Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - सोलापूर शहर सीमावर्ती असल्यामुळे आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांतून येणा-या वाहनांचीही संख्या मोठी आहे. एस. टी. स्टँडचा परिसर, रेल्वे स्टेशन, मेकॅनिक चौक, मार्केट यार्ड, शांती चौक, टिळक चौक, मधला मारुती आदी भागांत वाहनधारकांचा कस लागतो. पार्किंग झोनचा परिसर हा नव्या पेठेलगत आहे, त्यामुळे नव्या पेठेत जाणा-या वाहनांची संख्या कमी होत असली तरीही शहरातील अनेक प्रमुख बाजारपेठांलगत कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक बाजारपेठेत आपल्या दुचाकी घेऊनच प्रवेश करतात....
  April 6, 11:45 AM
 • सोलापूर - पर्यावरण हा विषय वर्गातील चार भिंतींमध्ये बसून शिकण्याचा आणि शिकवण्याचा नाही. विद्यार्थ्यांना थेट निसर्गामध्ये नेऊन वन्यजीव, झाडे, वनस्पतींची माहिती देता यावी, या उद्देशाने वनविभागातर्फे सिद्धेश्वर वनविहारात निसर्ग परिचय केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात मुंबईनंतर शहराच्या लगत 450 एकर राखीव वनक्षेत्र असणारे सोलापूर हे एकमेव ठिकाण आहे. वनविहारात 2011-12 या शैक्षणिक वर्षामध्ये 25 पर्यावरण...
  April 6, 11:43 AM
 • सोलापूर - चार हुतात्मा पुतळ्यासमोरील हॉटेल सिटी पार्कच्या किचनला गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, हॉटेलचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले.हॉटेलच्या पाठीमागील बाजूस किचन आहे. कढईमध्ये पदार्थ तयार करताना आगीचा भडका उडाला अन् एक्झॉस्टमधून आगीच्या ज्वाळा बाहेर आल्याने बाहेरील फायबरच्या पत्र्यांनी पेट घेतला. लागलीच कर्मचा-यांनी किचनमधील गॅस टाक्या बाहेर काढल्या. आग वेगाने पसरत गेल्याने हॉटेलमध्ये धुराचे लोट पसरले....
  April 6, 11:42 AM
 • सोलापूर - देशात दुर्मीळ असलेल्या माळढोक पक्ष्यांच्या छायाचित्रणास यंदाच्या वर्षीपासून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने बंदी घातली आहे. या निर्णयाचे माळढोकप्रेमींनी स्वागत केले, तर अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय पक्षी सूचीमध्ये अतिदुर्मीळ पक्ष्याच्या यादीत माळढोकचा समावेश आहे. या पक्ष्यांसाठी महाराष्ट्रात नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे स्वतंत्र अभयारण्य आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबरदरम्यान माळढोकांचा प्रजननाचा कालावधी असतो. मादीला आकर्षित करण्यासाठी नर माळढोक...
  April 6, 11:40 AM
 • सोलापूर - शहरातील औद्योगीकरण ढासळत असताना उद्योगवाढीचे विविध उपाय योजण्याविषयी नुसतीच चर्चा होते. परंतु जिल्हा उद्योग केंद्रातील महाव्यवस्थापकपद भरणेही गेल्या दोन वर्षांपासून जमले नाही. हे पद रिक्त असल्याने सुशिक्षित बेरोजगारांची प्रकरणे प्रलंबित आहेत. शासकीय योजनांचा तर पत्ताच नाही.होटगी रस्त्यावरील या केंद्रातून उद्योगविषयक महत्त्वाचे कामकाज चालते. त्यासाठी महाव्यवस्थापक असे महत्त्वाचे पद आहे. पंतप्रधान रोजगार योजना, बीजभांडवल योजना, रोजगार निर्मिती अशा महत्त्वाच्या...
  April 6, 11:39 AM
 • सोलापूर - नवीन बांधकाम करणा-यांसाठी एक खुशखबर असून, बांधकाम परवान्यासाठी महापालिकेत मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. यापुढे अॅटो डीसीआरअंतर्गत बांधकाम परवाना मागणी ऑनलाइन सादर करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेत बीओटीवर बांधकाम परवाना विभाग सुरू करण्यात आला आहे. परवाने कसे सादर करायचे त्यासाठी शहरातील अभियंते, वास्तुरचनाकार यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऑनलाइन प्रक्रियेसंबंधी विचारविनिमय करण्यात आला. परवान्यासाठी आवश्यक असलेले सर्वप्रकारचे शुल्क ऑनलाइन देण्याची...
  April 6, 11:37 AM
 • सोलापूर - शहर पुरवठा कार्यालयाने लोकसंख्येत बारा लाखांची लोकसंख्या वाढवून शिधापत्रिकांवरील युनिटच्या संख्येत तब्बल बारा लाखांची वाढ केली. दिव्य मराठीतून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेत कारवाईची तंबी दिली. त्यामुळे एफडीओ आणि चारही परिमंडळ अधिका-यांनी तातडीने बैठक घेऊन, अवघ्या काही तासांत वाढवलेली सहा लाख लोकसंख्या कमी केली. गैरप्रकार मोठा असल्याने आमदार विजयकुमार देशमुख यांनी हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला. पण, जिल्हा प्रशासनाने मात्र या...
