जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - समाजकल्याण आश्रमशाळांतील मुलांसाठी सरकारकडून मोफत उपलब्ध झालेल्या टॉनिकच्या बाटल्या गुरुवारी प्रतापनगर रस्त्यावरील सिद्धेश्वर वनविहार येथील पुलाखालच्या नाल्यात आढळून आल्याने आश्रमशाळांची अनास्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.समाजकल्याण कार्यालयातंर्गत जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण 94 आश्रमशाळा कार्यरत आहेत. समाजकल्याण अंतर्गत जिल्ह्यात एकूण पंधरा वसतिगृहे आहेत. आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शासनाकडून अनेक...
  May 25, 12:38 PM
 • सोलापूर - गेल्या आठवड्यात 32, 37 आणि 62 वर्षांच्या तिघा पुरुषांनी आत्महत्या केल्या. 32 वर्षाच्या युवकाने विडी घरकुलच्या पोगूल विहिरीत स्वत:ला झोकून दिले, तर 37 वर्षांच्या माणसाने केकडे नगरातील विहिरीत उडी मारली. 62 वर्षांच्या गृहस्थाने घरातच गळफास घेतला. पोलिसांच्या तपासात आत्महत्यांचे कारण होते; दोन युवक पोटाच्या आजाराला कंटाळले, तर ज्येष्ठ व्यक्ती दम्याला कंटाळला. प्रत्यक्षात हे तिघे मटक्याच्या आकड्यांचे बळी ठरले आहेत.मूळ कारणाकडे डोळेझाक - दिव्य मराठीने या घटनांतील कुटुंबांची परिस्थिती...
  May 25, 12:36 PM
 • सोलापूर - कार, ट्रक आदी मोठ्या वाहनांना बारकोड येणार असून, त्याची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार आहे. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तपासणी नाक्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. ते 1 जुलैपासून सेवेत रुजू होणार आहे.सध्या टाकळी येथे असणा-या तपासणी नाक्याच्या ठिकाणी वाहनांना बारकोड लावण्याचे काम होणार आहे. सद्भाव कंपनीला बारकोड लावण्याचे कंत्राट संपूर्ण राज्यासाठी देण्यात आले आहे. नाक्यावरून येणा-या व जाणा-या चारचाकी व त्यापेक्षा जास्त...
  May 25, 12:34 PM
 • सोलापूर - सिटीबसमध्ये अंध तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी अखेर तीन दिवसांनंतर सिटीबस वाहकाविरुद्ध सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला. वाहकाविरुद्ध मानवी हक्क आणि अपंग हक्क संरक्षण कायदा या कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. अंध तरुण औदुंबर बंडगर (रा. कुमठा नाका, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे आई, वडील, दोन भाऊ पुण्यात राहतात. पुणे-सोलापूर रेल्वे प्रवासात ते खेळणी, चॉकलेट विक्रीचा व्यवसाय करतात. एकवीस मे रोजी ते पत्नी कांचनसमवेत सोलापुरात कामानिमित्त आले होते. जुना होटगी नाका येथून...
  May 25, 12:31 PM
 • सोलापूर - जुना पुणे नाका येथील मडकीवस्तीत राहणा-या भारती शरणप्पा दलवाई यांच्या घरात गुरुवारी पहाटे चोरी झाली. त्यांच्या घरातील कपाट उघडून अकरा तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, बारा हजार रुपये, एक मोबाइल असा ऐवज चोरीला गेला आहे. दलवाई या शासकीय रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात.श्रीमती दलवाई यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घरातील सर्वजण गच्चीवर झोपण्यासाठी गेले. पहाटेच्या दरम्यान, चोराने गच्चीवरील खांबावर ठेवलेली चावी घेऊन...
  May 25, 12:30 PM
 • सोलापूर - भारत गारमेंटमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी विशेष लेखापरीक्षकांनी संबंधित संचालकांवर निश्चित केलेली रक्कम वसुलीसाठी फौजदारी गुन्ह्यास पात्र असल्याचा निर्वाळा देत संबंधितांवर सहा आठवड्यांत कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 24 एप्रिल 2012 रोजी हा निर्णय दिला.येथील भारत गारमेंटच्या लेखापरीक्षण अहवालात 77 लाख 89 हजार 939 रुपयांच्या तोट्यास चेअरमनसह संचालक मंडळास जबाबदार धरून, गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सहा आठवड्यांत कारवाई करून अहवाल सादर...
  May 25, 12:28 PM
 • सोलापूर - भूमी व मालमत्ता विभागात झालेल्या भंडे घोटाळ्याबाबत दोन वर्षांनी तपास सुरू केला आहे. त्याच्या प्राथमिक चौकशीसाठी गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिदास मुंडे यांनी पथकासह महापालिका गाठली. तपासकामातील प्रगतीबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.तपासकामासाठी आवश्यक कागदपत्रे, चौकशी अहवाल देण्याच्या मुद्द्यावरून महापालिका अधिकारी व पोलिस टोलवाटोलवी करीत होते. याविषयीची बातमी दिव्य मराठीने प्रसिद्ध केली होती. ही कागदपत्रे आता महापालिकेकडून सोमवारी...
  May 25, 12:27 PM
 • सोलापूर । अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनातर्फे शुक्रवारी उर्दूचे ज्येष्ठ लेखक डॉ. अब्दुल सत्तार दळवी यांना राष्ट्रीय स्तरावरील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दळवींच्या रूपाने मराठी-उर्दू साहित्य सेतूचा गौरव होत आहे. त्यांनी संत रामदास यांचे मनाचे श्लोक, संत ज्ञानेश्वर यांची वैश्विक प्रार्थना पसायदान आदी मराठी साहित्य उर्दूत नेले आहे. तसेच प्रसिद्ध कवी अब्दुलअहेद साझ (मुंबई) यांना राज्यस्तरीय, तर कवी एजाज नबी कारीगर (सोलापूर) यांना जिल्हास्तरीय पुरस्कारने...
  May 25, 01:27 AM
 • सोलापूर - मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून, सोलापूरसाठी सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडण्याची प्रतीक्षा आता पाटबंधारे खात्याला लागली आहे.सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडावे, अशा आशयाचे पत्र पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता दिनकर सोनवलकर यांनी उस्मानाबाद पाटबंधारे खात्याकडे पाठवले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार सर्व तयारी करण्यात आली असून सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडण्यात यावे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीवरील...
  May 24, 11:10 AM
 • सोलापूर - महापालिका व वन विभागातर्फे शहरात तीन लाख रोपे लावण्यात येणार आहेत. या झाडांच्या सावलीमुळे शहराचे तापमान किमान अर्ध्या अंशाने कमी होणार आहे. मात्र, कळीचा प्रश्न आहे तो रोपांचा झाडांमध्ये रूपांतर होण्याचा. नागरिकांना या कामी सहभागी करून घेण्याचा महापालिकेचा मानस आहे.जून ते ऑगस्ट दरम्यान शहरात वन महोत्सव अंतर्गत तीन लाख रोपे लावण्यात येणार आहे. त्याची सुरुवात 1 जूनपासून होणार आहे. महापालिका आणि वन विभागाने त्याचा आराखडा तयार केला आहे. शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, गृहनिर्माण...
  May 24, 11:08 AM
 • सोलापूर - एकाच ठिकाणी दोन-दोन टपाल कार्यालये सुरू असण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. नीलानगरचे कार्यालय मंगळवार पेठ कार्यालयात हलविले आहे, तर शनिवार पेठेतील कार्यालय साखर पेठ कार्यालयात हलविण्यात आले आहे. या ठिकाणी दोनच कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढलेला आहे.नीलानगर कार्यालयाची इमारत पडल्याने, तर शनिवार पेठ कार्यालयाची इमारत खराब स्थितीत असल्यने ही दोन्ही कार्यालये हलविण्यात आली. जिल्हा न्यायालय पोस्ट कार्यालयाची गत वेगळी नाही. ते गुरुनानक चौकात हलविण्यात आले आहे....
  May 24, 11:06 AM
 • सोलापूर - शहरात दर माणसी देण्यात येणारा रॉकेलचा कोटा वाढवून द्यावा, बेकायदेशीर कपात दाखवून रॉकेलचा आणि धान्याचा काळाबाजार करणा-यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी माजी आमदार नरसय्या आडम यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे तीनशे कार्यकर्त्यांसह त्यांनी भर उन्हात ठिय्या मांडला.सकाळी साडेअकरा वाजता आडम यांचे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच त्यांनी ठिय्या मांडला. पोलिसांनाही असे काही घडेल याची...
  May 24, 11:03 AM
 • सोलापूर - हजारो रुपये फी घेऊन स्पर्धा परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्लासेस उदंड झाल्याच्या या जमान्यात ते विनामूल्य क्लास घेत आहेत. स्पर्धा परीक्षेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपले घर देऊन स्वत: मात्र भाड्याच्या घरात राहिले. हा मुलखावेगळा गुरू सोलापूरच्या जिल्हा परिषदेत वरिष्ठ लेखाधिकारी पदावर काम करत आहे. गेल्या 10 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून काम करणा-या या 34 वर्षीय...
  May 24, 10:58 AM
 • सोलापूर - दिवसेंदिवस वाढत जाणा-या महागाईत सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असताना केंद्र सरकारने पेट्रोलची दरवाढ केली. महागाईने होरपळलेल्या जीवावर सरकारने एकप्रकारे निखाराच ठेवला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी नोंदविली.दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री जयपालरेड्डी यांनी पेट्रोलमध्ये तत्काळ दरवाढ व्हावी, अशी मागणी केली. त्यावर केंद्र सरकारने निर्णय घेत लिटरमागे 7 रुपये 50 पैशांची घसघशीत दरवाढ केली. गुरुवार 24 मेच्या मध्यरात्रीनंतर...
  May 24, 10:56 AM
 • सोलापूर - संतोष माने या माथेफिरू एसटी चालकाने पुण्यात घातलेला धुडगूस ताजा असतानाच महामंडळाने दोन मनोरुग्ण चालकांना सेवेतून बडतर्फ केले. शिवाय दोघांना सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले आहे. एसटी प्रशासन गांभीर्याने कारवाई करत असल्यामुळे एसटीची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे.संतोष मानेने सात जणांना चिरडल्यानंतर एसटी महामंडळ खडबडून जागे झाले. त्यानंतरच चालक-वाहकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे युद्धपातळीवर सुरू झाले. या तपासणीतून आता खळबळजनक सत्य समोर येऊ लागले आहे. ताज्या घटनाक्रमात...
  May 24, 10:53 AM
 • सोलापूर - शहरात दोन प्रभागांसाठी एक प्रमाणे 26 उपविभागीय कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या मिनी झोन कार्यालयामुळे प्रमुख विभागीय कार्यालयावरील ताण कमी होणार आहे. त्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता यांच्यावर राहणार आहे. विभागीय कार्यालयाची नवी रचना होणार आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी महापौरांच्या प्रियदर्शनी निवासस्थानी बुधवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी एक जूनपासून होईल. त्याबाबतचा आराखडा प्रशासन गुरुवारी पदाधिका-यांकडे सादर करेल. विभागीय कार्यालयाची...
  May 24, 10:52 AM
 • सोलापूर - पुणे विभागीय डी. टी. एड. या अभ्यासक्रमासाठीची अर्ज विक्री सुरू झाली असली तरी सोलापूर जिल्ह्यातून आजपर्यंत केवळ 92 इतकीच अर्जांचीच विक्री झाली आहे. पूर्वी डी.एड. नावाने ओळखला जाणारा हा अभ्यासक्रम आता डी.टी.एड. (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन) नावाने ओळखला जातो.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे वेळापूर व सोलापुरातील नेहरू वसतिगृह येथे डी.टी.एड. येथे अर्ज विक्री 17 मे पासून सुरू झाली आहे. अर्ज विक्रीची मुदत 30 मे अखेर असून स्वीकृतीची मुदत 31 मे अशी आहे. बारावी निकाल अद्याप लागला नसल्याचा...
  May 24, 10:50 AM
 • सोलापूर - सिटीबसने प्रवास करीत असताना औदुंबर तुळशीराम बंडगर या अंधास त्यांच्या पत्नीसमोर मारहाण करणा-या डी. एन. कुरेशी या वाहकास निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी परिवहन व्यवस्थापक अजित खंदारे यांना दिले आहेत.अंध दांपत्य सोमवारी आठ नंबर बसने प्रवास करीत असताना बंडगर यांनी सवलतीच्या तिकिटाची मागणी केली. त्यावेळी बाचाबाची झाल्याने कुरेशी यांनी त्या अंधास मारहाण केली. याप्रकरणी परिवहन सभापती मल्लेश बडगू यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार वाहक कुरेशी यांना...
  May 23, 03:24 PM
 • सोलापूर - सीना नदीवरील 21 पैकी 18 बंधा-यांची दारे उघडण्यात आली आहेत. उर्वरित बंधा-यांचे दरवाजे बुधवारी उघडण्यात येणार आहेत. यानंतर आता सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडण्यासाठी उस्मानाबादच्या पाटबंधारे खात्याला पत्र पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता दिनकर सोनवलकर यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीवरील बंधा-यांची दारे उघडून दक्षिण तालुक्यास पाणी द्यावे आणि नंतर सीना-कोळेगाव धरणातून पाणी सोडावे, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या...
  May 23, 11:28 AM
 • सोलापूर - यंदा जूनपासून पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रणाली वापरली जाणार असल्याची सूचना सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाइटवर गेल्या तीन दिवसांपासून झळकत होती. याबाबत महाविद्यालयांकडून विद्यापीठ प्रशासनाला विचारणा झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनही गोंधळात पडले. अशा प्रकारची कोणतीही सूचना विद्यापीठाकडून देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यापीठ आणि एमकेसीएल यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे उघड झाले.सोलापूर विद्यापीठाच्या वेबसाइटवर गेल्या तीन...
  May 23, 11:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात