जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Solapur

Solapur News

 • सोलापूर । पाण्यासाठी नागरिकांतून व्यक्त होणारा संताप पाहून लोकप्रतिनिधींनी केलेल्या हालचालींमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरासाठी टंचाई निधीतून 2 कोटी 77 लाख रुपये तातडीने मंजूर केले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिका-यांमार्फत प्रस्ताव सादर केला होता. विस्कळीत आणि दूषित पाणीपुरवठ्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केल्यानंतर आमदार शिंदे यांनी टंचाई निवारण निधीसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अनियमितपणा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत...
  April 8, 04:15 AM
 • सोलापूर- मच्छिंद्र मोरे दिग्दर्शित मुक्ती हा चित्रपट शुक्रवारी आशा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सोलापूरचे अमीर व अश्विनी तडवळकर यांची या चित्रपटात भूमिका आहे. या चित्रपटाचे कथानक कर्जबाजारी शेतक-याच्या आत्महत्येवर आधारित आहे.दुष्काळग्रस्त भागातील भानू हा पाण्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतो. यासाठी त्याला सावकाराचे कर्ज घ्यावे लागते, पण विहिरीला पाणी लागत नाही. त्या नैराश्यात तो कोरड्या विहिरीत आत्महत्या करतो. इथंपर्यंतचा मध्यांतर व त्यानंतर...
  April 8, 12:15 AM
 • सोलापूर - शहरातील प्रमुख हॉटेलांसह परमिट रूम, बिअर बार आणि एमआयडीसीतील काही कारखाने यांच्याकडे अग्निशामक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हॉटेल सिटी पार्कच्या किचन रूमला गुरुवारी आग लागली. त्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने अग्निशामक दलाकडे केलेल्या चौकशीतून हॉटेल व्यावसायिक आणि कारखानदारांची बेफिकिरी उघडकीस आली आहे.आगीच्या घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असते. हॉटेल व्यावसायिक व कारखानदार यांना...
  April 7, 12:55 PM
 • सोलापूर - दारात ढवळ्या-पवळ्याची बैलजोडी असणारा शेतकरी काळाच्या ओघात नव्या तंत्रज्ञानाची कास धरत ट्रॅक्टर बाळगू लागला आहे. तरीही ट्रॅक्टर सर्वांनाच परवडतो, असे नाही. त्यावर उपाय म्हणून एसईएस तंत्रनिकेतनच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी दिसायला लहान, वजनाने हलका, शिवाय किमतीत कमी अशा तीन चाकी टॅक्टरची निर्मिती अवघ्या पंधरा हजार रुपयांत करून नवा आविष्कार घडवला आहे.फक्त 46 किलो वजनाचा हा मिनी ट्रॅक्टर आहे. यासाठी विशाल काशीद, मल्लिकार्जुन खराडे, उमेश कांबळे, रितेश अंबेकर आणि ओकार...
  April 7, 12:48 PM
 • सोलापूर - सोलापूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या मंदिरास पाच प्रवेशद्वार आहेत. यापैकी लक्ष्मी मंडईकडील प्रवेशद्वारात कायम कच-याचा ढीग असतो. याच प्रवेशद्वारात सुलभ शौचालय असून, भंगारची दुकानेही आहेत. मंडईतील भाजीपाल्याचा कचरा इथे मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत असल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा कायम ठिय्या असतो. इथला कचरा उचलला जात असला तरी महापालिकेच्या आरोग्य विभगाचे इथे दुर्लक्ष आहे, तर मंदिर समितीची उदासीनता असल्याने हे प्रवेशद्वार अस्वच्छतेच्या...
  April 7, 12:40 PM
 • सोलापूर - शहरात जवळपास एकोणपन्नास टक्के गॅसग्राहक कुटुंबांच्या शिधापत्रिकांवर शिक्केच मारले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रेशनिंगच्या रॉकेलचा व घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. सोलापूर शहरात दोन लाख तेरा हजार आठशे सदतीस शिधापत्रिकाधारक कुटुंबं असून, यापैकी एक लाख 98 हजार कुटुंबं गॅसग्राहक आहेत. दोन सिलिंडर असणा-या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रेशनवर रॉकेल नाही, तर एक सिलिंडरधारक कुटुंबांना फक्त चार लिटर रॉकेल दिले जाते. गॅसग्राहक कुटुंबांच्या...
  April 7, 12:35 PM
 • सोलापूर - महापालिका निवडणुकीत दररोज पाणीपुरवठा करणार असल्याचा जाहीरनामा सोलापूरकरांसमोर मांडण्यात आला होता. ही अशक्य गोष्ट मान्य करून, निवडणुकीनंतर दररोज नाही तर किमान दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा होईल, या आशेत नागरिक होते. परंतु त्यांची घोर निराशा झाली. पाणीपुरवठा विस्कळीत झाला. रात्री-अपरात्री कधीही पाणी सोडले जाऊ लागले. त्याला दाब नाही, मुबलक पुरवठा नाही. काही भागात पुन्हा दूषित पाणी. या घटनांमुळे नागरिक वैतागले आहेत. महापालिका, नगरसेवकांच्या घरी आणि विभागीय कार्यालयांवर...
  April 7, 12:25 PM
 • सोलापूर- शहराजवळील संरक्षित राखीव वनक्षेत्र असलेल्या सिद्धेश्वर वनविहारात सध्या राजरोसपणे झाडांची कत्तल होत असून, आतापर्यंत 100 पेक्षा जास्त झाडे तोडण्यात आली आहेत. यामुळे महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या वनविहाराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.विजापूर रस्त्यावरील माशाळ वस्तीलगत वनविहाराचे कुंपण तोडण्यात आले आहे. येथून वनविहारात घुसून झाडे तोडली जातात. रोज एक झाड तोडले, तरी तोडणा-याला किमान दीड ते दोन हजार रुपये मिळतात. त्यामुळे चोरून...
  April 7, 04:20 AM
 • सोलापूर - यंदा महिनाभर आधीच म्हणजे चैत्र महिन्यात (एप्रिल) होरपळणारा वैशाखवणवा भडकला आहे. उन्हाची दाहकता वाढत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात कमाल 3.5 अंश तर किमान 4 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. गतवर्षी 4 एप्रिलला कमाल 37.7 अंश सेल्सिअस तापमान होते. तर या वर्षी 40.3 अंशावर कमाल पारा गेला आहे.कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 3 एप्रिलला ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वळवाच्या हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होण्याऐवजी वातावरणात...
  April 6, 11:50 AM
 • सोलापूर - महापालिकेच्या 22 बागांचे ओसाड मैदानात रूपांतर झाले आहे. दोन ते चार एकरांवर असणा-या या बागा टिकवून ठेवण्यात अपयश आले. आता या खासगीकरणातून फुलवण्याचा प्रयोग होऊ पाहतो आहे. बागेची 20 ते 25 टक्के जमीन देऊन संबंधितांकडून बाग फुलवून घेण्याचा आणि त्याची देखभाल ठेवण्याचा हा प्रयोग आहे. बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर (बीओटी) हे तत्त्व असले तरी नागरिकांना यात मुक्त प्रवेश असणार आहे. मात्र, त्यावर नियंत्रण कुणाचे? असा प्रश्न उभा राहतो आहे.सभागृह नेते कोठे अनुकूल - सभागृह नेते महेश कोठे बागांच्या...
  April 6, 11:48 AM
 • सोलापूर - पेट्रोलच्या महागाईपासून सुटका व्हावी म्हणून अनेकांनी वाहनात एलपीजी किट बसवून घेतले आहे. मात्र, गॅस भरताना काय काळजी घ्यावी लागते, याची ब-याच वाहनचालकांना माहिती नसल्यामुळे ते आपला जीव धोक्यात घालत आहेत. व्यवसायिक स्पर्धेमुळे फिलिंग स्टेशनवरही याचा फारसा विचार केला जात नाही.टाकीच्या क्षमतेच्या 85 टक्केच गॅस भरावा, असा पेट्रोलियम मंत्रालयाचा नियम आहे. पण या नियमांना छेद देत टाकीत 100 टक्के गॅस भरला जातो. हा गॅस द्रवरूपात असतो. उन्हाळ्यात या द्रवाची प्रसरण पावण्याची शक्यता वाढते....
  April 6, 11:46 AM
 • सोलापूर - सोलापूर शहर सीमावर्ती असल्यामुळे आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांतून येणा-या वाहनांचीही संख्या मोठी आहे. एस. टी. स्टँडचा परिसर, रेल्वे स्टेशन, मेकॅनिक चौक, मार्केट यार्ड, शांती चौक, टिळक चौक, मधला मारुती आदी भागांत वाहनधारकांचा कस लागतो. पार्किंग झोनचा परिसर हा नव्या पेठेलगत आहे, त्यामुळे नव्या पेठेत जाणा-या वाहनांची संख्या कमी होत असली तरीही शहरातील अनेक प्रमुख बाजारपेठांलगत कोणत्याही प्रकारची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे ग्राहक बाजारपेठेत आपल्या दुचाकी घेऊनच प्रवेश करतात....
  April 6, 11:45 AM
 • सोलापूर - पर्यावरण हा विषय वर्गातील चार भिंतींमध्ये बसून शिकण्याचा आणि शिकवण्याचा नाही. विद्यार्थ्यांना थेट निसर्गामध्ये नेऊन वन्यजीव, झाडे, वनस्पतींची माहिती देता यावी, या उद्देशाने वनविभागातर्फे सिद्धेश्वर वनविहारात निसर्ग परिचय केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात मुंबईनंतर शहराच्या लगत 450 एकर राखीव वनक्षेत्र असणारे सोलापूर हे एकमेव ठिकाण आहे. वनविहारात 2011-12 या शैक्षणिक वर्षामध्ये 25 पर्यावरण...
  April 6, 11:43 AM
 • सोलापूर - चार हुतात्मा पुतळ्यासमोरील हॉटेल सिटी पार्कच्या किचनला गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु, हॉटेलचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले.हॉटेलच्या पाठीमागील बाजूस किचन आहे. कढईमध्ये पदार्थ तयार करताना आगीचा भडका उडाला अन् एक्झॉस्टमधून आगीच्या ज्वाळा बाहेर आल्याने बाहेरील फायबरच्या पत्र्यांनी पेट घेतला. लागलीच कर्मचा-यांनी किचनमधील गॅस टाक्या बाहेर काढल्या. आग वेगाने पसरत गेल्याने हॉटेलमध्ये धुराचे लोट पसरले....
  April 6, 11:42 AM
 • सोलापूर - देशात दुर्मीळ असलेल्या माळढोक पक्ष्यांच्या छायाचित्रणास यंदाच्या वर्षीपासून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने बंदी घातली आहे. या निर्णयाचे माळढोकप्रेमींनी स्वागत केले, तर अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय पक्षी सूचीमध्ये अतिदुर्मीळ पक्ष्याच्या यादीत माळढोकचा समावेश आहे. या पक्ष्यांसाठी महाराष्ट्रात नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे स्वतंत्र अभयारण्य आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबरदरम्यान माळढोकांचा प्रजननाचा कालावधी असतो. मादीला आकर्षित करण्यासाठी नर माळढोक...
  April 6, 11:40 AM
 • सोलापूर - शहरातील औद्योगीकरण ढासळत असताना उद्योगवाढीचे विविध उपाय योजण्याविषयी नुसतीच चर्चा होते. परंतु जिल्हा उद्योग केंद्रातील महाव्यवस्थापकपद भरणेही गेल्या दोन वर्षांपासून जमले नाही. हे पद रिक्त असल्याने सुशिक्षित बेरोजगारांची प्रकरणे प्रलंबित आहेत. शासकीय योजनांचा तर पत्ताच नाही.होटगी रस्त्यावरील या केंद्रातून उद्योगविषयक महत्त्वाचे कामकाज चालते. त्यासाठी महाव्यवस्थापक असे महत्त्वाचे पद आहे. पंतप्रधान रोजगार योजना, बीजभांडवल योजना, रोजगार निर्मिती अशा महत्त्वाच्या...
  April 6, 11:39 AM
 • सोलापूर - नवीन बांधकाम करणा-यांसाठी एक खुशखबर असून, बांधकाम परवान्यासाठी महापालिकेत मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. यापुढे अॅटो डीसीआरअंतर्गत बांधकाम परवाना मागणी ऑनलाइन सादर करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेत बीओटीवर बांधकाम परवाना विभाग सुरू करण्यात आला आहे. परवाने कसे सादर करायचे त्यासाठी शहरातील अभियंते, वास्तुरचनाकार यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऑनलाइन प्रक्रियेसंबंधी विचारविनिमय करण्यात आला. परवान्यासाठी आवश्यक असलेले सर्वप्रकारचे शुल्क ऑनलाइन देण्याची...
  April 6, 11:37 AM
 • सोलापूर - शहर पुरवठा कार्यालयाने लोकसंख्येत बारा लाखांची लोकसंख्या वाढवून शिधापत्रिकांवरील युनिटच्या संख्येत तब्बल बारा लाखांची वाढ केली. दिव्य मराठीतून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेत कारवाईची तंबी दिली. त्यामुळे एफडीओ आणि चारही परिमंडळ अधिका-यांनी तातडीने बैठक घेऊन, अवघ्या काही तासांत वाढवलेली सहा लाख लोकसंख्या कमी केली. गैरप्रकार मोठा असल्याने आमदार विजयकुमार देशमुख यांनी हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला. पण, जिल्हा प्रशासनाने मात्र या...
  April 6, 11:36 AM
 • सोलापूर- करमाळा येथील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाने आपल्या स्वत:च्या पिस्तूलमधून छातीवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमाराला कोर्टी गावात घडली. ज्ञानेश्वर ऊर्फ दादासाहेब सुभाष गायकवाड (36, रा. कोर्टी, ता. करमाळा) यांचा मृत्यू झाला. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. गायकवाड यांची गावात शेती आहे. दूध व्यवसाय, आनंद हार्डवेअरचे दुकान आहे. याच दुकानात त्यांनी नऊ एमएम पिस्तुलमधून छातीवर गोळी झाडून घेतली. यानंतर...
  April 6, 05:11 AM
 • सोलापूर- ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या तिस-या वर्षात शिकणा-या 19 वर्षीय उमद्या तरुणाचा उजवा हात बस अपघातात तुटून 20 मीटर लांब जाऊन पडला. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा त्याला जगण्याचं बळ देत राहिली. त्याने डाव्या हातात कुंचला धरला आणि स्वत:ला पेंटिंगच्या विश्वात झोकून दिलं. अपघातापूर्वी काढत होता त्याहून उजवी चित्रे तो डाव्या हाताने साकारू लागला. या मूर्तीमंत जिद्दीचं नाव आहे झीशान युनूस दुर्गकर. सोलापूरपासून 100 किलोमीटरवर असणा-या विजापूर येथे झीशानची...
  April 6, 05:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात