Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • पंढरपूर- चैत्री एकादशीनिमित्त मंगळवारी श्रीक्षेत्र पंढरीत तब्बल दोन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. एकादशीनिमित्त पहाटे अडीच वाजल्यापासूनच चंद्रभागा नदीत स्नानासाठी वारक-यांनी गर्दी केली होती, त्यामुळे अवघे पंढरपूर विठ्ठलमय झाले होते.आषाढी व कार्तिकी एकादशीप्रमाणेच चैत्र महिन्यातील एकादशीलाही दरवर्षी पंढरीत भाविकांची मोठी गर्दी होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यासह देशभरातून भाविकांचे जत्थेच्या जत्थे या तीर्थक्षेत्री दाखल होत आहेत. शहरातील मठ, धर्मशाळा तसेच मंदिर...
  April 4, 02:36 AM
 • सोलापूर - महानगरपालिकेत लोकशाही दिन हा अधिका-यांच्या मर्जीवर चालतो याचा अनुभव शहरवासीयांना सोमवारी आला. सकाळी 9 वाजता सुरू होणा-या लोकशाही दिनाकडे 10 वाजेपर्यंत अधिकारी फिरकलेच नाहीत. तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांना अधिका-यांची प्रतीक्षा करावी लागली.सकाळी 9.10 वाजता तीन नागरिक महापालिकेत आले. त्यावेळी तक्रारींचे टोकन नंबर देणारी खिडकी बंद होती, ती 9.35 वाजता उघडली. सकाळी 10.15 वाजता महापालिकेच्या जुन्या सभागृहात जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे वगळता कोणीही उपस्थित नव्हते. लोकशाही दिनात...
  April 3, 11:32 AM
 • सोलापूर - सुटी म्हणजे धम्माल, सुटी म्हणजे मौजमजा आणि करमणूक, असा विचार आजचा युवक करीत असेल, असा समज रूढ आहे. परंतु हा झाला पारंपरिक विचार. स्पर्धात्मक युगातला आजचा युवक वेगळाच विचार करीत आहे हे काही युवकांशी संवाद साधल्यावर दिसून येते. शहरातील अनेक युवक यंदा उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मामाच्या गावाला न जाता नॉलेजच्या गावाला म्हणजे काही नवे शिकायला जाणार आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेतून दिव्य मराठीला समजले, की सोलापूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी स्वप्ने डोळ्यांत घेऊन जगत आहेत आणि नवनवीन...
  April 3, 11:28 AM
 • सोलापूर - शहराच्या पूर्व भागातील गेंट्याल थिएटर परिसर, गावठाण भागातील कसबा आणि हद्दवाढ भागात नई जिंदगी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. याविषयी नागरिकांमध्ये संताप आहे. उजनी, टाकळी आणि हिप्परगा तलाव येथून येणा-या पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. रोज 130 दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केले जाते. त्यासाठी दरवर्षी तीन कोटी रुपये महापालिका खर्च करते. एकीकडे शहरात पाणीपट्टीत 25 टक्याने वाढ होणार आहे. तर दुसरीकडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.येथे होत आहे दूषित पाणीपुरवठा टिळक चौक, कसबा, भडंगे गल्ली,...
  April 3, 11:16 AM
 • सोलापूर । कर्नाटकात खून, जबरी चोरी, दरोडे, सुपारी घेऊन खून करणे या गुन्ह्यातील दोघा अट्टल गुन्हेगारांना सोमवारी न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रवी शांतप्पा शिंदे (24, रा. चडचण), यलप्पा श्रीमंत काळे (25, रा. कुरघोट, दक्षिण सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. परिमंडळ उपायुक्त पथकाने दोघांना नई जिंदगी भागातील टिळक नगरात रविवारी सापळा रचून अटक केली होती. दोघा संशयितांवर कर्नाटकातील विजापूर, चडचण, रायबाग पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकातून...
  April 3, 11:10 AM
 • सोलापूर - एमआयडीसीतील यंत्रमाग कारखान्यांतील प्रक्रिया केलेले 20 लाख लिटर पाणी (दोन एमएलडी) दररोज गटारीत जात आहे. सूत रंगणीनंतर बाहेर पडणा -या पाण्यात घातक रासायनिक घटक असतात. ते नष्ट करून पाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी सीईटीपी (कॉमन इन्फ्लुएंट ट्रिटमेंट प्लँट) सुरू करण्यात आला आहे. मात्र पुनर्वापर होत नसल्याने साडेचार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प कुचकामी ठरला आहे. पाइपलाइन करून द्या अशी यंत्रमागधारकांची मागणी असून, महापालिका मात्र टँकरने पाणी उचलण्याची सूचना करीत आहे. यंत्रमाग...
  April 3, 11:07 AM
 • सोलापूर- शहराच्या लोकसंख्येत सहा लाखांची बोगस वाढ करून रेशनिंगचे कोट्यवधी रुपयांचे रॉकेल व धान्य काळ्या बाजारात उपलब्ध केल्याप्रकरणी सोमवारी पालकमंत्री ढोबळे यांनी पुरवठा अधिका-यांची खरडपट्टी केली. गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवणा-यांवर तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचेही आदेश ढोबळेंनी दिले. विशेष म्हणजे शहर पुरवठा कार्यालयाने सोमवारी एकाच दिवसात रेकॉर्डवरील सहा लाख लोकसंख्या कमी केली. तर अ,ब,क,ड या चारही परिमंडळ अधिका-यांना खुलासा करण्याची नोटीस बजावली असून, कारवाईचा...
  April 3, 06:12 AM
 • सोलापूर- सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत आज झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्ताधारी राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसला. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थक उमेदवाराचा पराभव झाला. पक्षाचा व्हीप असतानाही अध्यक्ष, उपाध्यक्षांनी बंडखोराला साथ दिल्याची घटना घडली. जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी सोमवारी दुपारी तीन वाजता निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी...
  April 3, 06:06 AM
 • सोलापूर - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी पाणीपट्टी वाढीच्या एका विषयावर सुमारे सहा तास चर्चा झाली. तर उरलेले सातशे कोटींचे अंदाजपत्रक अवघ्या अडीच तासांत मंजूर करण्यात आले, ते पण रात्री उशिरा. रस्ते, पाणी, दिवाबत्ती, ड्रेनेज, शासकीय अनुदान आदी नेहमीचे विषय घेऊन 2012-13 वर्षाचा अंदाजपत्रक आयुक्त अजय सावरीकर यांनी तयार केला. त्यावर चर्चा करताना सत्ताधा-यांनी व विरोधकांनी एकमेकाची उणीदुणी काढली आणि विषयावर काहीच बोलले नाही. वेळ मारून नेत रात्रीचे 12 वाजवले. मत व्यक्त करण्याची संधी...
  April 2, 01:24 PM
 • सोलापूर - शहरातील परवानाधारक रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे बंधनकारक झाले असून रविवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिलपासून रिक्षास इलेक्ट्रॉनिक मीटर बसविणे सक्तीचे झाले आहे. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. या निणर्याचे काही रिक्षाचालकांनी स्वागत केले, तर अनेकांनी विरोधही दर्शवला. पिळवणूक करणा-या रिक्षाचालकांना शिक्षा तर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.शहरात 7, 500 रिक्षा परवानाधारक आहेत. या सर्वांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे...
  April 2, 06:51 AM
 • सोलापूर- बेळगाव, विजापूर, चडचण या परिसरात जबरी चोरी, सुपारी घेऊन खून करणे आदी गंभीर गुन्ह्यातील दोघे अट्टल गुन्हेगार परिमंडल उपायुक्त पथकाने रविवारी जेरबंद केले. रवी शांतप्पा शिंदे (वय 24, रा. कडबूर गल्ली, चडचण, कर्नाटक), यल्लप्पा श्रीमंत काळे (वय 25, रा. कुरघोट, टाकळीजवळ, दक्षिण सोलापूर) अशी दोघांची नावे असून त्यांच्याजवळून दोन पिस्तुलही जप्त करण्यात आल्या. कर्नाटकात सुरेश मुदनाळ व सदाशिव डांगे असे दोन गँगवार गट आहेत. मुदनाळ गटासाठी एजाज पटेल (रा. नंदराळ, ता. इंडी) हा हस्तक म्हणून काम करतो. शूटर...
  April 2, 12:56 AM
 • सातारा- अणुशक्तीच्या रेडिएशनचे अनेक धोके संभवतात, मात्र नागासाकी आणि हिरोशिमामध्ये अणुबॉम्बमुळे झालेल्या विध्वंसात आणि अणुभट्टीत होणा-या स्फोटात खूप मोठा फरक आहे. अणुभट्टीतून होणारे रेडिएशन अणुबॉम्बच्या रेडिएशनच्या हजारो पटीने कमी असून त्याचा फारसा विपरीत परिणाम होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अणुऊर्जेला विरोध करून चालणार नाही. उलट अणुप्रकल्प न झाल्यास आपल्या देशाचे फार मोठे नुकसान होईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.भारताची ऊर्जा...
  April 2, 12:47 AM
 • सोलापूर - दिवेआगरमधील सुवर्णगणेशाच्या मूर्तीची चोरी झाल्यामुळे विधानसभेत गणेशमूर्ती आणून आरती करणा-या आणि शासनाचा धिक्कार करणा-या शिवसेनेच्या 13 व भाजपच्या एक अशा 14 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केल्याच्या घटनेचे पडसाद शनिवारी शहर व परिसरात उमटले. या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने आजोबा गणपती मंदिरात महाआरती केली.शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध केला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, सुनील...
  April 1, 12:03 PM
 • सोलापूर - बँकेतील ठेवीदारांच्या याद्या बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. 10 एप्रिलला रिझर्व्ह बँकेच्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे त्या दाखल करणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक (लिक्विडेटर) संजय राऊत यांनी दिली. आर्थिक डबघाईस आल्याने 6 नोव्हेंबर 2011 रोजी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला. त्यानंतर पुण्याच्या सहकार आयुक्तांनी बँकेवर अवसायक समिती नियुक्त केली. सहकारी संस्थांचे शहर निबंधक राऊत या समितीचे नियंत्रक आहेत. 11 नोव्हेंबरला त्यांनी अवसायक पदाची सूत्रे...
  April 1, 11:55 AM
 • सोलापूर - सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रॉकेल व धान्य काळ्या बाजारात पाठवण्यासाठी शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने चक्क बनावट लोकसंख्येचा आधार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या जनगणनेत शहरात केवळ 18 लाख युनिट होतात. मात्र, एफडीओ कार्यालयाने 12 लाख युनिट वाढवून त्याद्वारे उपलब्ध होणारे सहा ते सात कोटींचे अतिरिक्त रॉकेल व धान्याचा काळा बाजार करण्याची संधी उपलब्ध केली.नुकत्याच झालेल्या जनगनणेत शहराची लोकसंख्या 9 लाख 51 हजार 118 इतकीच नोंदवली आहे. जनगणनेच्या लोकसंख्येवरून शहराची युनिट संख्या फक्त 18...
  April 1, 11:51 AM
 • सोलापूर- सिमेंटचा वापर नसणारे काँक्रिट, सिमेंटऐवजी बेसॉल्ट फायबरचा उपयोग, टेक्सटाइल घनकच-याचा बांधकामात वापर अशा कल्पकतेचा आविष्कार आज नागेश करजगी ऑर्किड महाविद्यालय आयोजित ऑर्किटेक स्पर्धेत दिसून आला. महाराष्ट्र व कर्नाटकमधील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे 800 विद्यार्थी सहभागी झाले होते.स्थापत्य विभागात 18 संघांचा तर निर्मिती मॉडेल स्पर्धेत 65 संघांचा समावेश होता. या स्पर्धेत आइस्क्रिमच्या कांड्याचा वापर करून बनवलेल्या बिल्डिंग मॉडेलची दणकटता तपासण्यात आली. मेकॅनिकल विभागात...
  April 1, 11:43 AM
 • सोलापूर - महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील 120 पर्यटन स्थळांचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी 10 खासगी कंपन्यांना निवडण्यात आले असून, त्यांनी या पर्यटन स्थळांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सोलापूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि येथील पर्यटनस्थळे यांचा मेळ घातल्यास सोलापूर हे उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते. यासाठी आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुढे सरसावले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील 120 ठिकाणांची...
  April 1, 11:35 AM
 • सोलापूर- शहरातील नागरिकांना नळाच्या पाण्यासाठी आता पाचशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शनिवारी 25 टक्के पाणीपट्टीवाढीला बहुमताने मंजुरी देण्यात आली. ही रक्कम 2205 वरून 2700 रुपयांवर गेली आहे. ही दरवाढ 1 जुलै 2012 पासून लागू होणार आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अलका राठोड होत्या. प्रशासनाने 40 टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव सवर्साधारण सभेकडे सादर केला. सदस्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर 25 टक्के...
  April 1, 05:55 AM
 • सोलापूर: दैनिक 'दिव्य मराठी' च्या सोलापूर आवृत्तीचे शनिवारी मोठ्या दिखामदार सोहळ्यात लोकार्पण झाले. येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात देशातील सर्वांत मोठ्या भास्कर समूहातील या मराठी वृत्तपत्राच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर आणि उत्साही सोलापुरकर आवर्जुन उपस्थित होते. या सोहळ्याची काही क्षणचित्रे...
  March 31, 02:29 PM
 • सोलापूर - अवघ्या वर्षभराच्या आत मराठी मनाचा ठाव घेणाऱया दैनिक भास्कर समूहातील दैनिक दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या साथीने आणि असंख्य सोलापूरकरांच्या साक्षीने शनिवारी संपन्न झाला. आपल्या मर्जीचे वृत्तपत्र शहरातून प्रसिद्ध होणार असल्याने त्याच्या स्वागतासाठी येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात असंख्य सोलापूरकर जमले होते.प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुमित्रा महाजन, राज्याचे...
  March 31, 11:17 AM
 
जाहिरात

RECOMMENDED