  April 6, 11:36 AM
 • सोलापूर- करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाने आपल्या स्वत:च्या पिस्तूलमधून छातीवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमाराला कोर्टी गावात घडली. ज्ञानेश्वर ऊर्फ दादासाहेब सुभाष गायकवाड (36, रा. कोर्टी, ता. करमाळा) यांचा मृत्यू झाला. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. गायकवाड यांची गावात शेती आहे. दूध व्यवसाय, आनंद हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानात त्यांनी नऊ एमएम पिस्तुलमधून छातीवर गोळी झाडून घेतली. यानंतर...
  April 6, 05:11 AM
 • सोलापूर- ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या तिस-या वर्षात शिकणा-या 19 वर्षीय उमद्या तरुणाचा उजवा हात बस अपघातात तुटून 20 मीटर लांब जाऊन पडला. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा त्याला जगण्याचं बळ देत राहिली. त्याने डाव्या हातात कुंचला धरला आणि स्वत:ला पेंटिंगच्या विश्वात झोकून दिलं. अपघातापूर्वी काढत होता त्याहून उजवी चित्रे तो डाव्या हाताने साकारू लागला. या मूर्तीमंत जिद्दीचं नाव आहे झीशान युनूस दुर्गकर. सोलापूरपासून 100 किलोमीटरवर असणा-या विजापूर येथे झीशानची...
  April 6, 05:04 AM
 • सोलापूर - शहरात पाणीपट्टीची 43 कोटी रुपये थकबाकी आहे. सार्वजनिक नळांना तोट्या नसल्याने काही भागात पाणी आल्यावर अखंडपणे वाहून वाया जात आहे. दुसरीकडे महापालिकेने 25 टक्के पाणीपट्टी वाढ केली आहे. त्यामुळे नियमितपणे पाणीपट्टी भरणा-यांना वाढत्या कराचा बोजा पडणार आहे. बोगस जोड घेऊन पाणी वापरणा-या नळधारकांना महापालिका अभय देत असल्याचे स्पष्ट होत आहे.2011-12 मध्ये पाणीपुरवठा विभागाची 11 कोटी रुपयांची तूट दाखवून पाणीपट्टी वाढविण्यात आली. एकीकडे तूट दाखवत असताना दुसरीकडे मात्र बोगस नळ शोधमोहिमेतून...
  April 5, 10:32 AM
 • सोलापूर: मकाई साखर कारखान्याचे संचालक दादा गायकवाड यांनी राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घडना गुरुवारी पहाटे घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.कोर्टी गावातील आपल्या घरात आत्महत्या गावकवाड यांनी ही आत्महत्या केली. आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
  April 5, 10:32 AM
 • सोलापूर - महापालिका निवडणुकीत मतदान केले नाही, या समजापोटी रेल्वे स्टेशन परिसरातील काडादी चाळ भागात मध्यरात्री आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे या भागातील नागरिकांना वाटते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका आयु्क्तांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. काडादी चाळीत 310 घरे असून, तेथे सवर्सामान्य नागरिक राहतात. मागील 30 वर्षांत पाणीपुरवठा सुरळीत होत होता. मतदान केले नाही या कारणावरून पाण्यासाठी राजकारण सुरू झाल्याने महिला संतापल्या. सुमारे 200 महिलांनी रिकाम्या घागरी,...
  April 5, 10:30 AM
 • सोलापूर - त्यांच्याही चेह-यावर हसू आणू या! हे ब्रीद घेऊन जैन सोशल ग्रुपच्या वतीने प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. शरद दीक्षित यांना सोलापुरात आणून दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रियांची शिबिरे घेऊन उपचार केले. महावीर जयंतीनिमित्त ग्रुपच्या वतीने दरवर्षी विधायक उपक्रम हाती घेण्यात येतात. आतापर्यंत आयोजिलेल्या रक्तदान शिबिरांतून 2251 पिशव्या रक्ताचे संकलन झाले. सुमारे पाच हजार रुग्णांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या. सोलापूरसह बार्शी, पंढरपूर येथे आयोजिलेल्या शिबिरांतून डॉ....
  April 5, 10:29 AM
 • सोलापूर - उन्हाळ्यात रक्ताच्या मागणीत दुपटीने वाढ झालीय, तर तुलनेने रक्तदान शिबिरांचे प्रमाण मात्र घटले आहे. त्यामुळे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. शहरातील रक्तपेढ्यांमध्ये जेमतेम 60 ते 70 रक्ताच्या पिशव्या उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात रक्तदान केल्यामुळे अशक्तपणा आणि इतर आजार उद्भवतात, असा गैरसमज असल्याने दाते रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत, अशी माहिती डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे महेश देशपांडे यांनी दिली. लोकांनी भीती बाळगू नये. भरपूर पाणी प्या, उन्हाळ्यात रक्तदान केल्याने...
  April 5, 10:24 AM
 • सोलापूर - दमाणीनगर, हब्बू वस्ती, थोबडे वस्ती, गवळी वस्ती या भागात बुधवारी वीजपुरवठा बारा तास खंडित होता. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी थेट कोयनानगर येथील वीजवितरण कार्यालय गाठले. वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर कर्मचा-यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने नागरिकांच्या संतापात भर पडून तेथे गोंधळ सुरू झाला. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मागवावा लागला. या भागात सकाळी साडेनऊपासून वीज बंद होती. रात्री साडेनऊपर्यंत वीजपुरवठा सुरू झाला नाही. शेवटी रात्री 9.45 वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.
  April 5, 10:23 AM
 • सोलापूर - सोलापूर शहर पुरवठा कार्यालयाने स्वस्त धान्य व रॉकेलची शासनाकडे मागणी करण्यासाठी शहराच्या लोकसंख्येत तब्बल सहा लाखांची वाढ केली. शहरात अ, ब, क, ड चार परिमंडळ कार्यालये आहेत. परंतु, एकट्या क झोनमध्ये पाच लाख लोकसंख्येची असलेली वाढ सोमवारी 2 एप्रिल रोजी अवघ्या काही तासांत कमी करण्यात आल्याने घोटाळ्याचे गांभीर्य आणखीन वाढले आहे.नुकत्याच 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत शहराची लोकसंख्या नऊ लाख 51 हजार 118 असल्याची नोंद आहे. परंतु, एफडीओ कार्यालयाच्या रेकॉर्डवर गेल्या काही वर्षांपासून शहराची...
  April 5, 10:21 AM
 • सोलापूर - मार्चनंतरही यंदा सुताचे दर स्थिर आहेत. पक्क्या मालाला उठाव आहे; परंतु मनुष्यबळाचा अभाव आणि विजेच्या भारनियमनामुळे उत्पादनात घट होत आहे. साधारण फेब्रुवारी व मार्चमध्ये कापसाची निर्यात होत असल्याने या काळात सुताच्या दरात वाढ होत असते. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून दर कमी होण्यास सुरवात होते.गेल्या वर्षी मार्चमध्ये सुताच्या दराने अक्षरश: कहर केला होता. 120 रुपये किलो दराने मिळणारे सूत (20 सिंगल) 220 रुपये झाले होते. त्यामुळे निर्यातदारांना जबरदस्त फटका बसला. त्यानंतर...
  April 5, 10:20 AM
 • सोलापूर - जुना पुणे नाका ते सोरेगाव या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विजापूर रस्त्यावरील पुलाचेही रुंदीकरण अपेक्षित आहे, पण तेही काम अर्धवटच आहे. पुलावरून वर जाताना डाव्या बाजूस वॉटरफं्रट हे नवीन संकुल उभारले जात आहे. पुलावरील रस्त्याचे रुंदीकरण करताना नागमोडी वळणानुसार करण्यात आले आहे, तर वॉटरफं्रटचे कार्यालय अगदी रस्त्यालगत आहे. हैदराबादहून येणारी जड वाहने या ठिकाणी मोठे वळण घेऊन पुढे जातात. त्यामुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे.गोरगरिबांची घरे,...
  April 5, 10:19 AM
 • सोलापूर - सोलापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील कर्नाटक सीमेलगतचे शहर म्हणून ओळखले जाते. जैन मुनी नेहमी पायी विहार करतात. ते दक्षिण भारताकडे निघाले की सोलापूरला अवश्य येत. त्यांच्यासोबत त्यांचे भक्तगण असत. त्यापैकी अनेक श्रावक गुजरात, कर्नाटक, मध्य. प्रदेश येथून येऊन सोलापुरात स्थायिक झाले. मूळचे सोलापुरातलेही अनेक जैन भक्त होतेच. त्या सर्वांनी आराधनेसाठी जैन मंदिरांची स्थापना केली.जैन समाजात मुख्यत: दिगंबर व श्वेतांबर असे दोन संप्रदाय आहेत. सोलापूर जिल्ह्यात शेकडो जैन मंदिरे आहेत. परंतु...
  April 5, 10:18 AM
 • सोलापूर- तुमच्यातील मतभेद बैठकीपूर्वीच का संपवले नाहीत. चुकीच्या वागण्याचा पक्षाला फटका बसला असून ते मला मान्य नाही. मोठ्या साहेबांनी ही घटना गंभीरतेने घेतली असून तेच 6 एप्रिलच्या सांगोला दौ-यात निर्णय घेतील, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह स्थानिक नेत्यांची मंगळवारी झाडाझडती घेतली.जिल्हा परिषद विषय समिती सभापतीच्या निवडीदरम्यान राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसला. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि ज्येष्ठ...
  April 5, 05:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED