जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर - महापालिकेच्या वतीने व्यापार्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुधवारी हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यशाळा घेण्यात आली. व्यापार्यांच्या हितासाठी आयोजित कार्यशाळेकडे व्यापार्यांनी पाठ फिरवली. व्यापारी आपल्याच भूमिकेवर आडून बसले असल्याचे यावरून स्पष्ट झाले. शहरात एकूण पाच ते सहा हजार व्यापारी असताना केवळ 70 व्यापारी कार्यशाळेस उपस्थित होते. व्यापार्यांच्या या अत्यल्प प्रतिसादामुळे एलबीटी मार्गदर्शन कार्यशाळाच फेल गेली.एलबीटी कायदा व्यापारी आणि महापालिकेच्या हिताची आहे. यात...
  May 10, 12:01 PM
 • सोलापूर - साहित्याची जाण नसलेल्यांची मसापमध्ये गर्दी झाली असल्याची टीका कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी बुधवारी केली. साहित्याचा प्रवास करणे सोपे नाही. मला वाटते की ज्यांना साहित्याची जाण नाही, जे केवळ नावाकरिता साहित्याच्या प्रवाहात येतात त्यांच्यासह काम करण्यात काहीच अर्थ नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणाची तक्रार करणे हे माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद सोडले आहे, असे कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी दिव्य मराठीला सांगितले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या...
  May 10, 11:52 AM
 • सोलापूर - उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र प्राध्यापकांवर बूमरँग होऊ शकते. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक पावित्र्यात आहेत. संप आणखी काही काळ चालला तर मागण्यांबाबतची सहानुभूतीही संपुष्टात येऊ शकते, असा सूर प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांच्या निमंत्रित प्रतिनिधींच्या चर्चेतून निघाला.दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात बुधवारी प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली. विद्यार्थीहित सर्वात...
  May 10, 11:40 AM
 • सोलापूर - एलबीटी कायदा कदापिही रद्द होणार नाही, पण त्यात दुरुस्ती होऊ शकते. एलबीटी थकविल्यास पहिल्या वर्षी 24 टक्के, दुसर्या वर्षी 36 टक्के व्याजदराने वसूल करण्याचे अधिकार या कायद्याने महापालिकेला दिले आहेत, अशी माहिती विक्रीकर सहआयुक्त महावीर पेंढारी (मुंबई) यांनी दिली.एलबीटी विवरणपत्र कसे भरावे, याची माहिती व्यापार्यांना देण्यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी पेंढारी शहरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी...
  May 10, 11:33 AM
 • सोलापूर - भीमा योजना जलवाहिनीला चार ठिकाणी लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू झाले. त्यातच उजनी येथील पंपहाऊसला बुधवारी सायंकाळी 4.30 पासून उच्चदाबाने वीजपुरवठा होत असल्याने पंप बंद झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी शहरात पाण्याची तीव्र टंचाई राहणार आहे. चार दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. एस. आहिरे यांनी दिली.भीमा जलवाहिनीस टाकळी आणि सोरेगावजवळ गळती लागली होती. सोरेगाव येथील हेडवर्क येथेही गळत्या आहेत. दुरुस्तीसाठी जलवाहिनीतील पाणी...
  May 10, 11:29 AM
 • सोलापूर - पाण्यासाठी त्रस्त असलेल्या लोकांना रात्र जागून काढण्याची शिक्षा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण डोंगरे यांच्या प्रभाग क्रमांक 21मधील नागरिकांची ही व्यथा आहे. पाणी नेमके किती वाजता येईल, याचा नेम नाही. रात्र जागत पाण्याची वाट पाहावी लागते. कर्णिकनगर, पद्मानगर, एकतानगर आदी भागांत गेल्या तीन वर्षांपासून विस्कळीत पाणीपुरवठा आहे. मध्यरात्री कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे नागरिकांना दिवसाआड झोप करावी लागत आहे.तक्रारीचा उपयोग नाहीदिवसाआड पाणी येते. तेही...
  May 10, 11:21 AM
 • सोलापूर - आसरा चौकात क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्याचे पर्यवसान महाराष्ट्र बँकेच्या शेजारी असलेल्या ज्योती एन्टरप्रायजेस या मोबाइल शॉपी दुकानावर दगडफेक करून काचा फोडण्यात झाले. दोघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान हा प्रकार झाला.शेख नावाचा एक तरुण आसरा चौकातून पायी जात होता. त्यावेळी एका मोटारसायकलस्वाराने त्याला कट मारला, त्यानंतर त्या तरुणाने शिवीगाळ केल्याने दोघांत बाचाबाची, हाणामारी झाली. नंतर दोन्ही गटातील तरुणांनी गोंधळ सुरू केला....
  May 10, 11:17 AM
 • सोलापूर - उन्हाळ्याची सुटी लागली की लहान मुलांमध्ये टाईमपाससाठी जी चढाओढ लागते त्यामध्ये कॉम्प्युटर गेम्स, व्हीडिओ गेम्स आणि मोबाइल गेम्स या साधनांचा समावेश असतो. मैदानावर भान हरपून क्रिकेट खेळल्याप्रमाणे आठ आठ तास आबालवृद्ध कॉम्प्युटरसमोर बसतात हे दृश्य आता कॉमन झाले आहे.देशातील स्थितीसध्या भारतात कॉम्प्युटर गेम्समध्ये राष्ट्रीय उलाढाल एक हजार कोटी रुपयांपर्यंत असून 2014 सालापर्यंत या क्षेत्रातील उलाढाल 1400 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. सध्या देशात 4 कोटी लोक कॉम्प्युटर गेम्स...
  May 10, 11:05 AM
 • सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठीचे पाणी बंधार्यात सोडावे, या मागणीसाठी आमदार दिलीप माने व त्यांच्या सर्मथकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्यानंतर सायंकाळी हतबल झालेल्या प्रशासनाकडून पाणी सोडण्यासाठीची मंजुरी मिळवली. गोंधळ घातल्याबाबत मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांनीही नरो वा कुंजरोवाची भूमिका घेतली. पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांकडून पाणी सोडण्याबाबतचे आदेश आल्यानंतरच आंदोलनाची इतिर्शी झाली.लोकशाहीदिन असल्याने सोमवारी...
  May 8, 11:05 AM
 • सोलापूर - उजनी धरणातूनच पाणी सोडा, असा आग्रह गेल्या काही दिवसांपासून होत होता. वास्तविक धरणातील उपलब्ध पाणी, त्याच्या वाटपाचे नियोजन याचा विचार कोणत्याच पातळीवर होताना दिसून येत नाही. सोमवारच्या आंदोलनाने तर यावर कडीच केली आहे. लोक पाणी मागतात, आमच्याशी भांडतात, असे सांगून आज लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले. पण पाण्यापेक्षा राजकारणच यामध्ये अधिक दिसले. मुळात आडातच नाही, तर पोहर्यात कुठून येणार अशी काहीशी स्थिती या पाण्याबाबत आहे.उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी गेल्या काही...
  May 8, 10:55 AM
 • सोलापूर: दक्षिण व उत्तर सोलापूरच्या पाण्यासाठी काँग्रेस आमदार दिलीप मानेंसह त्यांच्या सर्मथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी अधिकार्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. पोलिसालाही मारहाण करण्यात आली. माजी मंत्री व अन्य एका आमदारासमक्ष लोकशाहीदिनात हा प्रकार घडला. सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.आमदार माने, माजी मंत्री आनंदराव देवकते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष 50 शेतकर्यांसह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यांना सीना-कोळेगाव बंधार्यातून पाणी देण्याची मागणी घेऊन...
  May 8, 06:00 AM
 • सोलापूर - वाहनांच्या नंबरप्लेटवरील नेत्यांची नावे, छायाचित्रे काढून टाकावीत, असे आवाहन सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. वाहतूक नियमांच्या पालनासाठी पोलिसांना सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले. अनेक वाहनांच्या नंबरप्लेट नियमबाह्य आहेत. त्यावर आकड्यांऐवजी अप्पा, दादा, अण्णा आदी लिहिलेले आहे. नेत्यांच्या तसबिरी व नावे ठळकपणे असून आकडे अगदी लहान आहेत. याविरुद्ध दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून गेल्या पंधरा दिवसांपासून...
  May 7, 12:47 PM
 • सोलापूर - वीज बिलात महावितरण कंपनीकडून विविध करांची आकारणी केली जाते. सामान्य नागरिकांना त्याचा नेमका अर्थ कळत नाही. करांची योग्यता-अयोग्यता लक्षातही येत नाही. कर कमीतर होत नाहीतच, पण त्यांची संख्या वाढत राहते. चालू महिन्याच्या बिलात वीज कंपनीने अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून 160 रुपये आकारले आहेत. या कराच्या आकारणीची माहिती बिलावर वीज कंपनीकडूनच दिली जाते. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषीक्षेत्राशी निगडित ग्राहकांकडून हे छुपे कर आकारले जातात. नियमानुसार घेतले जातातमहावितरणकडून...
  May 7, 12:32 PM
 • सोलापूर - पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती पाडाव्यात, नाले सफाई व कचरा वेळेवर उचलावा, असे आदेश महापालिका आयुक्त अजय सावरीकर यांनी दिले. अधिकार्यांची मॉन्सूनपूर्व बैठक त्यांनी घेतली.कोणत्याही नगरात, रस्त्यावर पाणी साचू नये. घरांमध्ये पाणी जाऊ नये, आदींसाठी मॉन्सूनपूर्व तयारी करीत असून, त्यांचा आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली. 17 मुद्यांवर चर्चा झाली. पाणीपुरवठा अधिकारी महापौर अलका राठोड यांच्यासोबत औज बंधारा येथे भेट देण्यासाठी गेल्याने बैठक अर्धवट झाली.मान्सूनपूर्व तयारी करताना...
  May 7, 12:19 PM
 • सोलापूर - शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठेतील ग्राहकांच्या गर्दीत आता हॉकर्स आणि त्यांच्या हातगाड्यांची भर पडणार आहे. या भागात हॉकर्सना परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडे आला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नवी पेठेत एकेरी वाहतूक नको तर वाहनांना आणि हॉकर्ससाठी नो एन्ट्रीचाच कायदा होणे आवश्यक आहे.नवीपेठ रस्ता रुंदीकरणाचा मंजूर मास्टर प्लॅन अनेक वर्षांपासून धूळखात आहे. राजवाडे चौक ते मेकॅनिकी चौक या नवी पेठेतील मार्गावर ग्राहकांची कायम...
  May 7, 11:46 AM
 • सोलापूर - गेल्या पाच दिवसांत पाणी आलेच नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकार्यांकडून प्रतिसादच मिळत नाही. आठ दिवसांत केवळ एक टॅंकर पाणी मिळाले, अशी व्यथा सोनीनगर, हुडको, रेवणसिद्धेश्वरनगर भागातील नागरिकांनी दिव्य मराठीकडे व्यक्त केली.या भागात सुमारे हजार घरे आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांचे हाल होत आहेत. सोनीनगरात 50 घरांना सुरळीत पाणी मिळते, तर 300 घरांना पाणी कधी मिळेल याची शाश्वती नसते. आले तरी 15 ते 20 मिनीट कमी दाबाने पाणी येते. 250...
  May 7, 11:40 AM
 • सोलापूर - बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आयोजित सामूदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडप्यांचा विवाह झाला. मुकुंदनगर येथील डी. के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजन केले होते. भवानी पेठेतील अण्णाप्पा काडादी प्रशालेत दुपारी साडेबारा वाजता त्रिसरण पठण आणि मंगल परिणयाच्या विधीने विवाहसोहळा झाला.तथागत बद्धविहार समिती, मुकुंदगनर तालीम संघ, प्रबुद्ध कला व क्रीडा तरुण मंडळ, मातोर्शी रमाबाई आंबेडकर तरुण मंडळ, न्यू सिद्धार्थ तरुण मंडळ, भीमरत्न तरुण मंडळ, नवभारत तरुण मंडळांच्या...
  May 7, 11:35 AM
 • सोलापूर - शासकीय तंत्रनिकेतनच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवन सुसह्य करण्यासाठी विज्ञानाचा आविष्कार घडवला आहे. रश्मी जंगम, अश्विनी द्येवरकोंडा, अश्विनी जोशी, सुनील नडगम या विद्यार्थ्यांनी प्रा. एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टंट वॉटर हिटरची निर्मिती केली आहे. यामुळे अगदी वाळलेला कचरा आणि रद्दी कागद सयंत्रात टाकून पाच सेकंदात गरम पाणी मिळवता येणार आहे.गरम पाणी ही प्रत्येक कुटुंबाची अत्यावश्यक गरज आहे. यासाठी गॅस, रॉकेल, लाकूड, कोळसा या इंधनांचा वापर...
  May 7, 11:30 AM
 • सोलापूर - जमिनींच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गीयांचे गृहस्वप्न आवाक्याबाहेर जात असतानाच घर खरेदीवरील सरकारी करांचा विळखा अधिक घट्ट होत आहे. 25 एप्रिलपासून घराच्या खरेदीसाठी मुद्रांक शुल्कापोटी 17 हजार 400 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. मुद्रांक शुल्कातील पाच लाखांपर्यंतची सवलत कमी केल्याने हा फरक पडला आहे. कर्ज, उचल आदी मार्गांनी जीवाचा आटापिटा करून गृहसौख्य मिळवू पाहणा-यांना हा मोठा धक्का आहे.राज्य शासनाने 25 डी नियमानुसार दिलेली सवलत काढून घेतली आहे. 25 डी सवलतीनुसार ग्राहकांना...
  May 6, 11:33 AM
 • सोलापूर - मोटारसायकलवर दादा, अण्णा, अप्पा व अन्य नावाने फॅन्सी नंबरप्लेट लावून फिरणा-यांवर कारवाईची मोहीम वाहतूक शाखेने तीव्र केली आहे. आता पोलिसांचे टार्गेट अॅपेरिक्षा, स्क्रॅप रिक्षा, ओव्हरसीट प्रवासी घेणा-या रिक्षा असणार आहे.एक हजार ते बाराशेच्या आसपास शहरात बिगर पासिंग अॅपेरिक्षा, बिगर परवाना अॅपेरिक्षा, स्क्रॅप रिक्षा फिरतात. अनेक अॅपेरिक्षांवर नंबरप्लेट नाहीत. तीन प्रवाशांना घेण्याची मुभा असताना अॅपेरिक्षात बारा ते पंधरा प्रवासी आणि तीन आसनी रिक्षांमध्ये सहा प्रवासी वाहतूक...
  May 6, 11:31 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात