहे, तर मंदिर समितीची उदासीनता असल्याने हे प्रवेशद्वार अस्वच्छतेच्या...
  April 7, 12:40 PM
 • सोलापूर - शहरात जवळपास एकोणपन्नास टक्के गॅसग्राहक कुटुंबांच्या शिधापत्रिकांवर शिक्केच मारले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रेशनिंगच्या रॉकेलचा व घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. सोलापूर शहरात दोन लाख तेरा हजार आठशे सदतीस शिधापत्रिकाधारक कुटुंबं असून, यापैकी एक लाख 98 हजार कुटुंबं गॅसग्राहक आहेत. दोन सिलिंडर असणा-या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशनवर रॉकेल नाही, तर एक सिलिंडरधारक कुटुंबांना फक्त चार लिटर रॉकेल दिले जाते. गॅसग्राहक कुटुंबांच्या...
  April 7, 12:35 PM
 • सोलापूर - महापालिका निवडणुकीत दररोज पाणीपुरवठा करणार असल्याचा जाहीरनामा सोलापूरकरांसमोर मांडण्यात आला होता. ही अशक्य गोष्ट मान्य करून, निवडणुकीनंतर दररोज नाही तर किमान दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा होईल, या आशेत नागरिक होते. परंतु त्यांची घोर निराशा झाली. पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रात्री-अपरात्री कधीही पाणी सोडले जाऊ लागले. त्याला दाब नाही, मुबलक पुरवठा नाही. काही भागात पुन्हा दूषित पाणी. या घटनांमुळे नागरिक वैतागले आहेत. महापालिका, नगरसेवकांच्या घरी आणि विभागीय कार्यालयांवर...
  April 7, 12:25 PM
 • सोलापूर- शहराजवळील संरक्षित राखीव वनक्षेत्र असलेल्या सिद्धेश्वर वनविहारात सध्या राजरोसपणे झाडांची कत्तल होत असून, आतापर्यंत 100 पेक्षा जास्त झाडे तोडण्यात आली आहेत. यामुळे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या वनविहाराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.विजापूर रस्त्यावरील माशाळ वस्तीलगत वनविहाराचे कुंपण तोडण्यात आले आहे. येथून वनविहारात घुसून झाडे तोडली जातात. रोज एक झाड तोडले, तरी तोडणा-याला किमान दीड ते दोन हजार रुपये मिळतात. त्यामुळे चोरून...
  April 7, 04:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED