Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर- अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी रविवारी (दि.३ जून) सोलापूर येथे लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामीजी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान लिंगायत धर्म मान्यतेच्या मागणीला तीव्र विरोध असून लिंगायत धर्म मोर्चामध्ये वीरशैव लिंगायत समाजाने सहभागी होऊ नये, असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या...
  May 30, 07:31 AM
 • पंढरपूर-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील अध्यादेशावर सोमवारी स्वाक्षरी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पारंपारिक राजकीय विरोधक म्हणून कराडमध्ये भोसले घराणे प्रसिध्द आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील लढत लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन डॉ.भोसले यांचे राजकीय बळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा...
  May 30, 07:20 AM
 • सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी)च्या वॉशिग सायडिंग वर उभे असलेल्या रिकाम्या जनरल डब्याला मंगळवारी दुपारी २ वाजुन ५० मिनीटांनी अचानक आग लागली. या डब्याच्या शेजारी मुंबई -सोलापूर -गदग एक्सप्रेसचा रेक उभा होता. आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ रेल्वे प्रशासनाने हा रेक बाजुला नेला. अग्नीशामक दलाचे तिन बंबानी आग नियंत्रणात आणली. कचऱ्यामुळे रिकाम्या डब्याला आग लागल्याची शक्यता वर्तविण्यता येत आहे. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डि के शर्मा यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश...
  May 30, 05:38 AM
 • सोलापूर/बागलकोट-कर्नाटकातील जमखंडी (जि. बागलकोट) चे काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामगौड (वय ७०) यांचे सोमवारी (दि. २८) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे. आमदार न्यामगौड हे गोव्याहून कारने जमखंडीकडे निघाले होते. दरम्यान, तुलसीगेरीजवळ ट्रकला चुकवताना कार पुलाच्या कठड्याला धडकल्याने हा अपघात झाला. त्यात न्यामगौड यांच्या छातीला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. १९९१ मध्ये ते बागलकोटमधून लोकसभेवर निवडून गेले होते.
  May 29, 08:50 AM
 • सोलापूर- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या खेळीनंतर काँग्रेस नेत्यांना बाजार समितीची निवडणूक म्हणजे दुरून डोंगर साजरे करण्यासारखी स्थिती झाली अाहे. कोणी मुंबईत, कोणी मराठवाड्यात, कोणी कर्नाटकात ठाण मांडले अाहे. गुन्हे दाखल झाले असले तरी निवडणुकीपासून रोखले जाणार नाही, याचे समाधान काँग्रेस नेत्यांना अाहे. जामिनासाठीही त्यांचा अाटापिटा चालू अाहे. भाजपविरोधात काँग्रेस अशी मुख्य लढत असली तरी काँग्रेस नेत्यांना भाजपमधील सिद्रामप्पा पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची...
  May 29, 08:39 AM
 • मंगळवेढा- फेसबुकवरील प्रतिक्रियेच्या कारणावरून सचिन कलुबर्मे यांचा खून केल्या प्रकरणातील संशयित दोन नगरसेकांसह तिघांना येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश के. के. माने यांनी न्यायालयीन कोठडी दिली. नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी (वय ३१), प्रशांत सुभाष यादव (वय २६), शिवराज बाळासाहेब ननवरे (वय २२, रा. क्रांती चौक, पंढरपूर) अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. २५ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील मुरलीधर चौकातून एका लग्नाची वरात जात होती. या वेळी गणेश पान शॉपजवळ सचिन...
  May 29, 08:34 AM
 • सोलापूर- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संवर्ग एक व दोनच्या बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी बनावट कागदपत्रे, खोट्या माहितीच्या आधारे बदलीचा लाभ घेणाऱ्यांची सखोल चौकशी करून वंचित, गरजूंना न्याय न मिळाल्यास बदली प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात लढा देण्याचा निर्णय विस्थापित शिक्षक संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या परिसरात दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील विस्थापित शिक्षकांची बैठक झाली. त्यामध्ये संवर्ग एक व दोन मध्ये चुकीच्या...
  May 29, 08:29 AM
 • सोलापूर- मतदार यादीच्या गुऱ्हाळानंतर सोलापूर बाजार समितीची निवडणूक सहकार प्राधिकरणाने जाहीर केली. बाजार समितीच्या १८ संचालक निवडीसाठी १ जुलै रोजी मतदान तर ३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. २ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अाहे. ४ जून रोजी छाननी तर १९ जून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्याेती पाटील यांनी दिली. नवीन कायद्यानुसार प्रथमच शेतकऱ्यास मतदानाचा अधिकार...
  May 29, 08:23 AM
 • सोलापूर - पक्ष वेगवेगळे असले तरी एकोप्याने काम करून विकास साधता येतो. राजकीय काम फक्त निवडणुका जिंकून आल्याने संपत नाही, सामाजातील सामान्य लाेकांची ही सेवा करावी लागते. छोटी मने देखील मोठी मने जोडू शकतात. त्यामुळे चार लोकांमध्ये परिवर्तन घडण्यास मदत होते. मात्र निवडणुकीनंतर समाज अथवा लोकांशी असलेली नाळ तोडल्यास विपरीत परिणामास सामोरे जावे लागते, त्याचा परिणाम इंदिरा गांधी यांच्या सरकारला सत्तेच्या बाहेर जावे लागले होते. असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले....
  May 28, 10:29 AM
 • सोलापूर - अभियांत्रिकी कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगमध्ये झालेल्या ओळखीचा फायदा घेत, प्रेमसंबंधाचा बहाणा करीत, लग्नाच्या आमिषाला बळी पडत एका तरुणीवर युवकाने आठ वर्षांपासून दुष्कर्म केल्याची घटना घडली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादेवरून प्रवीणकुमार मल्लप्पा पुजारी (रा. इंडी , जि. विजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादेत म्हटले आहे की, सुरवातीला मेसेज, नंतर एकतर्फी प्रेम असल्याचे वारंवार सांगत तरुणीला जबरदस्तीने पुणे येथील हिंजवडी येथे नेले. तुझे फोटो आहेत, असे सांगून...
  May 28, 10:25 AM
 • सोलापूर -मनपा शाळेत स्मार्ट टीव्ही, इंटरॅक्टिव्ह बोर्ड, टॅब, ज्ञानरचनावादी वर्ग रचना, पारंपरिक खेळ, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य यांच्या माध्यमातून शिकणे-शिकवणे होत होते. शासनाकडून मिळालेल्या चार नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रामुळे भर पडली आहे. विज्ञान केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होणार अाहे. सर्व शिक्षा अभियानातून शासन व राज्य शिक्षण परिषदेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र राज्यामधील काही शाळांमध्ये...
  May 28, 10:23 AM
 • सोलापूर - महापालिका टँकर घोटाळाप्रकरणी आवश्यक असलेले रजिस्टर गायब झाल्याने महापालिका आयुक्तांना पहिली विकेट घेतली आहे. कुमार नंदा या लिपिकास निलंबित केले आहे. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले. टँकर घोटाळाचा संशय असल्याने महापौर बनशेट्टी यांनी चौकशीचे आदेश दिले. आठ दिवसांत चौकशी अहवाल सभागृहाकडे येणार आहे. महापालिका सभागृहात शुक्रवारी या घोटाळा प्रकरणी चर्चा होत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भवानी पेठ वाॅटर हाऊस येथे टँकर...
  May 27, 10:26 AM
 • सोलापूर - पेट्रोलपंप व धाबा टाकण्यासाठी माहेरहून एक कोटी रुपये अाण म्हणून सासरी छळ झाल्याचीतक्रार विवाहितेने िवजापूर नाका पोलिसात दिली अाहे. पूजा उर्फ सोनाली निखील दिवे (रा. अशोक निवास, बालाजी मंदिरशेजारी, पुराणिक गल्ली, भक्त निवास शेजारी देऊळगाव राजा, बुलढाणा, हल्ली रचनानगर, बाॅम्बे पार्क, जुळे सोलापूर) असे तिचे नाव आहे. पती निखील दिवे, सासू शांताबाई अशोक दिवे (रा. दोघे देऊळगाव), नणंद संगीता विनोद बाबर (रा. अौरंगाबाद), अनिता विकास बिराजदार (रा. पुणे अाळंदी), दीपाली विनय सकपाळ (सिन्नर, नाशिक)...
  May 27, 10:23 AM
 • सोलापूर - महापालिका बांधकाम परवाना देताना विकास नियंत्रक नियम (डीसीआर) तपासते. या कामासाठी स्वयंचलित संगणकीय प्रणाली असून या सेवेचे खासगीकरण केले आहे. यास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, ही संगणकीय प्रणाली महापालिकेने खरेदी करून वापरल्यास महापालिकेला वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच यासाठी नागरिकांना माफक शुल्क आकारले जाऊ शकते. याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे परवान्यासाठी अर्ज दिला की, तो अॉटो डीसीआर...
  May 27, 10:20 AM
 • संगमनेर- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मिशन ऑल आऊटमध्ये गुरुवारी मध्यरात्री शहर पोलिसांना एका संशयिताकडे पिस्तूल मिळाले. शहर पोलिसांनी गेल्या आठवड्यात तलवार, जांबिया आणि चाकू हस्तगत केल्यानंतर पिस्तूल हस्तगत करण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. प्रभारी निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक सैल झाल्याने गुन्हेगारीने डोके वर काढले होते. गुन्हेगारांना पोलिसांचाच आशीर्वाद...
  May 26, 10:15 AM
 • सोलापूर- संसाराला वाहून घेतलेली एक परिपूर्ण स्त्री ते स्वतःतून बाहेर पडत एक वेगळे विश्व अनुभवायची मिळालेली संधी असा प्रवास करणारा माधुरीचा बकेट लिस्ट हा मराठी चित्रपट प्रत्येक स्त्रीने पाहावा असाच आहे. मात्र कधीकाळी सुपर डुपर अभिनेत्री असलेल्या माधुरी दीक्षितच्या या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाला थंडा प्रतिसाद आहे. धर्म प्रॉड्क्शनच्या करण जोहर यांनी मराठीत एक वेगळा विषय हाताळण्याचे धाडस केले आहे. एक सामान्य कुटुंबापासून सुरू होणारा हा प्रवास वेगळ्या विश्वात नेणार आहे. कधी...
  May 26, 10:00 AM
 • सोलापूर- सात लाख किमतीचे कांदे मागवून घेऊन त्याचे पैसे न दिल्यामुळे तामीळनाडूच्या दोघांवर जेल रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला अाहे. संजीव मिठ्ठा (रा. साखरपेठ) यांनी तक्रार दिली अाहे. मार्केट यार्डात त्यांचे संजोग ट्रेडर्स नावाचे दुकान अाहे. तीस जानेवारी ते चोवीस मे २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला अाहे. प्रशांत व त्याची सहकारी नित्या असे दोघेजण मिठ्ठा यांच्याकडे फोनवरून व मागणी पत्र पाठवून कांद्याची नोंदणी केली. त्यानुसार २६ हजार ४४० टन कांदे पाठवून दिले. त्याची किंमत ७ लाख ३ हजार रुपये...
  May 26, 09:57 AM
 • सोलापूर- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करून विमानसेवा सुरू करण्याबाबत विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मागणी केली अाहे, त्यावर प्रभू यांनी सकारात्मकता दाखवत विमानतळाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याची म्हटले अाहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामध्ये नव्याने करार करणे अपेक्षित आहे, असे त्यांनी उत्तराच्या पत्रात म्हटले अाहे. केंद्रात...
  May 26, 09:52 AM
 • सोलापूर- टँकर पाणीपुरवठा घोटाळ्यात कारवाई करण्यात चालढकल करत असलेल्या प्रशासनाला शुक्रवारी महापालिका सभागृहाने चांगलेच धारेवर धरले. सुमारे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यावर चौकशी करून आठ दिवसांत अहवाल देण्याचा आदेश महापौरांनी दिला. विशेष म्हणजे या मुद्द्यावर सुमारे अडीच तास चर्चा चालली. मात्र, अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. महापालिकेची मे महिन्यातील सर्वसाधारण सभा शुक्रवारी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या...
  May 26, 09:48 AM
 • मंगळवेढा- ब्रह्मपुरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून चोरट्यांनी एक लाख ७१ हजार ६०० ची रोकड लुटली. शुक्रवारी (दि. २५) पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चॅनेल राेकड व्यवस्थापक अमोल अरुण पवार (वय ३२) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. महाराष्ट्र बँकेचे मंगळवेढा - सोलापूर रस्त्यालगत एटीएम आहे. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र, मध्यरात्री कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी हे एटीएम फोडले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममधील रोकड हाताळणीचे काम इलेक्ट्रॉनिक कॅश...
  May 26, 09:30 AM
 
जाहिरात

RECOMMENDED